आज आपण चिंता (anxiety), मानसिक ताण (stress), नैराश्य (depression) आणि दुःख (Grief) यांचा वेदनेशी असणारा संबंध समजून घेणार आहोत. चिंता (anxiety) ही तीव्र वेदनेला दिला जाणारा एक सामान्य प्रतिसाद आहे. शक्यतो झालेली इजा वाढू नये आणि गरजेच्या नसणार्‍या किंवा इजेला कारणीभूत ठरणार्‍या क्रिया थांबवणे हा उदेश्य यामागे असतो. आणि हे अगदी नॉर्मल आहे.
मात्र एखादी वेदना दीर्घ काळ चालते म्हणजेच क्रोनिक होते. विविध उपचारांना प्रतिसाद देत नाही, त्या वेदनेमागच कारण कळत नाही तेव्हा नकळतपणे या चिंतेची जागा निराशेने घेतली जाते. अशा व्यक्तींच्या आजूबाजूचे लोक घरातले, मित्रपरिवार इत्यादी त्यांच्या वेदनेला validate करत नाहीत किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत तेव्हा आजूबाजूच्या लोकांबद्दल शत्रुत्वाची भावना निर्माण होते यालाच इंग्रजीत hostility असं म्हणतात.

भीती: कदाचित आपल्याला होणारी वेदना कधीच बरी होणार नाही अशी भीती वाटत राहते.
निराशा: आपल्याला कुठल्याच उपायाने बरं वाटत नाही अशी नैराश्य भावना येते
नैराश्यापेक्षा चिंतेचा तीव्र वेदनांशी असणारा संबंध ठळक आहे. तीव्र वेदनांमध्ये (अकयूट पेन) मधे अतिशय नॉर्मल असणार्‍या anxiety response ची जागा दीर्घकाळ चालणार्‍या वेदनेमधे (क्रोनिक पेन) भीती, नैराश्य यासारख्या भावनांनी घेतली जाते.

Marathwada Socio economic backwardness,
मराठवाड्याच्या अस्वस्थतेची पाळंमुळं
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Loksatta chaturang padsad loksatta readers response letter
पडसाद : स्वार्थ आणि परमार्थ साधायचा असेल तर…
loksatta representative shriram oak conversation with dr sujala watve
आठवड्याची मुलाखत : मानसिक आजारांसाठी मदतीचा हात देणारी ‘हेल्पलाइन’
Delhi CM Atishi
Video : बिधुरींच्या आक्षेपार्ह विधानानंतर वडिलांबद्दल बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अश्रू अनावर; म्हणाल्या, “ते इतके आजारी असतात की…”
Ramdas Athawale statement on Santosh Deshmukhs murder case
बीड जिल्ह्यात शांतता ठेवायची असल्यास, वाल्मिक कराड याला कठोर शिक्षा झाली पाहिजे : रामदास आठवले
Health Massage
Health Special: अभ्यंग विधी कसा करावा? त्याचे फायदे कोणते? हा विधी कुणी करू नये?

आणखी वाचा: Health Special: श्रावणात ‘या’ भाज्या तुम्हाला ठेवतील फिट

मानसिक तणाव आणि वेदना
मानसिक तणाव आणि वेदना यांचा दुहेरी संबंध आहे. सततचा मानसिक तणाव वेदना वाढवू शकतो. तसच दीर्घकाळ चालणारी वेदना मानसिक ताण वाढवते.

तणावामुळे वेदना कशा होतात?
दीर्घकाळापर्यंत मानसिक तणावामुळे रोगप्रतिकारक शक्तीच बिघडलेल कार्य, स्नायू अट्रोफी, शरीराची झीज भरून न निघणे, औटोनोमिक नर्वस सिस्टम च बिघडलेल कार्य यामुळे मेंदूमधे संज्ञानात्मक आणि संरचनात्मक बदल होऊ शकतात. यामुळे आपला मेंदू वेदनांवर प्रक्रिया करण्याचा मार्ग बदलतो, पेनथ्रेशोल्ड कमी करतो आणि वेदना संवेदनशीलता वाढवतो. तणावामुळे होणारं central sensitization औटोनोमिक नर्वस सिस्टम च अॅक्टिवेशन त्यातल्या त्यात sympathetic activation घडवून आणत. फ्लाइट-फ्राइट-फाइटशी संबंधित शारीरिक बदलांसाठी सहानुभूतीशील प्रणाली नेहमीच जबाबदार असते. हे शारीरिक बदल वेदनांच्या वाढीव आकलनाशी संबंधित आहेत तीव्र डोकेदुखी, फायब्रोमायल्जिया, यासारख्या परिस्थितींमध्ये, तणाव संबंधित यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावतात.

आणखी वाचा: Health Special: सतत वेदना आणि थकवा देणारा ‘हा’ आजार कोणता?

वेदना कशा प्रकारे तणाव निर्माण करतात?
तीव्र वेदना ग्रस्तांना कधीकधी दोष दिला जातो किंवा यांना कशानेच बर वाटत नाही म्हणून लेबल केले जाते. जेव्हा अनेक चाचण्या वेदनांचे स्त्रोत ओळखू शकत नाहीत, जेव्हा उपचार कुचकामी असतात आणि या व्यक्ती त्यांच्या दैनंदिन कार्ये पूर्ण करण्यास सक्षम नसतात, तेव्हा त्यांच्या आयुष्यातील इतर महत्त्वपूर्ण व्यक्ती त्यांच्या वेदनांचे प्रमाणीकरण करत नाहीत ज्यामुळे त्यांच्या तणावाची पातळी वाढते.

नैराश्य
दीर्घकाळ असलेल्या नैराश्यामुळे वेदना किंवा दीर्घकाळ असलेल्या वेदनेमुळे नैराश्य. नैराश्यामुळे मेंदूमधील वेदनेच भावनिक प्रोसेसिंग करणार्‍या भागांमध्ये अॅक्टिविटी वाढते. नैराश्य जवळजवळ नेहमीच वेदनांची वाढती भीती आणि अॅक्टिविटी लिमिटेशन शी संबंधित असत.

दुःख
जीवनातील दुःखद प्रसंगांमुळे मेंदू मधील वेदनेच प्रोसेसिंग बदलू शकतं तसच दीर्घकाळ चालणार्‍या आणि कोणत्याही उपचारांना प्रतिसाद न देणार्‍या वेदनेमुळे दुःख होऊ शकतं. वेदनेमुळे नोकरी, कौटुंबिक नातेसंबंध, छंद आणि करमणुकीसाठी वैयक्तिक गरजा पूर्ण करणे यासारख्या सामाजिक भूमिका पूर्ण करण्यात असमर्थता यामुळे दुःख होते. वेदनेमुळे आयुष्यातील विविध भूमिका आपण समर्थपणे पूर्ण करू शकत नाही यामुळे अपराधीपणाची भावना येते. ग्रीविंग मॉडेल जगाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याच्या आणि दुःखातून बाहेर पडण्याच्या प्रक्रिया सांगते. अखंडपणे या प्रक्रिया घडतात,

निराशा ते आशा
अर्थहीनता ते अर्थपूर्णता
शारीरिक अस्वस्थता ते शारीरिक स्वस्थता

मन आणि वेदना यांचा घनिष्ठ संबंध आहे. ते एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे समजून घेण्याचा प्रवास महत्वाचा ठरतो. हा प्रवास साहजिकच मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक, फिजिओथेरपिस्ट, डॉक्टर्स यांची मदत घेतली तर सोपा होतो.

Story img Loader