Breakfast Timing: निरोगी आरोग्यासाठी असं म्हटलं जातं, “सकाळचा नाश्ता राजासारखा करावा, दुपारचं जेवण राजकुमारासारखं आणि रात्रीचं जेवण गरिबासारखं करावं.” दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणापेक्षा सकाळचा नाश्ता खरंच खूप महत्त्वाचा भाग आहे. पौष्टिक नाश्ता हा केवळ शरीराच्या शक्तीसाठीच आवश्यक नाही, तर तो शरीराच्या कार्यांचे नियमन करण्यासदेखील मदत करतो. आपण आजपर्यंत सकाळचा नाश्ता ८ ते १० या वेळेत व्हायला हवा, असे ऐकले असेल. पण आता डिजिटल क्रिएटर डॉ. स्टीव्हन गुंड्री यांनी त्यांच्या एका पॉडकास्ट एपिसोडमध्ये सांगितले की, सकाळी १० किंवा ११ पर्यंत न्याहारी करण्याने आश्चर्यकारक गोष्टी करू शकतात. त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचे रात्रीचे जेवण आणि दुसऱ्या दिवशीचा नाश्ता यादरम्यान जितका जास्त वेळ घेता, तितकी तुमची चयापचय लवचिकता, माइटोकाँड्रियल फंक्शन वाढेल आणि त्यामुळे तुमचे आयुष्यही वाढवता येईल.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या विषयासंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला.

नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील सल्लागार व आहारतज्ज्ञ प्रतीक्षा कदम यांनी स्पष्ट केले, “अधूनमधून उपवासाचा भाग म्हणून नाश्त्याला उशीर केल्यानं विशिष्ट आरोग्य फायदे होऊ शकतात.” त्यांनी नमूद केले की, सकाळी १०-११ पर्यंत नाश्ता पुढे ढकलल्याने चरबी जाळण्यास प्रोत्साहन मिळू शकते आणि रात्रभर उपवासाचा कालावधी वाढवून इन्सुलिन संवेदनशीलता सुधारता येऊ शकते. त्यामुळे शरीर संचयित ऊर्जेवर अवलंबून राहू शकते. तथापि त्यांनी, “व्यक्तीचे वेळापत्रक, जीवनशैली व चयापचय क्षमता यांनुसार नाश्त्याची वेळ बदलते,” असेही सांगितले आहे.

त्यावर सहमती दर्शवीत फोर्टिस हॉस्पिटल, सीजी रोड, बेंगळुरू येथील मुख्य आहार तज्ज्ञ रिंकी कुमारी म्हणाल्या, “नाश्ता एक ते दोन तासांनी पुढे ढकलल्याने फायदे होऊ शकतात. ही वेळ-प्रतिबंधित खाण्याची पद्धत ‘ऑटोफॅजी’ सुधारू शकते, चयापचय वाढवू शकते व चरबी जाळण्याची क्षमता वाढवू शकते.” त्यांनी असेही सांगितले की, नाश्ता उशिरा केल्याने एकूण कॅलरीज कमी होऊ शकतात.

“सकाळी ८ ते १० ही नाश्ता करण्याची उत्तम वेळ मानली जाते; जेव्हा अनेकांचे शरीर उर्जा वाढवण्यासाठी काम करते. परंतु, जे लोक अधूनमधून उपवास करतात, ते सकाळी १०-११ वाजेपर्यंत नाश्ता करू शकतात. त्यामुळे त्यांना वजन नियंत्रित ठेवण्यास, तसेच रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत मिळते,” असे कदम म्हणाल्या.

हेही वाचा: पांढऱ्या आणि लाल तांदळाच्या तुलनेत राजामुडी तांदूळ आहे बेस्ट? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

नाश्ता करण्यासाठी योग्य वेळ कोणती?

“नाश्त्यासाठी योग्य अशी वेळ नाही. जीवनशैली, वेळापत्रक व वैयक्तिक प्राधान्यक्रम यांसारखे घटक नाश्त्याच्या सर्वोत्तम वेळेवर परिणाम करतात. काही अभ्यासांतून असे सुचवण्यात आले आहे की, उठल्यानंतर एक तासाच्या आत नाश्ता करा; तर काही उशिरा खाण्याचा सल्ला देतात. अशा वेळी तुमच्या शरीराचे ऐका आणि तुमच्यासाठी काय चांगले आहे ते शोधण्यासाठी प्रयोग करा,” असे कुमारी म्हणाल्या.

आहारतज्ज्ञ कदम यांनी सांगितले केले की, नाश्त्यासाठी वेळ खरोखरच महत्त्वाची असली तरी तुम्ही काय खाता तेही महत्त्वाचे आहे. “पोषक घटकांनी युक्त संपूर्ण धान्य, प्रथिने व फायबर असलेले अन्न रक्तातील साखर नियंत्रित करण्यास आणि एकाग्रता व मूड चांगला ठेवण्यास मदत करतात,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the right time to have breakfast in the morning sap