हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप असे वायरल आजार होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे तब्बेतीची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या आजरांपासून वाचण्यासाठी गरम कपडे वापरणे, गरम पाणी पिणे असे घरगुती उपाय केले जातात. पण जास्त गरम पाणी पिणे नुकसानकारक ठरू शकते. जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतात जाणून घ्या.
जास्त गरम पाणी पिण्याचे दुष्परिणाम:
आणखी वाचा: नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करतात ‘हे’ पदार्थ; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश
घशात जळजळ होणे
जास्त गरम पाणी प्यायल्याने घशात जळजळ होऊ शकते. यामुळे श्वसन प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन, श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. गरम पाणी घशातील त्वचेच्या संपर्कात आल्यास स्नायूंना इजा होऊ शकते. यामुळे थर्ड-डिग्री बर्नही होऊ शकते.
पाण्यातील दूषित पदार्थ
जेव्हा पाणी गरम केले जाते तेव्हा फक्त कोमट केले जाते, त्यामुळे त्यांच्यातील जंतू तसेच आपल्या शरीरात जाऊ शकतात. तसेच पाणी गरम करण्याच्या भांड्यावर असणारे जंतूही पाण्यात लगेच मिसळू शकतात. थंड पाण्यापेक्षा गरम पाण्यामध्ये जंतू लगेच प्रवेश करू शकतात. त्यामुळे गरम पाणी टाळण्याचा सल्ला दिला जातो.
आणखी वाचा: उलट चालण्याचे फायदे माहित आहेत का? कंबरदुखी, गुडघेदुखीवर ठरते सोपा उपाय; लगेच जाणून घ्या कारण
पोटातील उष्णता वाढू शकते
जास्त गरम पाणी प्यायल्याने पोटातील उष्णता वाढू शकते. यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. गरम पाण्यामुळे तोंडात, पोटात फोड येऊ शकतात. त्यामुळे सतत आणि अति गरम पाणी पिणे टाळावे.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)