डॉ. विभावरी निगळे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मागच्या लेखात आपण मुरमांची कारणे आणि त्यांचे प्रकार, त्यांच्या मागे राहणाऱ्या पाऊलखुणांची माहिती घेतली. आता पाहू या मुरमांवरील उपचार.
“ डॉक्टर, मला औषधे घ्यायची नाहीत आणि मलमे पण लावायची नाहीत. तरी पण माझी मुरमे गेली पाहिजेत. काही घरगुती उपचार सांगा ना!”, माधुरी अगदी मधुर आवाजात गळ घालू लागली. तिला औषधांची आवश्यकता पटवून देताना माझी मात्र दमछाक झाली. औषधांबरोबर सर्वसाधारण उपचार सांगून तिला पाठवले.
नुसत्या सर्वसाधारण काळजी घेण्याने मुरमे जावू शकतात का? होय, जर अगदी थोडे म्हणजे दहा ते पंधरा ब्लॅक हेड असतील तर नक्की जातात. पण वेळ जास्त लागतो. त्याकरता सर्वप्रथम चेहरा दिवसातून तीन वेळा साबण, फेस वॉश किंवा क्लिन्सरने स्वच्छ धुवावा. तेलकट त्वचेसाठी साबण किंवा फेस वॉश चालतो. परंतु त्वचा जर नाजूक बनली असेल अथवा कोरडी झाली असेल तर पीएच बॅलन्स क्लिन्सर्स वापरावेत.
आहारावर नियंत्रण म्हणजे चॉकलेट दूध व दुग्धजन्य पदार्थ आणि गोड पदार्थांवर नियंत्रण ठेवावे.
हाताने मुरमे कोचू नयेत. अन्यथा डाग व खड्डे राहण्याची शक्यता असते.
फाउंडेशन, हेवी मेकअप, फेशियल आणि ब्लीच करणे टाळावे.
आणखी वाचा: Health Special: क-कॉस्मेटॉलॉजीचा
गरज पडल्यास आम्ही लावण्याकरिता क्लींडामाईसीन, बेंझॉइल पेरॉक्साईड किंवा रेटीनॉल ही औषधे सुचवितो. साधारण दीड ते दोन महिन्यात मुरमे नाहीशी होऊ शकतात.
क्लींडामाईसीन: हे एक प्रतिजैविक (Antibiotic) आहे. ते त्वचेवरील जिवाणूंचा नायनाट करते. त्यामुळे सीबम पासून फ्री फॅटी ऍसिड तयार होणे कमी होऊन त्वचा दाह थांबतो.
बेंझॉइल पेरोक्साइड: हे रसायन सीबम तयार होण्याचे प्रमाण कमी करते. व्हाईट हेड्सना विरघळवून टाकते आणि जिवाणूंना अटकाव करते.
रेटीनॉल: हे औषध अ जीवनसत्वाचे एक प्रारूप आहे. ते सीबम तयार करण्याचे प्रमाण कमी करते, त्वचेच्या पेशींची सुयोग्य वाढ होण्यास मदत करते. त्यामुळे त्या एकमेकींना घट्ट चिकटत नाहीत व मायक्रोकोमेडोन्स तयार होण्याचे प्रमाण कमी होते. रेटीनॉल त्वचा दाह देखील कमी करते. शिवाय हे औषध त्वचेच्या खालच्या थरावर देखील काम करते. ह्या थराला डर्मिस असे म्हणतात. ह्या थरामधील पेशींवर तसेच या पेशींना धरून ठेवणाऱ्या प्रथिनांवर रेटीनॉल काम करते. त्यामुळे व्रण व डाग या पाऊलखुणा मिटवण्याची मोठीच कामगिरी पार पाडते.
वरील तीनही औषधे एकेकटी वापरण्याऐवजी एकत्र वापरल्यास लवकर, चांगले व टिकाऊ परिणाम दिसतात.
पोटात घ्यावयाची औषधे
प्रतिजैविके ही त्वचेवरील पी. ॲक्नेस ह्या जिवाणूंचा नायनाट करतात. याकरिता डॉक्सिसायक्लीन, टेट्रासायक्लिन व त्यांच्या गटातील इतर प्रतिजैविके वापरली जातात. या औषधांचा परिणाम दिसायला दोन ते तीन आठवडे लागतात. सहसा ही औषधे तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी वापरली जात नाहीत. ही प्रतिजैविके गरोदरपणात अथवा स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना देता येत नाहीत. कारण त्यांचा गर्भावर आणि नवजात बालकांवर दुष्परिणाम होऊ शकतो. अशावेळी अझिथ्रोमाइसिन हे प्रतिजैविक सुरक्षित ठरते.
रेटीनॉल: हे औषध आपण त्वचेवर लावण्याचे म्हणून समजून घेतले. हेच औषध आयसोट्रेटिनॉइन या स्वरूपात पोटात घेता येते. ह्या औषधाने मुरमांच्या उपचारांमध्ये प्रचंड फरक घडवून आणला आहे. इतर कोणत्याही औषधाने मोठमोठ्या मुरमांचे राहणारे खड्डे किंवा व्रण, आणि लाल अथवा काळे डाग जात नाहीत. परंतु आयसोट्रेटिनॉईन लवकर सुरू केल्यास व्रण मोठ्या प्रमाणात नष्ट होतात. महत्त्वाचा धोक्याचा इशारा: हे औषध प्रेग्नेंसी प्लॅन करणाऱ्यांनी घेऊ नये किंवा करावयाची इच्छा असल्यास एक महिना औषध थांबवून त्या कालावधीत गर्भनिरोधक गोळ्या वापरल्या पाहिजेत. कारण गर्भधारणा झाल्यास त्या गर्भावर होणारे दुष्परिणाम भयंकर असतात अशावेळी गर्भपात करणे अनिवार्य ठरते.
डॅप्सोन: हे कुष्ठरोगावर वापरण्यात येणारे औषध आहे. मोठमोठ्या फोडांच्या मुरुमांवर हे स्वस्त औषध लागू पडते. परंतु हे औषध सल्फा या गटात मोडते. त्यामुळे त्याची ॲलर्जी असणाऱ्या रुग्णांना रिॲक्शन येऊ शकते. त्या करता तुमच्या त्वचारोगतज्ञांना औषधांच्या ॲलर्जीची माहिती द्यावी. संप्रेरके अथवा हॉर्मोन: यामध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचा समावेश होतो. ह्या गोळ्यांमध्ये स्त्री संप्रेरके म्हणजे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन असतात. ही संप्रेरके स्त्रियांच्या शरीरातील पुरुष संप्रेरकांची पातळी कमी करतात. या गोळ्यांचा वापर पीसीओएस असणाऱ्या स्त्रियांमध्ये केला जातो.
अँटी अँड्रोजेन्स: पुरुष संप्रेरक टेस्टोस्टेरॉन याची पातळी कमी करणारी औषधे म्हणजे अँटी अँड्रोजेन्स. सायप्रोटेरॉन ॲसिटेट व स्पायरोनोलॅक्टोन ही दोन औषधे त्याकरिता वापरली जातात. बरेचदा स्त्रियांना व मुलींना तेलकट त्वचा, मोठी मुरमे, पाळीमध्ये अनियमितता, केस गळणे आणि चेहऱ्यावरती केस अशी लक्षणे दिसतात. या लक्षणांचे कारण आहे स्त्रियांच्या शरीरातील वाढलेले टेस्टोस्टेरॉन किंवा असलेल्या नॉर्मल टेस्टोस्टेरॉनला जास्त प्रमाणात संवेदनक्षम असणाऱ्या तैलग्रंथी. अशावेळी ही औषधे उपयुक्त ठरतात.
मुरमांचे उपचार किमान तीन ते सहा महिने व्यवस्थित करणे गरजेचे आहे. काही वेळा नुसत्या औषधोपचारांनी मुरमे आटोक्यात येत नाहीत. त्याकरिता औषधोपचारांना काही कॉस्मेटोलॉजी उपचारांची जोड द्यावी लागते. त्याबद्दलची चर्चा पुढील लेखात.