दृष्टीदोष म्हणजे कमी दिसणे म्हणजेच सामान्य भाषेत डोळयाला नंबर लागणे. यात जवळचे किंवा लांबचे अंधुक दिसते. डोळयाच्या बाहुलीतून प्रकाशकिरण आत शिरून भिंगातून एकत्र होतात. यामुळे आतल्या पडद्यावर वस्तूची प्रतिमा उमटते. या प्रतिमेचे ज्ञान मेंदूपर्यंत पोहोचून आपल्याला दृष्टीज्ञान होते. जेव्हा प्रकाशकिरण आंतरपटलाच्या मागे किंवा पुढे एकत्रित होतात तेव्हा दृष्टीदोष होतो. डोळयाची बाहुली आणि पडदा यांमधले अंतर कमीजास्त असेल तर प्रतिमा पडद्यावर अचूक व स्पष्ट पडत नाही. अशा वेळेला चष्मा वापरून (भिंग) हा दोष घालवता येतो. यासाठी नेत्रतज्ज्ञाची मदत घ्यावी लागते.
लघुदृष्टी – सर्वसाधारणपणे लहान वयात येणारा दृष्टीदोष लघुदृष्टी प्रकारचा असतो. म्हणजे ‘जवळचे दिसते पण लांबचे कमी दिसते’ या स्वरुपाचा हा दोष असतो. याचे कारण म्हणजे हा नेत्रगोल लांबट अंडाकृती असतो. त्यामुळे लांबची चित्रप्रतिमा नेत्रगोलाच्या आतल्या नेत्रपटलावर पोहोचत नाही म्हणून धूसर दिसते. भिंगापासून नेत्रपटलापर्यंतचे अंतर जास्त असणे हे याचे कारण असते. यामुळे मुले पुस्तक जवळ धरतात. मुलांना फळयावरचे नीट दिसत नाही. मुलाला ही अडचण नेमकी न सांगता आल्यामुळे वर्गात बोलणीही खावी लागतात. (घरात टी.व्ही. असल्यास मूल टी.व्ही. जवळ बसून बघते.)
आणखी वाचा: Health Special: डोळयाची रचना व कार्य दृष्टीदोष
दीर्घदृष्टी– दीर्घदृष्टी म्हणजे लांबचे दिसते पण ‘जवळचे कमी दिसते’ या स्वरुपाचा हा दोष असतो. या दोषामध्ये वस्तुपासून निर्माण होणारी प्रतिमा आंतरपटलामागे तयार होते. भिंगापासून नेत्रपटलापर्यंतचे अंतर कमी असणे हे याचे कारण असते. (याचे कारण म्हणजे नेत्रगोल थोडा चपटा असतो.) यामुळे वाचताना त्रास होणे, डोळे चोळणे, वाचताना कपाळावर आठया, तिरळे पाहणे, इ. त्रास होतो. सुईत दोरा ओवताना, धान्य निवडताना त्रास होतो.
सर्व मुलांची डोळयांची तपासणी (यंत्राने) करणे आवश्यक आहे. यावर वेळीच उपाय न झाल्यास मोठेपणी चष्मा देऊनही दृष्टी सुधारत नाही. चाळिशीनंतरच्या दृष्टीदोषात लांबचे नीट दिसते, पण जवळचे दिसण्यासाठी (धान्य निवडणे, वाचणे, शिवणे) चष्मा वापरावा लागतो.
अस्टिगमॅटिझम (बुब्बुळ वक्रता) – बुब्बुळ वक्रतेमधील होणाऱ्या बदलामुळे स्पष्ट दिसत नाही. यात डोळयामध्ये स्पष्ट प्रतिमा कुठेच निर्माण होत नाही. या विकारावर भिंग म्हणजे चष्मा लावावाच लागतो.
आणखी वाचा: Health special: डोळा आळशी का होतो?
दृष्टीदोषाची लक्षणे
-डोळयांवर ताण पडल्याने डोके दुखते. (ही डोकेदुखी कपाळावर दोन्ही डोळयांच्या मधल्या भागात येते).
-फळयावरील छोटी अक्षरे मुलांना वाचता न येणे.
-फळा किंवा टी.व्ही., इ. दूरच्या वस्तूंकडे बघताना डोळे बारीक करणे.
-वाचताना पुस्तक तोंडाजवळ धरणे.
-जवळचे किंवा लांबचे नीट न दिसणे.
-जास्त तास वाचन केल्यास डोळयांवर ताण पडणे.
-तिरळेपणा दिसणे.
-डोळे किंवा डोकेदुखी.
-सुईत दोरा ओवताना, धान्य निवडताना त्रास होतो.
दृष्टीदोषावरील उपचार
दृष्टीदोषाच्या प्रकाराप्रमाणे योग्य चष्मा वापरावा लागतो. लहान वयात येणाऱ्या या दृष्टीदोषावर योग्य प्रकारचे भिंग (चष्मा) वापरून दृष्टी सुधारता येते.
वयाच्या १५व्या वर्षानंतर यासाठी योग्य कॉन्टॅक्ट लेन्स वापरता येईल. यासाठी नेत्रतज्ज्ञ मदत करतील. कॉन्टॅक्ट लेन्सचे अनेक प्रकार आहेत. यात सॉफ्ट (लवचिक) आणि सेमी सॉफ्ट (अर्ध लवचिक) असे मुख्य प्रकार आहेत. हल्ली यात अगदी अल्प किमतीत महिनाभर वापरून झाल्यावर टाकून देण्याचे (डिसपोझेबल्स) कॉन्टॅक्ट लेन्स उपलब्ध आहेत.
लघुदृष्टी किंवा दीर्घदृष्टीवर लेसर किरणोपचार करून बुबुळाचा आकार सूक्ष्मरित्या बदलता येतो. याला ‘लेसिक’ असे नाव आहे. या उपचाराने चित्रप्रतिमा नेत्रपटलावर आणता येते. यामुळे चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सच्या ऐवजी डोळयाचा नंबर दुरुस्त करता येतो. ही शस्त्रक्रिया १८च्या वयानंतरच केली जाते. मात्र ही पध्दत पूर्णपणे निर्धोक नाही. यातून बुब्बुळाच्या आकार-वक्रतेचा फरक एकदा झाला की तो बदलता येत नाही. या उपचारासाठी खर्चही बराच आहे.