What Nutrition 100 Gram Sweet Corn Gives: ऑक्टोबर हिटचा तडाखा आता कमी झाला की वातावरणात मोहक गुलाबी थंडी पसरण्यास सुरुवात होईल. थंडीच्या महिन्यांमध्ये अगदी सकाळी चालायला म्हणून बाहेर पडायचं असो किंवा संध्याकाळी थोडं वर्कआउट करण्याआधी काही खायचं असो छान वाफाळणारा स्वीट कॉर्न खायला अनेकांना आवडतो. पावसाळ्यात भाजून खाल्ल्या जाणाऱ्या मक्याच्याच कुटुंबातील असला तरी स्वीट कॉर्न हा अलीकडे जास्त प्रचलित झाला आहे. गोडसर चवीच्या या मक्याचे दाणे व त्यावर लिंबू पिळून मसाले भुरभुरून खाण्याची मज्जा काही औरच असते. पण अनेकांना चवीपलीकडे जाऊन या मक्याचे फायदे, पौष्टिक मूल्य माहित नसतात. शिवाय गोड असल्याने डायबिटीस रुग्णांनी, गरोदर महिलांनी याचे सेवन करावे का याविषयी सुद्धा अनेक समज- गैरसमज असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज आपण इंडियन एक्सस्प्रेसने एन लक्ष्मी, आहारतज्ज्ञ, कामिनेनी हॉस्पिटल्स, हैदराबाद यांच्याशी बोलून १०० ग्राम मक्याच्या पौष्टिकतेबाबत दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.

१०० ग्राम स्वीट कॉर्नची पौष्टिक मूल्य (Nutrition Value of 100 Gram Sweet Corn)

  • कॅलरीज: 86
  • कार्ब्स : 19 ग्रॅम
  • प्रथिने: 3.2 ग्रॅम
  • फॅट्स : 1.2 ग्रॅम
  • फायबर: 2.7 ग्रॅम
  • व्हिटॅमिन सी: 9.2 मिग्रॅ
  • व्हिटॅमिन बी 1 (थायमिन): 0.2 मिग्रॅ
  • व्हिटॅमिन बी 3 (नियासिन): 2.14 मिग्रॅ
  • फोलेट: 42 एमसीजी
  • पोटॅशियम: 270 मिग्रॅ
  • फॉस्फरस: 89 मिग्रॅ
  • मॅग्नेशियम: 37 मिग्रॅ

स्वीट कॉर्नचे फायदे (Benefits Of Sweet Corn)

  • पचनास मदत करते: स्वीट कॉर्न आहारातील फायबरचा एक चांगला स्रोत आहे, यामुळे पचनास मदत होते व बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
  • डोळ्यांसाठी उत्तम: स्वीट कॉर्नमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे अँटिऑक्सिडंट असतात, जे डोळ्यांच्या आरोग्याला फायदेशीर ठरतात.
  • स्वीट कॉर्न जीवनसत्व सी, थायामिन, नियासिन आणि पोटॅशियम सारखी आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील प्रदान करते, ज्यामुळे संपूर्ण आरोग्यास फायदा होतो.
  • फॅट्सचे कमी प्रमाण असल्याने वजन नियंत्रणात ठेवू पाहणाऱ्यांना सुद्धा हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो.

डायबिटीस रुग्ण स्वीट कॉर्न खाऊ शकतात का? (Diabetes & Sweet Corn)

डायबिटीस रुग्ण स्वीट कॉर्नचे सेवन करू शकतात, परंतु कार्ब्सचे प्रमाण लक्षात घेऊन सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे, अन्यथा याचा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथिने आणि फायबरच्या अन्य स्त्रोतांसह स्वीट कॉर्नचे सेवन करावे.

हे ही वाचा<< चायनीजमध्ये वापरला जाणारा अजिनोमोटो असतो तरी काय? खरंच शरीराचं नुकसान होतं का, तज्ज्ञांचं स्पष्ट उत्तर.. 

गर्भवती महिलांनी स्वीट कॉर्न खावा का? (Sweet Corn In Pregnancy)

स्वीट कॉर्न गर्भवती महिलांना फॉलिक ऍसिड सारखे आवश्यक पोषक तत्व प्रदान करते, जे गर्भाच्या विकासासाठी महत्वाचे आहे, मात्र अतिसेवन टाळले पाहिजे, आणि गर्भवती महिलांनी योग्य पोषण सुनिश्चित करण्यासाठी विविध पदार्थांचा एकत्रित संतुलित आहार राखायला हवा.

एकूणच निष्कर्ष काढायचा तर स्वीट कॉर्न खाताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. डायबिटीस असणाऱ्या रुग्णांनी न चुकता प्रमाणावर नियंत्रण ठेवायला हवं/ फायबर समृद्ध असलेल्या स्वीट कॉर्नच्या अतिसेवनाने गॅस किंवा पोट फुगणे अशा समस्या उद्भवू शकतात हे ही लक्षात ठेवा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What nutrition 100 gram sweet corn gives can diabetes patient and pregnant ladies have sweet corn does it spike blood sugar svs
Show comments