मागील लेखात आपण लहान मुलांच्या आहाराबाबत जाणून घेत होतो. नवजात अर्भकाच्या खाण्याबाबत प्रत्येक नवीन पालक सजग असतात. बाळ सहा महिने पूर्णपणे स्तनपानावर अवलंबून असतं. अलीकडेच एक नव्याने आजी झालेल्या काकूंशी भेट झाली. त्यांच्या नवजात नातवाबद्दल कौतुकाने सांगताना त्या म्हणाल्या “ आम्ही तर फक्त तांदूळ भरडीच द्यायचो. आजची बाळं इतकी नाजूक आहेत. आमच्या शिरीषला आम्ही रव्याची  पेजही द्यायचो.  आता म्हणे फक्त आईचं दूध आणि सूर्यप्रकाश!”

त्यांच्या बोलण्यात कुतूहल होतं. आणि त्यांच्या बोलण्यातून समाजातच नवजात अर्भकाच्या आहाराबद्दल अजूनही तेवढी सजगता नसल्याचं अधोरेखित होत होतं. (कारण अशा अनेक आजी , काकू किंबहुना नवमातांनादेखील मी भेटले आहे)

Winter healthy recipe in marathi olya toorichya danyanchi bhaji recipe in marathi
चटकदार व झणझणीत विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी; हिवाळ्यातली अतिशय पौष्टीक रेसिपी एकदा नक्की ट्राय करा
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Atul Save
Atul Save : छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाबाबत अतुल सावेंचं मोठं विधान; म्हणाले, “…तो निर्णय आम्हाला मान्य असेल”
Ragi Satwa Recipe
घरच्या घरी फक्त काही मिनिटांत तुमच्या बाळासाठी बनवा नाचणी सत्व; वाचा साहित्य आणि कृती
eating in a bowl is a good practice Or Not
Malaika Arora: मलायका अरोराने सांगितल्याप्रमाणे बाऊलमध्ये खाणे ‘हा’ एक चांगला पर्याय असू शकतो का? तज्ज्ञ म्हणतात की…
poha rate increase, poha , poha rate, poha pune,
पोहे तेजीत, सामान्यांचा नाश्ता महाग; पोह्यांच्या दरात किलोमागे पाच ते सात रुपयांची वाढ
Pradhan Mantri Poshanshakti Nirman Yojana ,
केळ्यांसाठी शाळांना मिळणार अनुदान… काय करावे लागणार?
alyse ogletree, Breast Milk , newborn baby
अमृततुल्य आईच्या दुधाचे दान करणारी ॲलिसे

स्तनपानाचे महत्त्व फक्त बाळासाठीच नाही तर आईसाठी देखील तितकंच महत्वाचं आहे. बाळाच्या गरजेनुसार स्तनपान करणं आईच्या सुदृढ शरीरासाठी, संप्रेरकांच्या योग्य संतुलनासाठी आवश्यक असतं.

हेही वाचा >>>दररोज चालायला तर जाताय; पण कॅलरीज बर्न होत नाहीयेत! मग फॉलो करा तज्ज्ञांच्या ‘या’ ९ टिप्स…

सुरुवातीला विविध कारणांमुळे स्तनपान ही एक कसरत वाटू शकते. स्तनपानादरम्यान दूध येणं , बाळाने आपसूक स्तनपान करणं , स्तनपानाची शिस्त बाळाला आणि आईला लागणं. या खरंतर सहज वाटणाऱ्या पण कौशल्यपूर्ण प्रक्रियेत अनेक नव्याने आई झालेल्या तरुणींना विविध प्रश्न असतात.

बाळाचं पोट भरतंय का? पहिल्या ४-६ महिन्यात पुरेसं वजन वाढतंय का?

बाळाच्या हालचाली मंदावल्या आहेत का तंदुरुस्त आहेत?, हालचाली करतंय?, वाढ कशी होतेय ? बाळ किती झोपताय या लहान लहान परीक्षणांमध्ये आई -बाबा यांच्याबरोबरीने कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्यांपेक्षा  मानसिक आधाराची नव्या आई बाबांनादेखील आवश्यकता असते.

सहा महिन्यांपर्यंत बाळाच्या भुकेनुसार त्याच्या आहारासाठी आईचं मनस्वास्थ्य उत्तम असणं तिच्या शारीरिक स्वास्थ्याइतकंच महत्वाचं असतं. शक्यतो आईच्या उत्तम आहाराकडे आवर्जून लक्ष पुरवावं.

सहा महिने पूर्णपणे स्तनपानावर अवलंबून असणारं बाळ हळूहळू नवनव्या पदार्थाचा आहारात समावेश करण्यास उत्सुक असतं. हळूहळू बाळाच्या आहारात धान्याची भरडी, डाळींचे पाणी फळांचा समावेश करायला सुरुवात होते.

हेही वाचा >>>उपाशी राहिल्याने खरंच लवकर वजन कमी होते? तज्ज्ञांनी दूर केले १० प्रचलित गैरसमज

खरं तर शिजवलेल्या भाज्यांचाही या वेळेत समावेश करायला हरकत नाही. जितका सकस आहार तितकं बाळ तंदुरुस्त. शिवाय या दरम्यान बाळाची सुद्धा वेगवेगळ्या चवीच्या खाद्यपदार्थांशी ओळख होते. खाण्याची शिस्त आपोआप लागून वेगवेगळ्या अन्नपदार्थांबद्दल बाळ सजग होऊ शकते.  ज्यामुळे वय वाढताना

“आमची चिनू पालेभाजीच खात नाहीये” ही लाडिक तक्रार देखील टाळता येऊ शकते 😉

बाळाच्या आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करणं आणि वेगवेगळी जीवनसत्त्वे बाळाच्या आहारात समाविष्ट कारण आवश्यक असतं. मात्र अज्ञानामुळे किंवा गैरसमजतून किंवा अंधविश्वासातून अनेकदा एक पूर्ण अन्नघटक आहारातून वजा केला जातो.

या गैरसमजांची देखील काही उदाहरणे पाहूयात.

बाळाला फक्त तांदळाची पेज द्यावी.

एक वर्ष तरी बाळ भाज्या पचवू शकत नाही.

बाळाला वर्षभर फक्त गोड पदार्थच द्यावेत.

रव्याची पेज पचायला हलकी असते. 

साखर बाळाला चालते.

बाळाच्या प्रत्येक खाण्यात साखर असावी.

हे सगळे गैरसमज खरंतर कुपोषित आहाराकडे वाटचाल करणारे आहेत.

बाल्यावस्थेत मुलांच्या आहारात योग्य प्रमाणात स्निग्ध पदार्थ असणं , कर्बोदके असणं गरजेचं असतं. हे पोषणघातक आहारात समाविष्ट करताना ते उकडून, शिजवून, तुपात परतवून अशा विविध प्रकारे आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात. एक प्रक्रिया केलेली पांढरी साखर वर्ज्य केली तर बाळ ताजं ,उत्तम शिजवलेल्या डाळी , फळं , सुकामेवा , तृणधान्ये , भाज्या हे  पदार्थ आरामात पचवू शकतं. या सगळ्याची बाळाच्या सुदृढ शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यकता असते. म्हणजे नेमकं काय ?

मुलांची शारीरिक वाढ होणं

त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढणं

मेंदूचं कार्य सक्षम होणं. त्यांच्या वैचारिक क्षमतेत प्रगती होणं

एकाग्रता वाढणं

शरीरात पोषकतत्वांची कमतरता निर्माण न होणं

शारीरिक झीज भरून निघणं

स्नायूंचं आरोग्य उत्तम राहणं

हाडांची झीज भरून काढणं. हाडांची वाढ नीट होणं

त्यांच्या सर्वाधिक ऊर्जा वापरण्याच्या कालावधीत त्यांना उत्तम प्रकारचे अन्न उपलब्ध होणं

त्यांच्या झोपेचं नियोजन उत्तम होणं

शरीरातील आर्द्रता आणि स्निग्धता उत्तम प्रमाणात राहणं

एकदा बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम आहारचं नियोजन करणं जमलं की त्यानंतर बाळाने हाताने खावं, बसून खावं की त्याला भरवावं हे सवयींबाबतचे मुद्दे देखील सहज उलगडू लागतात.

आणि प्रत्येक बाळ अनुकरणप्रिय असतं त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे विशेषतः आई वडिलांच्या आहाराच्या सवयी बाळ आपसूक आत्मसात करत असतं. त्यामुळे आई बाबांचा सकस आहार आणि शिस्तबद्ध खाणं हे सुदृढ बाळाच्या आरोग्याचं गमक आहे हे वेगळं सांगायला नको!

Story img Loader