Monsoon Food & Health: पावसाळा आला की, अनेकांना बाहेरचे पदार्थ, तेलकट पदार्थ, मसालेदार पदार्थ खावेसे वाटतात. परंतु, हा आहार तुमच्या आरोग्याला हानिकारक ठरू शकतो. पावसाळ्यात कोणता आहार घ्यावा, व्यायाम करावा, दिनक्रम कसा असावा, हे माहीत असणे आवश्यक आहे. पावसाळ्यात आजारी पडण्याचेही प्रमाणही वाढत असते. त्यामुळे पावसाळ्यात आहार व्यवस्थित असणे आवश्यक आहे. तसेच घरच्या घरी कोणते व्यायाम करता येऊ शकतात, याविषयी डॉ. मिकी मेहता यांनी मार्गदर्शन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाळ्यातील आहार कसा असावा ?

पावसाळ्यात आहारामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि तंतुमय पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा. पावसाळ्यात पचनशक्ती वाढवणारे आणि ऊर्जा देणारे पदार्थ यांचा समावेश आहारामध्ये असणे आवश्यक आहे. तसेच पावसामध्ये डिहायड्रेशनसुद्धा होऊ शकते. त्यामुळे ऋतुमानानुसार उपलब्ध असणाऱ्या फळांचा आहारामध्ये समावेश करावा.

हेही वाचा : आजचे गुगल डूडल आणि पाणीपुरीचा रंजक इतिहास; पाणीपुरी पदार्थ आला कुठून ?

पावसाळ्यात आहार घेताना योग्य मिश्रण करावे म्हणजे ‘कॉम्बिनेशन’ योग्य असावे. आहारात व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि तंतुमय पदार्थांचा समावेश असावा. मनुका, मध आणि खजूर यांचे सेवन करावे. सुक्या मेव्यांमध्ये ऊर्जा देणारे घटक असतात. तांदूळ, डाळ, पोळी आणि भाज्या ताज्या असाव्यात. शक्यतो अन्न शिजवल्यानंतर तासाभरातच खावे. पालेभाज्या टाळा. पावसाळ्यात साल काढता येते अशा भाज्यांचा समावेश करा. कडधान्य, क्लस्टर बीन्स, गाजर, मटार, ब्रोकोली आणि कडधान्ये यांसारख्या फायबर समृद्ध असलेल्या भाज्या घ्या. काकडी, टोमॅटो, बीन्स, भेंडी आणि मुळा यांचाही भाज्यांमध्ये समावेश होतो. या भाज्या प्रतिकारशक्ती सुधारतात. बीटरूट्सचे सेवन रक्तदाब कमी करण्यास, अशक्तपणा टाळण्यास मदत करते. पावसाळ्यात आहारामध्ये बाजरी असावी. बाजरी हा चांगला पर्याय आहे.
पावसाळ्यातील पेयांमध्ये सूपचा समावेश करावा. काळी मिरी, आले किंवा आले पूड आणि लसूण यांचा समावेश असणारे सूप घ्या. सॅलड चांगले वाफवून मगच घ्यावे. लेमन ग्रास, पुदिन्याची पाने, ताजी चहाची पाने, आले, लवंगा, तुळशीची पाने आणि सेंद्रिय गूळ यांचा आहारामध्ये समावेश करावा. यासह औषधी वनस्पतींचे मिश्रण करा. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

हेही वाचा : मिठाचा खडा टाकणारे शकुनीमामा आहेत तरी कोण ? ‘शकुनीमामा’ला नकारात्मक वलय का मिळाले ?

पावसाळ्यात कोणती फळे खावीत ?

पीच: हे पचन सुधारण्यास मदत करते. हे फळ हृदय, डोळ्यांसाठी चांगले असते आणि प्रतिकारशक्ती वाढवते. अभ्यासानुसार, पीच किंवा पीच फ्लॉवर अर्क त्वचेला ओलावा टिकवून ठेवण्यास आणि स्थानिक पातळीवर लागू केल्यावर अतिनील हानी कमी करण्यास मदत करू शकतात.
चेरी: चेरीमधील अँटिऑक्सिडंट्स घटक असतात. चेरी कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब कमी करण्यासाठीदेखील खूप प्रभावी आहे. चेरी असणारे पदार्थही तुम्ही खाऊ शकतात.
डाळिंब: हे पावसाळ्यात मिळणारे फळ आहे. सर्दी आणि ताप आला असल्यास या पदार्थाचे सेवन करावे. डाळिंबही अँटिऑक्सिडंट् आहे. संधिवात असलेल्यांसाठी हे उपयुक्त आहेत, तसेच डाळिंबामुळे रक्तदाबदेखील नियंत्रित होतो.
मनुका: व्हिटॅमिन, लोह, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि इतर पोषक घटकांमुळे, मनुका हे पावसाळ्यातील सर्वोत्तम फळांपैकी एक मानले जाते. हे फळ अतिसारावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, ते श्वसन समस्या दूर करण्यास मनुका उपयुक्त आहेत.

हेही वाचा : Monsoon Skincare : पावसाळा आणि त्वचेचे आजार; ‘हे’ उपाय तुमची त्वचा ठेवू शकतात निरोगी…

पावसाळ्यात व्यायाम कसा करावा ?

पावसाळ्यात सर्वसाधारणतः घाम येत नाही. तसेच बाहेर जाऊन चालणे, धावणे आदी व्यायामप्रकार करता येणे शक्य होत नाही. पावसाळ्यात एकदम खूप व्यायाम करण्यापेक्षा सौम्य व्यायाम, योगासने करावीत. घरच्याघरी सूर्यनमस्कार घालू शकता. पवन मुक्तासन, सेतू बंधनासन, पश्चिमोत्तानासन आणि ताडासन यासारखी योगासनेदेखील करू शकता. अनुलोम-विलोम सारख्या प्राणायामाने व्यायामाची सुरुवात करा. भस्त्रिका आणि शवासनाने व्यायाम करणे थांबवा.
घरच्या घरी जॉगिंग, स्पॉट जम्पिंग (एकाच जागी उड्या मारणे), जिन्यावरून चढ-उतार करणे करू शकता. पावसात सायकलिंगही करू शकता.

सर्वच ऋतूंमध्ये आरोग्य सांभाळणे आवश्यक असते. ऋतुमानानुसार आहार-विहारात बदलही करावे लागतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What should be the diet and routine in monsoon what foods will be included in the diet vvk
Show comments