डॉ. जाह्नवी केदारे
कोविड सुरू झाला आणि प्रत्येक मुलाच्या हातात हक्काचा मोबाइल, टॅब किंवा लॅपटॉप दिसायला लागला. मग तो सहा वर्षांचा पहिलीतला मुलगा असो किंवा नववीतली मुलगी असो. शाळाच ऑनलाइन होती! त्यामुळे ही उपकरणे हक्काची झाली. शाळेपासून ते नोकरी करणाऱ्यांपर्यंत सगळेजण ‘डिजिटल’ झाले. अभ्यास, वर्क फ्रॉम होम, मनोरंजन, खेळ, बातम्या, एकमेकांशी संवाद, खरेदी, खाणेपिणे सगळे काही डिजिटल! लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांची मदार डिजिटल उपकरणांवर होती!

कोविडची साथ सरली, पण डिजिटल उपकरणांचा प्रभाव तसंच कायम राहिला. सगळ्यांच्याच आयुष्यात डिजिटल उपकरणांनी गारुड केले, तिथे मुलांची काय बात!

good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला मोबाईलचा वापर घरोघरी सुरू झाला आणि मुलांची पहिल्यांदा स्मार्टफोनशी ओळख झाली. पालकांनासुद्धा मुलांना गाणी ऐकवणे, व्हीडिओ दाखवणे, गोष्टी स्मार्ट फोनवर लावणे या गोष्टी करताना फार सोयीचे वाटायला लागले. आपल्या मुलाने कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी उगाच दंगामस्ती करू नये यासाठी पालकांकडे स्मार्ट फोन हे एक चांगले साधन मिळाले! अगदी डॉक्टरकडे गेल्यावरसुद्धा नंबर लागेपर्यंत फोनवर गेम किंवा विडिओ किंवा गाणे सुरू करून दिले की झाले काम! मूल एका जागी बसून जेवत नाही, तर लावा हलते बोलते चित्र डोळ्यासमोर की ते खिळल्यासारखे होते आणि घासही पटापट भरवले जातात!

आणखी वाचा-Health Special: उन्हाळ्याची झळ – काय काळजी घ्याल ?

नेहमीच ‘काय स्मार्ट आहे आमचा मुलगा! आत्ताशी तीन वर्षांचा आहे, पण स्क्रीन लॉक उघडतो, यू ट्यूब सुरू करतो आणि आवडते गाणे लावतो!” असे कौतुक! ‘पाचवीपासूनच माझ्या मुलीला मी मोबाइल घेऊन दिला. काय करणार? सगळ्या क्लाससेसचे टाइम टेबल सांभाळायचे, तिला एक ठिकाणाहून दुसरीकडे न्यायचे की फोन बरा पडतो!” असेही आपण म्हणू लागलो. काहीसे कौतुकानेच आईवडील सांगू लागले,’ चक्क १६ वर्षे वय दाखवून फेसबुकवर अकाऊंट उघडला त्याने!’

इथपासून मुलांच्या आणि पालकांच्या डिजिटल प्रवासाला सुरूवात झाली. आता तो प्रवास, ‘काय करू, सतत ही मुले मोबाइल मध्ये बुडालेली असतात, सतत चॅटिंग, गेमिंग, सर्फिंग आणि काय काय सुरू असते देवस ठाऊक!’ इथपर्यंत येऊन पोहोचला आहे.

कोव्हिडमध्येसुद्धा लॉगइन करून ठेवायचे आणि एकीकडे गेम खेळायचा असे रोहनने सुरू केले होते. आता तर काय जेवताना, झोपताना, शाळेतून घरी आल्यावर, सतत त्याच्या हातात मोबाइल असतो. कशी सवय मोडायची त्याची?!’ अशी त्याची आई तक्रार करत होती. प्रतीकचे बाबा सांगत होते, “अहो, काय सांगू? सकाळची ७ वाजताची याची शाळा, रात्री १ वाजला तरी pub-g मध्ये घुसलेला असतो. कसं उठणार वेळेवर?!” मुलांना लागलेली मोबाइल वापरण्याची सवय ही पालकांच्या दृष्टीने मोठी समस्या बनली आहे. या डिजिटल युगामध्ये आपल्या मुलांच्या डिजिटल उपकरणांच्या विशेषतः मोबाइलच्या अति वापरावर नियंत्रण कसे ठेवायचे हा मोठा प्रश्न अनेक पालकांना पडलेला असतो.

आणखी वाचा-Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

‘मोबाइलवरच्या कित्येक गोष्टी मलाच समजत नाहीत. मी काय माझ्या मुलीला सांगणार. प्रत्येक गोष्ट मीच तिला विचारून करते’. असे अनभिज्ञ राहून आता चालणार नाही! मोबईल मधील तांत्रिक बाबी, apps, त्यांचा वापर याचे ज्ञान ही असेल हवे. त्याचबरोबर सुरक्षेच्या यंत्रणा (security and privacy measures), पालकांचे नियंत्रण (parental control), apps च्या परवानगी मधल्या विविध अटी या गोष्टी माहीत करून घ्यायला हव्या. पण केवळ अशा parental control ने मुलांचा मोबाइल वापर कमी होत नाही. डिजिटल पालकत्वची काही कौशल्ये शिकून घ्यावी लागतात.

पालकांनी अंतर्मुख होऊन स्वतःच्या मोबाइल वापरकडे लक्ष दिले पाहिजे. मुले आपल्याला काही सांगत असताना आपण whatsapp वरचा विनोद वाचून आपल्याशीच हसतो का? जेवताना एकीकडे emails बघतो का? किंवा आलेल्या फोन वर लांबलचक संभाषण करत बसतो का? रात्री झोपताना अंथरूणात पडल्या पडल्या आपला स्क्रीन सुरू असतो की बंद? रस्त्याने चालताना , गाडी चालवताना किती वेळा फोनचा वापर केला जातो? माझ्या मुलांसामोर मी किती वेळ गेम खेळात बसते (उदा. candy crush)? ह्या प्रश्नांची उत्तरे स्वतःलाच विचारली पाहिजेत. लहानपणापासून मुले आपले अनुकरण करीत मोठी होतात. मोबाइल वापर बाबतीत देखील आपलाच आदर्श ती डोळ्यासमोर ठेवतात.

आणखी वाचा-Health Special: रंगपंचमीला कोणते रंग वापराल? रंगांचा त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

मग पालक म्हणून ‘आदर्श’ वागणूक काय? एक तर कुटुंबातल्या सगळ्यांना सारखेच नियम. उदाहरणार्थ, जेवताना, झोपताना, सकाळी उठल्या उठल्या, गृहपाठ करताना, समोरची व्यक्ती आपल्याशी बोलताना मोबाइल दूर ठेवणे. विशेषतः झोपताना फोन दूर ठेवणे महत्वाचे आणि एका विशिष्ट वेळेला झोपणे ही महत्वाचे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांबरोबर मोबाइल वापरावर चर्चा करणे, किती वेळ योग्य, काय काय करायला परवानगी आहे, कुठल्या गोष्टी पालकांना विचारूनच करायच्या या मध्ये स्पष्टता असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर phishing, cyber bullying, sexual exploitation अशा धोक्याच्या गोष्टींविषयी मुलांना जागरुक करणे आणि अशा कोणत्याही घटनेमध्ये आपण मदतीसाठी उपलब्ध आहोत असे आश्वस्त करणे खूप गरजेचे असते.

नियमांचे काटेकोरपणे पालन करून घेताना आणि स्वतः पालन करताना आपल्या मुलांशी गप्पा मारणे, वेळ घालवणे, संवाद साधणे हे फार महत्वाचे. त्यांच्याच मदतीने त्याच्या फावल्या वेळचे नियोजन उपयोगी ठरते. मोबाइल गेम खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळायला मुलांना उद्युक्त करावे. आपल्या मुलाची मोबाइल अतिवापरची सवय बदलावी यासाठी कुटुंबाला एकवाक्यता निर्माण करावी लागेल, पालकांना स्वतःच्याही सवयी बदलाव्या लागतील. तरच यशस्वी डिजिटल पालक होता येईल.