Weight according to height and Age: सध्याच्या काळात बदलती जीवनशैली आणि उच्च कॅलरीयुक्त पदार्थांनी वजन वाढतंय अशा तक्रारी करणारे लोक आपण भरपूर पाहतो. आजकाल शरीराचे वाढते वजन ही एक गंभीर समस्या आहे. वाढत्या वजनामुळे अनेक आजार माणसाच्या शरीराला पोकळ बनवू लागतात. त्यामुळे आपले वजन नियंत्रित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वयानुसार शरीराच्या वजनात चढउतार होणे सामान्य आहे. तरीही तुमच्या शरीराचे वजन अचानक वाढायला लागलं तर चिंता होणं सहाजिक आहे. वजन नेमकं किती असावं याची माहिती सगळ्यांनाच नसते. खूप जणांना वजन वाढलं की टेन्शन येतं. प्रत्येकाचे वय ​​आणि उंचीनुसार योग्य वजन असणे आवश्यक असते. वय ​​आणि उंचीनुसार आपलं वजन काय असावे, हे जाणून घेतलं तर तुमच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर असतं. मुंबई येथील भाटिया हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. अभिषेक सुभाष यांनी तुमचे वय ​​आणि उंचीनुसार योग्य वजन किती हवं, जेणेकरून तुम्ही फिट राहाल, याविषयी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

तज्ज्ञ म्हणतात की, एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा प्रकार, त्याची जीवनशैली आणि ते एका दिवसात करू शकतील अशा शारीरिक हालचालींशी संबंधित आहे. तरीही, योग्य उंची-वजन गुणोत्तर जाणून घेऊन, तुम्ही तुमचे वजन मर्यादित करू शकता; ज्यामुळे तुम्हाला लठ्ठपणासारख्या जीवनशैलीतील आजारांपासून दूर राहता येईल. कारण प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या उंचीनुसार वजन राखले पाहिजे. आपण हे करू शकलो नाही तर अनेक आजारांना आपण आमंत्रण देत असतो. अनेकांना त्यांच्या उंचीनुसार वजन किती असायला हवे हे माहीत नसते. ही गणना सामान्यतः बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) वर आधारित असते, जे एक सामान्य साधन आहे; जे एखाद्या व्यक्तीच्या उंचीच्या संबंधात त्याचे वजन मोजते. BMI ही एक सामान्य पद्धत आहे, जी एखाद्या व्यक्तीच्या उंची आणि वयानुसार त्याच्या वजनाचा अंदाज लावते. Body mass index च्या मदतीने तुम्ही तुमच्या उंचीनुसार वजन ठरवू शकता. जसे की, खालील तक्ता पाहा…

What is Ideal Weight as per Age and Height chart Check if Your Weight is Perfect With Easy to Understand charts
तुमच्या वयानुसार तुमचे वजन किती हवे? आजारांना दूर ठेवा, परफेक्ट बॉडीसाठी ‘हा’ सोपा तक्ता पाहा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Benefits Of Consuming Raw Onion
Onion Benefits: कच्चा कांदा आरोग्यासाठी आहे बहुगुणी; ‘हे’ फायदे जाणून व्हाल हैराण
Bigg Boss Marathi Suraj Chavan And Jahnavi Reel Video
Video : सूरजसह गावच्या शेतात रमली जान्हवी किल्लेकर! चक्क ट्रॅक्टरही चालवला; नेटकरी म्हणाले, “भावा-बहिणीचं नातं…”
Zee Marathi Awards 2024 full Winners List Part 1 and Part 2
Zee Marathi Awards : यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली ‘पारू’! तर, लोकप्रिय नायक-नायिका आहेत…; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
Devdutt Pattanaik
UPSC Essentials: हत्तींपासून रामायणापर्यंत भारताने जगाला काय दिले? काय सांगतो भारताच्या समृद्ध व्यापाराचा इतिहास?
BJP Candidate List for Maharashtra Vidhan Sabha Election 2024
BJP Candidate List : भाजपाकडून १४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर!
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
  • १८.५ पेक्षा कमी BMI म्हणजे एखाद्या व्यक्तीचे वजन कमी आहे.
  • १८.५ ते २४.९ मधील बीएमआय निरोगी वजन दर्शवतो.
  • २५ ते २९.९ मधील बीएमआय जास्त वजन आहे.
  • ३० पेक्षा जास्त बीएमआय लठ्ठपणा दर्शवतो.

(हे ही वाचा: दररोज ३० मिनिटे सायकल चालविल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डाॅक्टरांकडून जाणून घ्या…)

तथापि, डॉ. अभिषेक सुभाष यांच्या मते, “BMI ही वजन मापनाची एक भ्रामक आणि चुकीची संकल्पना आहे आणि बीएमआय कॅलक्युलेटरवर फारच कमी अवलंबून राहावे, असे त्यांचे मत आहे. बीएमआय डॉक्टर किंवा जीवशास्त्रज्ञाने तयार केलेला नाही. हे एका गणितज्ञाने विकसित केले होते. BMI च्या विविध समस्या आहेत. जसे की ते स्नायूंच्या वस्तुमान, हाडांची घनता किंवा एकूण शरीर रचना आणि जातीय आणि लिंग भिन्नतादेखील विचारात घेत नाही,” असे डॉ. अभिषेक यांनी indianexpress.com ला सांगितले.

एखाद्या व्यक्तीच्या तंदुरुस्ती आणि आरोग्याला अधिक महत्त्व देताना डॉ. अभिषेक यांनी सामायिक केले की, “BMI कॅलक्युलेटर, उंची आणि वजन स्केलवर कमी विश्वासार्हता असावी, हे फक्त आकडे आहेत. या आकड्यांऐवजी, लोकांनी त्यांच्या आरोग्यावर आणि फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे, जे त्यांच्या उंची आणि वजनाने निश्चितपणे निर्धारित होत नाही. लोकांनी त्यांची तंदुरुस्तीची पातळी कशी आहे आणि ते कोणत्याही अडचणीशिवाय त्यांची दैनंदिन कामे साध्य करण्यास आणि पूर्ण करण्यास सक्षम आहेत की नाही हे पहावे. त्यांना योग्य आहार, योग्य हालचाल आणि पुरेशी झोप मिळत आहे का, याचे त्यांनी विश्लेषण आणि आत्मपरीक्षण केले पाहिजे,” असे डॉ. अभिषेक म्हणाले. तरीही डॉ. अरविंद यांनी नमुना उंची ते वजन गुणोत्तर सूचिबद्ध केले होते.

उंचीनुसार आपले आदर्श वजन किती असावे?

उंची ४ फूट १० इंच वजन ४१ ते ५२ किलो
उंची ५ फूटवजन ४४ ते ५५.७ किलो
उंची ५ फूट २ इंचवजन ४९ ते ६३ किलो
उंची ५ फूट ४ इंचवजन ४९ ते ६३ किलो
उंची ५ फूट ६ इंचवजन ५३ ते ६७ किलो
उंची ५ फूट ८ इंचवजन ५६ ते ७१ किलो
उंची ५ फूट १० इंचवजन ५९ ते ७५ किलो
उंची ६ फूटवजन ६३ ते ८० किलो

वयानुसार आपले आदर्श वजन किती असावे?

वयानुसार वजनमुलाचे वजनमुलीचे वजन
१९-२९ वयोगट८३.४ किलो७३.४ किलो
३०-३९ वयोगट९०.३ किलो ७६.७ किलो
४०-४९ वयोगट९०.९ किलो७६.०२ किलो
५०-६० वयोगट९१.३ किलो७७ किलो

Story img Loader