Weight according to height and Age: सध्याच्या काळात बदलती जीवनशैली आणि उच्च कॅलरीयुक्त पदार्थांनी वजन वाढतंय अशा तक्रारी करणारे लोक आपण भरपूर पाहतो. आजकाल शरीराचे वाढते वजन ही एक गंभीर समस्या आहे. वाढत्या वजनामुळे अनेक आजार माणसाच्या शरीराला पोकळ बनवू लागतात. त्यामुळे आपले वजन नियंत्रित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वयानुसार शरीराच्या वजनात चढउतार होणे सामान्य आहे. तरीही तुमच्या शरीराचे वजन अचानक वाढायला लागलं तर चिंता होणं सहाजिक आहे. वजन नेमकं किती असावं याची माहिती सगळ्यांनाच नसते. खूप जणांना वजन वाढलं की टेन्शन येतं. प्रत्येकाचे वय आणि उंचीनुसार योग्य वजन असणे आवश्यक असते. वय आणि उंचीनुसार आपलं वजन काय असावे, हे जाणून घेतलं तर तुमच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर असतं. मुंबई येथील भाटिया हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. अभिषेक सुभाष यांनी तुमचे वय आणि उंचीनुसार योग्य वजन किती हवं, जेणेकरून तुम्ही फिट राहाल, याविषयी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा