– पल्लवी सावंत- पटवर्धन
दर वर्षी सगळ्यांना उन्हाळ्यात वेध लागतात आंब्याचे आणि आम्हा आहारतज्ज्ञांना आंब्याबद्दलच्या नवनव्या शोधांचे, माहितीचे आणि पोषक-ट्रेण्डस् चे! या वर्षी आनंदाची गोष्ट अशी की, सगळ्यात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या फळांच्या राजाने गट हेल्थ (gut health) म्हणजेच आतड्यांच्या आरोग्यवर्धनात बाजी मारली आहे. म्हणजे आंबा खाणाऱ्या व्यक्तींमध्ये आतड्यातील उपयुक्त मायक्रोबायोमचे आवरण आणखी मजबूत होते असा शोधनिबंध अलीकडेच प्रसिद्ध झालेला आहे. मी तो वाचला आणि वर्षानुवर्षे प्रचलित असणाऱ्या समजाला पुष्टी मिळाल्याचा आनंद माझ्यातल्या पोषणतज्ज्ञाला झाला. आंबा आणि त्यानिमित्ताने घडणारे विविध संवाद सगळेच डोक्यात फेर घालू लागले. अलीकडेच घडलेला किस्सा सांगते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सेशन सुरू असताना रीमा मध्येच काहीतरी विचार करत होती. मी तिला थोडं भानावर आणत विचारलं,
मी : “काय झालं ? एकदम विचारात?” ती हसून थोडं अवघडून म्हणाली,
रीमा : “म्हणजे… आता आंबे आलेत मार्केटमध्ये, आणि मला आंबा न खाता डाएट करणं थोडं अवघड वाटतंय.”
मी : “इतकं काही अवघड नाहीये अगं. दररोज ‘फक्त’ आंबे खात नाही आपण, जेवण जेवणार… आणि तुझ्या डाएटमध्ये आंबा असणार आहे. त्यामुळे चिल!”
रीमा : “बोलायला सोपं आहे, करायला अवघड. आता कुठे शुगर आलीये आटोक्यात! गेल्या वर्षी …
मी : “आपण मँगो आईस्क्रीम नाही खाणार आहोत,” रीमानं हसत मान्य केलं आणि म्हणाली,
रीमा : “हो, पण मला एकावर नाही थांबता येत.”
मी : “म्हणजे? साधारण किती आंबे खाऊ शकतेस तू?”
रीमाने माझ्याकडे अविश्वासाने पाहिलं आणि म्हणाली, “किमान दोन.”
मी : “दोनच ना?”
रीमा : “मॅडम, तुम्हीच कार्ब्स मोजता ना, आणि मला आता सवय झालीये.”
मी : “सवय चांगली आहे, फक्त योग्य वेळ महत्त्वाची आहे,” मी असं म्हणताच रीमाचे डोळे चमकले.
“उलट तुझा थकवा निघून जाईल.”
रीमाने उत्साहाने ऐकायला सुरुवात केली.
मी : “फक्त खाण्याआधी अर्धा तास आंबा पाण्यात ठेव आणि हळूहळू खा.”
रीमा : “नोटेड!!”
मी : “घाई नको. सोबत शक्यतो बाकी काही नको.”
रीमा : “ठरलं! किमान २-३ तास गॅप?”
मी : “बरोबर. आणि जेवण आहेच पण जितकी भूक तेवढंच खायचंय.”
रीमा : “ओके!! मी रोज सलाड खाईन न चुकता!” रीमाला हुरूप आला.
आमचं पुढचं बोलणं तिने तितक्याच उत्साहात आणि समाधानाने ऐकलं आणि जाताना मला कडकडून मिठी मारली.
हेही वाचा – दुपारच्या वेळेत वर्कआउट केल्यास हृदयविकाराचा धोका होतो कमी? वाचा डॉक्टर काय सांगतात
प्रत्येक उन्हाळ्यात आंबा खायचा तर आहे; पण कसा? यावर प्रत्येकाला अनेक प्रश्न पडतात. अनेकदा प्रश्नापेक्षा अपराधीपणा जास्त असतो. मधुमेह (डायबिटीस) असेल तर आणखी भीती. परंतु या फळांच्या राजाला संयमाने आहारात विराजमान केलं, तर आंबा गुणकारी फळ आहे! बाजारपेठांमध्ये हापूस, केशर, लंगरा, दशहरी, पायरी असे विविध प्रकारचे आंबे सध्या मिळत आहेत. आंब्याचा गंध, चव आणि खाल्ल्याने मिळणारे समाधान विशेष! तर या फळांच्या राजाबाबत आज आपण आणखी माहिती घेऊ या.
सुरुवात (आवडत्या) कॅलरीजपासून करू या. एका आंब्यामध्ये साधारण १०० कॅलरीज ऊर्जा मिळते. याचसोबत पोटॅशिअम, लोह आणि फॉलिक अॅसिड मुबलक असते. सध्या उष्माघात आणि त्यामुळे येणाऱ्या थकव्यावर मात करण्यासाठी आंबा उत्तम फळ आहे. आंब्यामध्ये असणाऱ्या कर्बोदकांचे प्रमाण आणि त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण यांचे सख्य आहेच. त्यामुळे काही सोपे नियम पाळल्यास आंबा आरोग्यदायी आहे.
- आंबा किमान अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवावा. यामुळे त्यातील फायटेट्स कमी होऊन आंबा पचनासाठी हलका होतो.
- पाण्यात भिजवून ठेवल्यामुळे आंब्याचा उष्मांक कमी होतो.
- त्यातील साठवणीच्या पदार्थांचा अंश कमी होतो.
अनेकदा डाएट करताना आमरस किंवा मिल्कशेक कधी पिता येईल, हा प्रश्न हमखास विचारला जातो. खरे तर आंबा हे असे फळ आहे की, तुम्ही त्याचा रस दुधासोबत खाल्ल्यास शरीराला अपाय होत नाही. फक्त या दोनपैकी कोणत्याही प्रकारात साखरेचा वापर कटाक्षाने टाळावा. शिवाय व्यायाम चुकवू नये.
मी नेहमी म्हणते, आंबा हे फळ सगळ्या जीवनसत्त्वांच्या बाराखडीचे मूळ आहे. अ, ब, क – जीवनसत्त्वांची खाण, ऊर्जेचा अमाप स्रोत. नेमकी ओळख करून घेवू फळांचा राजा आहे तर कसा! आंब्यातील ब जीवनसत्त्वे त्यातील अँटिऑक्सिडंटचे प्रमाण उत्तम ठेवतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
आंब्यामध्ये असणारे ब-६ जीवनसत्त्व झोपेसाठी पूरक मेलॅटोनीन नावाचे संप्रेरक तयार करते. त्यामुळे शांत झोप लागते. इथे गमतीने, सकाळपासून रात्रीपर्यंत आंबा अत्यंत उपयुक्त आहे, असे म्हणायचा मोह होतोय. परंतु आंब्याचे अतिसेवन टाळावे. शिवाय, जर डायबिटीस असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने कर्बोदकांचे प्रमाण योग्य राखत आंबा खाणे उत्तम.
आहारशास्त्रामध्ये आंब्याचा रक्तातील शर्करेवरील प्रभाव प्रमाणात राहावा यासाठी सोबत योग्य प्रमाणात प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ समाविष्ट करणे आवश्यक आहे. आमरस खाताना त्यात एक चमचा तूप, तेलबियांचा समावेश करावा. आंबा खाऊन पोट बिघडल्याचेदेखील ऐकिवात आहे. आंब्यामध्ये तंतुमय पदार्थ- फायबर आहेच त्यामुळे अतिरिक्त प्रमाण घातक ठरू शकते. आणि हे सगळ्या वयोगटांना लागू आहे. आंबा आणि भुकेसाठी पूरक संप्रेरक – लेप्टीन यांचे सख्य आहे. म्हणजे काय? तर तुम्हाला भुकेची नेमकी जाणीव करून देण्यात म्हणजे भूक लागणे, खाणे आणि भूक शमणे या प्रक्रियेमध्ये संतुलन साधण्यासाठीदेखील आंबा गुणकारी आहे.
आंबा अनेक आरोग्यवर्धक जीवनसत्त्वांनी आणि पोषणमूल्यांनी युक्त आहे. त्यात आढळणारे मंगिफेरीन (mangiferin) मंगिफेरॉनिक अॅसिड, पॉलीफेनॉल, कॅरोटीन म्हणजे शरीरातील पेशींच्या रक्षणासाठी महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे शरीरातील पेशींच्या आवरणाला बळ मिळते आणि स्वास्थ्य टिकून राहते. आंब्याची कोय, पाने, आंब्याचे खोड आणि साल या सगळ्यांनाच आहारशास्त्रामध्ये महत्त्व आहे. तारुण्यपीटिका, आतड्याचे विकार, अपचन, मधुमेह या विकारांवर उपचार म्हणून कैरीची पावडर, आंब्याच्या पानांची पावडर वापरली जाते. सर्वच बाबतीत राजा असणारे हे फळ वर्षानुवर्षे आयुर्वेदिक आणि वैद्यकीय क्षेत्रात अभ्यासाचा विषय आहे. या वर्षीच्या संशोधनामुळे आंब्याच्या चाहत्यांना आनंदाने आंबा खाता येईल हे निःसंशय!