कुंकवाची ॲलर्जी ही तशी एक सर्वसाधारण ॲलर्जी आहे व ती बऱ्याच जणांमध्ये दिसून येते. भारतामध्ये तर कुंकू किंवा गंध किंवा टिकली बरेचजण सामाजिक किंवा धार्मिक कारणासाठी वापरतात. कपाळावरचे लाल कुंकू तसेच भांगामधील कुंकू हे तर विवाहितेचं व्यवच्छेदक लक्षण मानलं जातं. या कल्पना समाजमनावर एवढ्या बिंबलेल्या आहेत की त्यामुळे एखाद्या विवाहितेला कुंकवाची ॲलर्जी असेल तरी ते बंद करणे तिला शक्य होत नाही व त्यामुळे आजार जास्त होत जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कुंकू किंवा गंधाची ॲलर्जी ही त्यामध्ये असलेली हळद किंवा रंग प्राप्त होण्यासाठी वापरलेली रसायने ( Sudan-1, 4-aminoazobenzene, brilliant lake red R and cananga oil ) यामुळे होते, तर टिकलीची ॲलर्जी ही त्यासाठी वापरलेल्या चिकट गोंदाची असते. काही जण जे धार्मिक कारणासाठी चंदन कपाळावर किंवा अंगावर लावतात त्या चंदनाची देखील क्वचितच ॲलर्जी येऊ शकते.
हेही वाचा : ‘या’ बियांच्या सेवनाने झपाट्याने वजन होईल कमी? कधी व किती सेवन करावे समजून घ्या तज्ज्ञांकडून…
कुंकवाच्या ॲलर्जीची लक्षणे काय?
कुंकू किंवा पिंजर किंवा टिकली लावलेल्या जागी म्हणजेच कपाळावर किंवा भांगांमध्ये लालसर पुरळ येते. त्याला खाज येते. तिकडचा भाग थोडासा सुजतो. यानंतरदेखील कुंकू किंवा टिकली लावणे चालूच ठेवले तर तेथून लस येऊ लागते व तो भाग चिघळतो. कधी कधी तिथे जंतूसंसर्ग होऊन तो भाग जास्त सुजतो व दुखू लागतो. काही जणांना अशाप्रकारे म्हणावे तसे पुरळ येत नाही. पण कुंकू लावलेला व थोडा सभोवतालचा भाग काळा पडतो. ज्या स्त्रीला कुंकू किंवा टिकलीची ॲलर्जी येते ती स्त्री कुंकू त्या जागेच्या वर किंवा खाली लावायला सुरुवात करते. पण ती ॲलर्जी रक्तामध्येच असते. त्यामुळे जिकडे कुंकू लावावे तिकडे ती ॲलर्जी सुरूच राहते. ही ॲलर्जी सुरुवातीपासून नसते. ती काही महिने किंवा कित्येक वर्षानंतरदेखील सुरू होऊ शकते. काही स्त्रियांना टिकली लावलेल्या जागी कोडासारखा सफेद डाग येतो. हा डाग येण्याआधी तिथे काही जणांना पुरळ येते. तर काहीजणांना पुरळ न येता नुसताच डाग येऊ शकतो. टिकलीमध्ये चिकटपणासाठी वापरलेल्या p-tertiary butyl phenol या रसायनामुळे असा डाग पडतो. टिकली वापरणे चालूच ठेवले तर हा डाग सभोवताली वाढतोच पण शरीरावर अन्य भागावरदेखील सफेद डाग येऊ शकतात. अशा प्रकारे ॲलर्जीमुळे आलेल्या पांढर्या डागाचे कोडामध्ये परिवर्तन होऊ शकते. म्हणून अशा वेळी योग्य उपचार तातडीने करावेत.
हल्ली पुरुषांमध्ये गंध लावण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांनादेखील ही ॲलर्जी होऊ शकते. कपाळाप्रमाणे गळ्यापाशी देखील चंदन किंवा गंध लावल्यामुळे हे चट्टे दिसू शकतात.
हेही वाचा : गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी आशेचा किरण! पूर्ण गुडघ्याऐवजी फक्त घर्षण झालेला भाग बदलून उपचार
कुंकवाची किंवा टिकलीची ॲलर्जी असल्यास काय करावे?
कुठल्याही गोष्टीची ॲलर्जी आल्यास ती गोष्ट टाळणे हे सर्वात महत्वाचे असते. परंतु सामाजिक व धार्मिक कारणांमुळे ॲलर्जी समोर दिसत असून देखील ती व्यक्ती गंध , कुंकू, पिंजर किंवा टिकलीचा वापर टाळण्यास राजी नसते. या ॲलर्जीसाठी डॉक्टर स्टिरॉईडचे मलम व खाज कमी करण्यासाठी ठराविक गोळ्या देतात. त्यांनी ते कमी न झाल्यास स्टिरॉईडच्या गोळ्या देखील घ्याव्या लागतात. ज्या स्त्रियांना कुंकवाची किंवा पिंजरची ॲलर्जी असते त्यांना टिकलीची ॲलर्जी असतेच असे नाही. तसेच ज्या स्त्रियांना टिकलीची ॲलर्जी आहे त्यांना कुंकवाची किंवा पिंजरची ॲलर्जी असेलच असे नाही. त्यामुळे गंध किंवा पिंजरची ॲलर्जी असल्यास टिकली वापरून पहावी किंवा टिकलीची ॲलर्जी असल्यास गंध किंवा पिंजर वापरून पहावे. पण आधीची ॲलर्जी चालू असतानाच त्याच्याच वर दुसरा पर्याय वापरून पाहिला तर त्या दुसऱ्या पर्यायाला देखील ॲलर्जी सुरू होऊ शकते. त्यामुळे दुसरा पर्याय हा आधीची ॲलर्जी कमी झाल्यानंतर व तेही त्या जागेच्या वरती किंवा खाली चांगल्या त्वचेवर वापरून पाहावा. तसेच बाजारात ॲलर्जी न येणारा पातळ कुंकवाचा प्रकार ( non allergic and non staining liquid kumkum ) किंवा पिंजर उपलब्ध असतात. ते वापरून पाहावे. आणखी एक पर्याय म्हणजे कुंकवाच्या बदली लाल रंगाच्या मार्कर पेनचा रंग किंवा ओठाला लावण्याची लाल रंगाची लिपस्टिक लावून पाहावी. यामधली रसायनं ही कुंकू किंवा पिंजरच्या रसायनापेक्षा थोडी वेगळी असतात. त्यामुळे ॲलर्जी येण्याची शक्यता कमी राहते. आणखी एक सोपा उपाय म्हणजे लाल रंगाचा घोटीव पेपर घेऊन त्याच्या पंचिंग मशीनच्या सहाय्याने टिकल्या पाडाव्यात व ही टिकली चांगल्या प्रतीच्या मेणाच्या वरती लावावी.
हेही वाचा : १०० ग्रॅम चवळीच्या भाजीत दडलंय काय? वजन, कोलेस्ट्रॉल कमी करताना कशी होते मदत, खाल्ल्यावर एवढं करा की..
टिकली खाली सफेद डाग आला असल्यास टिकली लावणे लगेच बंद करावे व त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. डाग नुकताच आला असेल तर मलम व गोळ्या घेऊन कमी होतो. पण नाहीच गेला तर त्याला अतिनील किरणे किंवा लेझर उपचार पद्धतीने घालवता येते. गंध किंवा पिंजर लावल्यामुळे खाली किंवा सभोवार काळा डाग आला असल्यास प्रथम गंध किंवा पिंजर लावणे बंद करणे आवश्यक आहे. काळा डाग कमी करण्यासाठी काही मलमे असतात. पण हा डाग काही आठवडे किंवा काही महिने राहू शकतो.
थोडक्यात काय तर कुंकवाची किंवा बिंदीची ॲलर्जी आल्यास त्याच गोष्टी परत परत वापरत राहू नयेत. कारण त्यामुळे तो भाग चिघळत जाऊन तिथे काळपट डाग राहण्याची शक्यता असते. त्याऐवजी वर सांगितलेल्या विविध पर्यायांपैकी एका पर्यायाचा उपयोग करावा.