Body reset habits: सकाळ ही एक महत्त्वाची वेळ असते जेव्हा तुमचे शरीर विश्रांतीनंतर दिवसभर कार्य करण्यासाठी सक्रिय होते. तुमच्या सकाळच्या दिनचर्येत साध्या; पण प्रभावी सवयींचा समावेश केल्याने ऊर्जा वाढण्यास, पचनशक्तीला चालना देण्यासाठी आरोग्यास समर्थन मिळू शकते. रात्रीच्या विश्रांतीनंतर तुमचे शरीर पूर्ववत करणे आणि तुमच्या डिटॉक्स प्रक्रियेला चालना देणे यांसाठी सकाळी ९ वाजण्यापूर्वी कोणत्या विशिष्ट गोष्टी केल्या पाहिजेत त्या आपण जाणून घेऊ…
शरीराची नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रिया कशी कार्य करते?
आश्लेषा जोशी, Tone30 पिलेट्स मधील वरिष्ठ पोषणतज्ज्ञ, सांगतात, “शरीराची डिटॉक्सिफिकेशन प्रणाली हे यकृत, मूत्रपिंड, लिम्फॅटिक प्रणाली, फुप्फुस, त्वचा व आतडे यांचा समावेश असलेले एक जटिल जाळे आहे. हे अवयव विष, टाकाऊ पदार्थ आणि चयापचय उपउत्पादने काढून टाकण्यासाठी एकत्र काम करतात.”
प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने समाविष्ट असलेल्या बाबी
यकृत : यकृत हा डिटॉक्सिफिकेशनचे कार्य करणारा मध्यवर्ती अवयव आहे. हा अवयव रक्त शुद्ध करतो, पाण्यात विरघळणाऱ्या विषाक्त पदार्थांमध्ये चयापचय प्रक्रिया करतो.
मूत्रपिंड : कचरा आणि अतिरिक्त द्रव काढून टाकण्यासाठी मूत्रपिंड रक्ताचे शुद्धीकरण करते आणि ते मूत्र म्हणून उत्सर्जित करते. मूत्रपिंडाच्या चांगल्या कार्यासाठी पुरेसे हायड्रेशन महत्त्वाचे आहे.
आतडे आणि मायक्रोबायोम : पाचक मुलूख मलमार्गे कचरा काढून टाकतो आणि आतड्यातील जीवाणू हानिकारक पदार्थांना निष्प्रभ करण्यात भूमिका बजावतात. आतड्याची हालचाल आणि सूक्ष्म जीव संतुलनासाठी फायबर आवश्यक आहे.
लिम्फॅटिक सिस्टीम : ही प्रणाली सेल्युलर कचरा गोळा करते आणि काढून टाकण्यासाठी रक्तप्रवाहात वितरित करते. त्याचे कार्य टिकवून ठेवण्यासाठी शारीरिक क्रियाकलाप महत्त्वाचा आहे.
फुप्फुसे आणि त्वचा : फुप्फुसे कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर टाकतात. एका वेळच्या चयापचय प्रक्रियेतून त्वचा शरीरातील टाकाऊ वा विषाक्त पदार्थ घामाद्वारे बाहेर टाकते.
“रात्रभर यकृत सक्रियपणे विषाक्त पदार्थांचे चयापचय करते आणि त्यामुळे हा प्रक्रिया केलेला कचरा हायड्रेशन आणि फायबरद्वारे बाहेर काढण्यासाठी सकाळ महत्त्वाची ठरते. सकाळी कॉर्टिसॉल व एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी शिखरावर असते; जी पचन आणि डिटॉक्सिफिकेशनसाठी आवश्यक त्या ऊर्जेचे उत्पादन वाढवते,” असे जोशी नमूद करतात.
आपले शरीर पूर्ववत करणे आणि त्याच्या नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रियेस समर्थन देणे यांसाठी सकाळी ९ च्या आधी केल्या जाणाऱ्या पाच सर्वांत महत्त्वाच्या गोष्टी
सांगताना आश्लेषा जोशी म्हणतात, “शरीराला पुनर्संचयित करण्यासाठी आणि नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया वाढविण्यासाठी सकाळ ही एक महत्त्वाची वेळ आहे.”
शरीरासाठी फायदेशीर ठरू शकणाऱ्या पाच सवयी
हायड्रेशनने सुरुवात करा
झोपेतून उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून प्या. लिंबू पाणी व्हिटॅमिन सी प्रदान करते. एक अँटिऑक्सिडंट जे यकृताच्या कार्यास समर्थन देते आणि पचन सुधारते. हायड्रेशन रात्रभर साचलेल्या विषाक्त पदार्थांना बाहेर काढण्यास मदत करते आणि काही तासांच्या उपवासानंतर शरीराला पुन्हा हायड्रेट करते.
ध्यानाचा सराव करा
ताण कमी करणे आणि ऑक्सिजनचा प्रवाह सुधारणे यांसाठी ५-१० मिनिटे ध्यानधारणा करा. त्यामुळे योग्य ऑक्सिजनेशन सेल्युलर फंक्शन आणि कार्बन डाय-ऑक्साइड काढून टाकण्यास समर्थन मिळते.
स्ट्रेच किंवा व्यायाम
स्ट्रेचिंग, योगासन किंवा वर्कआउट शरीराच्या डिटॉक्स नेटवर्कचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या लिम्फॅटिक सिस्टीमला सक्रिय करते. शारीरिक हालचाल रक्तप्रवाह वाढवते आणि घामाद्वारे विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
फायबरयुक्त नाश्ता घ्या
तुमच्या नाश्त्यामध्ये ओट्स, चिया सीड्स, ताजी फळे किंवा भाज्या यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. फायबर पचनसंस्थेतील विषारी द्रव्यांना एकत्र बांधून ठेवते आणि ते विष्ठेद्वारे काढून टाकण्यास मदत करते. फायबरसमृद्ध पदार्थांमधील प्री-बायोटिक्स आतड्यांतील जीवाणूंचे पोषण करतात आणि एकूणच डिटॉक्सिफिकेशनला समर्थन देतात.
हेही वाचा: डाळीतील हिंग आणि जिऱ्याचा तडका आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? तज्ज्ञ काय सांगतात…
सूर्यप्रकाशात राहा
आपल्या सर्कैडियन लयीचे नियमन करण्यासाठी नैसर्गिक सूर्यप्रकाशात काही मिनिटे व्यतीत करा. पहाटेचा सूर्यप्रकाश सेरोटोनिनच्या उत्सर्जनाला चालना देतो आणि त्यामुळे ताजेतवाने झाल्यासारखे वाटते आणि शरीरातील व्हिटॅमिन डीचे उत्पादन वाढते. ही गोष्ट यकृत आणि रोगप्रतिकार शक्तीवाढीसाठी आवश्यक असलेली पोषक बाब आहे.