पल्लवी सावंत पटवर्धन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

-अरे शुगर जास्त आली का? काही नाही तू फक्त कारल्याचा रस सुरू कर.

-शुगर काही नसतं हो. रोज फक्त तुम्ही एक तास व्यायाम करा तुम्ही व्यवस्थित व्हाल.

-तुम्ही तो आवळा रस मिळतो तो प्यायला सुरुवात करा.

-काही नाही फक्त मेथ्या खा सकाळ दुपार संध्याकाळ आणि सगळं नीट होईल.

-मला वाटतं ते गूळ -आमला चूर्ण घ्यायला पाहिजे ते फार महत्त्वाचं असतं.

-अमुक फळाचा रस टाकून अमुक अमुक प्रमाणामध्ये अमुक अमुक वेळा हा काढा घ्यायचा अरे शुगर बिगर सगळं निघून जातात आणि तू मला सांग आधी तू आदल्या दिवशी काही साखर खाल्लीस का आणि नंतर शुगर टेस्ट केलीस का त्याने पण शुगर वाढू शकते.

मी तर म्हणते की तुम्ही केळं खाणं बंद करा नाही नाही चिकू आधी बंद करायला पाहिजे आणि आंबा खायचा नसतो मग आता काही सीजन नाही.

-या सीझनमध्ये सीताफळं​ येतात पण सीताफळं अजिबात खाऊ नका.

-मी असं म्हणतो दूध बंद करा आणि तुम्ही आधी बटाटा बंद करा.

हेही वाचा : खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नवीन सुपर डाएट? ‘या’ डाएटमुळे हृदयविकाराचा धोका कसा कमी होतो? जाणून घ्या…

-तू रोज सकाळी सकाळी फळाचे ज्यूस पिऊ नको त्याने झालाय हे सगळं.

-डायबिटीसचं इतकं विशेष नाही हो. तुम्ही साखरेचं काही खाल्ल्यानंतर फक्त पाणी पीत जा. लगेच साखर प्रमाणात येईल.

-आठवड्यातून एकदा गोड खाल्लं तर काही डायबिटीस वाढत नाहीये.

-प्रसाद म्हणून तरी पुरणपोळी खा गं. प्रसादाने नाही वाढायची शुगर.

-मला असं वाटतं तू तेल वापरू नको जेवणामध्ये हो. ते तेलाचं [प्रमाण पण शुगर ला वाईट असतं
आम्ही अलीकडे फक्त गूळ वापरतोय चहामध्ये जेवणामध्ये बाई सगळी साखर बंद आहे सध्या गोड म्हटलं की लगेच माझी शुगर वाढते मला असं वाटतं.

-मला असं वाटतं की तुम्ही भात खाल्ल्यानंतर एक चमचा कारल्याचा ज्यूस तरी नक्की प्यायला पाहिजे.

-मला असं वाटतं की तुम्ही शिरा वगैरे सगळं खा पण त्यानंतर सरळ कारल्याचा रस प्या म्हणजे कसं गोडानंतर कडू तर गोडाच्या इफेक्ट्ला मारूनच टाकतं.

-कडूलिंबाचे पाणी रोज सकाळी उठल्यानंतर नाकातून शरीरात गेलं पाहिजे ते फार महत्त्वाचं असतं.

-मुळात तुम्ही काशाच्या वाटीने तळपायाला मसाज करा त्याने देखील साखर खूप कमी होते बरं का.

-तू तिन्ही वेळा ओट्स खा एकदम शुगर नॉर्मलला येईल.

हेही वाचा : नियमित अंडी खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे का? आठवड्यातून किती अंडी खावीत? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात….

हे झाले प्रातिनिधिक स्वरूपाचे मधुमेहींना दिले जाणारे चित्रविचित्र सल्ले ! आणि हे आपल्या शेजारी पाजारी अगदी सहज ऐकू येतात. मधुमेह आणि त्याच्या भोवताली असणारे समाज आणि गैरसमज याचं प्रमाण आपल्या समाजात मोठ्या प्रमाणावर आहे. किंबहुन जगात भारतात सर्वात जास्त मधुमेह असणाऱ्यांचे प्रमाण आहे .

अनेकदा मधुमेहा बद्दलचे शॉर्टकट्स खूप मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. आणि आहार हा सगळ्यांचा आवडता विषय असल्यामुळे मधुमेह बाबतीमध्ये आहारामधील मुख्य बदल कमी मात्र आहारातील पळवाटा शोधणाऱ्यांची संख्या जास्त आहे .

मधुमेह असण्याची काही लक्षणे पाहूया

१. खाणं खाऊन झाल्यावर पुन्हा भूक लागणे
२. सातत्याने लघवीला होणे. म्हणजे मधुमेह असताना झोपलेले असताना देखील २-३ वेळा लघवीला जावे लागते.
३. तोंडाला शोष पडणे आणि सारखी तहान लागणे
४. भरपूर खाऊन देखील वजन कमी वेळात झपाट्याने कमी होणे
५. ताकद कमी वाटणे आणि सुस्ती येणे.

हेही वाचा : Sad Eating: रागात, दुःखात, तणावात पोट दुखेपर्यंत खाण्याची सवय लागलीये? ‘हे’ ३ पदार्थ व ‘या’ ३ सवयी ठरू शकतात वरदान

अनेकदा ही लक्षणे ठळकपणे जाणवत असतात आणि रक्त चाचण्या केल्यावर एकदम टेन्शन येतं. त्यात कुटुंबामध्ये कोणाला मधुमेह असेल तर पिढीजात मधुमेह असण्याची शक्यता जास्त असते (यात नियमितपणे योग्य व्यायाम किंवा बैठे जीवन असणे हा मुद्दा देखील महत्वाचा आहे )

भारतात टाईप २ मधुमेह असणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यानिमित्ताने आहाराची पथ्ये पाळणे अत्यावश्यक आहे.
तुमच्या रक्तातील ग्लायकेटेड हिमोग्लोबिनचे प्रमाण आणि साखरेचे प्रमाण जाणून त्यानुसार कर्बोदकांचे नियमन किंवा शून्य प्रमाण करणे आवश्यक ठरते. तुमच्या इन्शुलिनच्या मर्जीप्रमाणे तुमच्या आहारातील बदल तुमच्या शरीराला योग्य वळण लावू शकतात. याबाबतीत आणखी जाणून घेऊया पुढील लेखात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What to do with advice on diabetes and symptoms of diabetes hldc css
Show comments