“माझं डाएट ५०% नवरात्री उपाससारखाच वाटतंय मला! राजगिरा, डाळिंब नेहमीच्या आहाराचा भाग होऊन गेलाय आणि माझ्या सासूबाई खुश आहेत माझ्यावर”. गीतांजली उत्साहाने सांगत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मला नवरात्रीच्या रंगानुसार डाएट करायचंय करू का ? म्हणजे एक सगळं दिवस लाल रंगाचे पदार्थ, एक पूर्ण दिवस पांढर रंग असं – करायचं का आपण ?”

यावर मात्र मला कौतुक वाटलं आणि कुतूहल देखील वाटलं सण आणि उत्सवाचे निकष आहाराला लागू पडतात पण त्यांचा योग्य मेळ साधणं तितकाच आवश्यक आहे .

नवरात्रीच्या रंगांची जोड आहारात करताना नवरात्री हे आहार नियमनाला वेगळे आयाम देऊ शकते हे लक्षात येऊ लागलं. वेगवेगळे रंग आहारात समाविष्ट करताना ते निसर्गाच्या जवळ ठेवून त्यात गीतांजलीच्या सुगरण पानाची सांगड घालायचं मी ठरवलं आणि तिच्या आहाराचे सात्विक नियोजन केलं.

हेही वाचा… Mental Health Special: ‘जबाबदारीचा स्वीकार’ खरंच किती महत्त्वाचा असतो?

नवरात्र म्हणजे आनंद. नवरात्र मध्ये विविध रंगाचे कपडे देवीसाठी आपण वापरतो त्याचप्रमाणे आहारात देखील आहारशास्त्र आणि नवरात्राचं खूप जवळचं नातं आहे. पावसाळा ओसरून ऑक्टोबर हिट सुरु होते आणि हळूहळू वातावरण बदलत बदलत आपण हिवाळ्याचे स्वागत करू इच्छितो. मात्र अचानक होणाऱ्या या ऋतूबदलांमुळे विषाणूंचे प्रमाण वाढून अनेक जण आजारी पडतात. यादरम्यान सुरु होणारे शारदीय नवरात्र तृणधान्ये , फलाहार , सात्त्विक आहार यासाठी आग्रही असते. शारदीय नवरात्रीचे व्रत आणि आहार पद्धती यांनी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढणे आणि आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी ही उत्तम वेळ आहे .

नवरात्रीच्या आहार व्रतासाठी खालील पदार्थ प्रामुख्याने वापरले जातात

तृणधान्ये
फळे
तेलबिया
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
तूप
सैंधव मीठ

आहारशास्त्र आणि या व्रताची गट्टी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे या व्रतादरम्यान पांढऱ्या साखरेचा होणार शून्य वापर !

आहारातील पदार्थाची चव त्याच्या मुख्य गुणधर्माने याव्यात , कोणत्याही पदार्थाचा पोत ,चव, रंग आणि त्यातील पोषणद्रव्याचा ऱ्हास होणार नाही अशाप्रकारे सेवन करणे हे या उपवासाचे वैशिष्ट्य!

नवरात्रीच्या तृणधान्यांकडे लक्ष दिल्यास आपल्या लक्षात येईल की ही तृणधान्ये कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्धांशानी परिपूर्ण आहेत. तृणधान्यातील सकस खनिजद्रव्यांमुळे त्याचे पचन योग्य प्रकारे व्हावे यासाठी सोबत दही , काकडी यासारख्या प्रकृती संतुलित करणाऱ्या पदार्थांचा समावेश केला जातो. शिवाय विविध रंगी फळांचे सेवन शरीराला मुबलक पोषणमूल्यांचा आणि आवश्यक शर्करेचा पुरवठा करते. त्यामुळे नेहमीच्या आहारात क्वचित फळे समाविष्ट करणाऱ्यांसाठी हे व्रत गुणकारी आहे .

ज्यांना मधुमेह , हृदयविकार किंवा रक्तदाब यांसारखे आजार आहेत त्यांनी उपास करताना आहार भान ठेवणे आवश्यक आहे. कोणताही उपवास करताना अतिरेकी उपाशी राहणे टाळावे. तसेच दिवसभर भरपूर पाणी प्यावे (मधुमेहींनी किंवा किडनीचे विकार असणाऱ्यांनी उपवास करण्यापूर्वी आहारतज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा)

या नवरात्रीमध्ये- आहारातील सकस नवरसांचा अर्थात कर्बोदके, स्निग्धांश, प्रथिने, जीवन सत्त्वे , पोषणमूल्ये , खनिजे, शरीरातील आर्द्रता (पाणी) याबरोबर मानसिक शांतता आणि उत्तम झोप यांचे संतुलन राखले जावो आणि आरोग्याचा नवा पायंडा पडो अशी आशा करूया!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What to eat for fast in navratri hldc dvr
Show comments