केसांच्या पेशी आणि त्यांना लागणारे पोषण याचे ​गहिरे नाते आहे. म्हणजे एखादा माणूस सशक्त आहे हे ओळखण्यासाठी त्यांचे केसांचे आरोग्य बोलका पुरावा असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

​अलीकडे आहाराबरोबरच प्रदूषण हा महत्वाचा मुद्दा आहे मात्र सकस आहार सशक्त केसांचे आरोग्यासाठी कारणीभूत असतो. भारतीय आहारामध्ये अनेक पदार्थ असे आहेत जे तुम्ही नेहमीच्या आहारात समाविष्ट करू शकता आणि तुमचे केसाचे आणि पर्यायाने तुमच्या शरीराचे आरोग्य देखील उत्तम प्रकारे राखू शकता​!

केसांचे आरोग्य आणि आहार हा स्त्री आणि पुरुष दोघांच्या बाबतीत​ अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेकदा केसांच्या आहारासाठी काय योग्य खायचं, केस वाढण्यासाठी काय ​खावे असे प्रश्न विचारले जातात​. वेगवेगळी तेलं वेगवेगळे सिरम वापरल्यानंतर काहीच होत नाहीये का असा विचार करणाऱ्यांसाठी​ आजचा लेख प्रपंच!

हेही वाचा… Health Special : खारट पदार्थांचा शरीरावर काय दुष्परिणाम होतो?

​वय, जीन्स यासारख्या गोष्टीवर केसांचे आरोग्य अवलंबून असते आणि केसांच्या आरोग्यासाठी आपल्या हातात असणारा घटक म्हणजे आहार ! अनेकदा आहारातील प्रथिनांची कमतरता भरून काढल्याने देखील केसांचे आरोग्य सुधारते.

​केसांच्या आरोग्यासाठी महत्वाचे असणारे काही पदार्थ खालीलप्रमाणे:

अंडं केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपण नेहमीच्या व्यवहारांमध्ये बायोटिनसारखे शब्द ऐकतोच. योग्य प्रमाणात प्रथिने जर तुम्ही खाऊ शकलात तर तुमच्या केसांच्या पेशींना योग्य प्रमाणात संजीवनी मिळू शकते. अत्यंत कमी प्रथिनांचा आहार हा केस गळतीला कारणीभूत ठरतो. अनेकदा वजन कमी करताना प्रथिनांचे आणि सगळ्याच ऊर्जेचे प्रमाण खूप कमी ठेवल्यामुळे भराभर केस गळती सुरू होते. बायोटिन हे केसांच्या आहारातील सगळ्यात महत्त्वाचे प्रथिने आहे​. याशिवाय ​केराटीन हा देखील सगळ्यात महत्त्वाचा​ घटक आहे. अंडं खाल्ल्यामुळे तुम्हाला योग्य प्रमाणात बायोटीन मिळू शकतं आणि शरीरातील बायोटिनचे प्रमाण वाढवून केस गळती कमी होऊ शकते. अंड्यांमध्ये असणारे झिंक​, सेलेनियम यांसारख्या गोष्टी केसांच्या आरोग्याला अत्यंत पोषक आहेत​.

बोरफळ​

सध्या हिवाळ्यामध्ये आवळा, ​बोरे, करवंद यासारखी फळे बाजारात उपलब्ध असतात. यामध्ये असणारे जीवनसत्व क आणि अँटिऑक्सिडंट यामुळे केसांच्या पेशींना अत्यंत फायदा होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक कप करवंद किंवा एक आवळा जरी खाल्लं तरी देखील तुम्हाला दिवसभराच्या जीवनसत्वाची जीवनसत्व ‘क’ ची कमतरता भासत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोलाज​न या प्रथिनांमुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि तुटण्यापासून किंवा निर्जीव केसांपासून तुमचे रक्षण होऊ शकते. अनेकदा स्त्रियांमध्ये केस गळतीची समस्या खूप लवकर आढळली जाते यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे शरीरातील लोहाची कमतरता. जर तुम्हाला ॲनिमिया असेल म्हणजेच लोहाची कमतरता असेल तर तुम्हाला केस गळतीचा खूप त्रास होतो.

​गोड भोपळी मिरची​

भोपळी मिरचीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बाजारात मिळतात यापैकी हिरवी किंवा लाल जर गोडसर भोपळी मिरची असेल तर त्याने केसांची वाढ उत्तम होण्यास अतिशय पडतो.

सोयाबीन

प्रथिनांच्या उत्तम प्रमाणामुळे घरोघरी पोहोचलेलं सोयाबीन, केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. सोयाबीन केसांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक असतो. ज्यांना लांब केस हवे आहेत त्यांनी सोयाबीन त्यांच्या आहारामध्ये नक्की समाविष्ट करावे.

मेथीचे दाणे​

मेथीचे दाणे रात्री भिजत घालून सकाळी खाणे किंवा तुमच्या आहारामध्ये फोडणीसाठी मेथीचे दाणे वापरणे किंवा मेथीच्या झाडांना मोड काढून त्याची भाजी आहारात समाविष्ट करणे यामुळे देखील केसांचे आरोग्य वाढण्यास मदत होते.

पालक​

केस गळतीसाठी अत्यंत औषधी भाजी म्हणजे पालक. यामध्ये असणारी विविध जीवनसत्वं आणि मिनरल्समुळे केसांची गळती थांबू शकते आणि केसांची मुळंदेखील मजबूत होऊ शकतात. शिवाय पालकामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण देखील सुधारु शकते. शरीरातील लोहाचे प्रमाण का महत्वाचे आहे कारण लोह तुमच्या शरीराला आणि मेंदूला ऑक्सिजनचे प्रमाण योग्य प्रमाणात मिळावे यासाठी आवश्यक ठरते त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता नसणे चांगल्या केसांसाठी अत्यंत आवश्यक आहे​.

​मासे

मांसाहारी लोकांसाठी उत्तम प्रका​रचे मासे म्हणजेच बांगडा. यासारखे मासे ओमेगा थ्री ​स्निग्धांश देऊ शकतात ओमेगा ​३ ​स्निग्धांश असेल त्यामुळे अनेक जणांच्या ​केसांमध्ये उत्तम परिणाम दिसून येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मासे सेलेनियम ड जीवनसत्व ब जीवनसत्व यांनी भरपूर असल्यामुळे अत्यंत मजबूत आणि तंदुरुस्त केसांसाठी मासे खाणे अत्यंत उपयुक्त मानले जाते विशेषत:

​खोबरे

कोकण किनाऱ्यानजीक राहणाऱ्या लोकांचे केस चांगले असल्याचे तुम्हाला लक्षात आलं असेल. केसांचा सगळ्यात आवडता ​अन्नघटक म्हणजे नारळ​! अर्थात खोबऱ्यामध्ये असणारे मीडियम ​चेन ट्रायग्लिसेराईड्स राइट्स आणि फॅटी ऍसिड केसांच्या आरोग्याला अत्यंत उपयुक्त असतात. घनदाट काळेभोर आणि उत्तम केस असण्यासाठी रोज किमान एक चमचा खोबरं तुमच्या जेवणामध्ये असायलाच हवं​.

रताळं

हिवाळ्यात मिळणारं रताळं हे बीटा कॅरोटीन आणि अ जीवनसत्वाने भरपूर असतं. एक मध्यम आकाराचं रताळं अ जीवनसत्वाची कमतरता भरुन काढू शकतात. केसांची वाढ आणि केसांच्या ग्रंथींसाठी अत्यंत उपयुक्त असं रताळं केसांसाठी संजीवनी आहे.

​अवोकाडो

पाश्चात देशांमधून जर आपण एखादी गोष्ट घ्यायची म्हणली तर ​अवोकाडो ! फक्त ​केसगळतीच नव्हे तर संपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत पोषक आहेत.

तेलबिया ​

सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, जवस यांसारखे पदार्थ केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. तेलबियांमध्ये असणारे आवश्यक स्निग्धांश केसांच्या वाढीसाठी आणि केसांचा पोत चांगला करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत​.

शिवल्या किंवा खेकडे​

यामध्ये असणारे कॅल्शियम आणि झिंक केसांच्या आरोग्याला अत्यंत पोषक असते. ​अनेक घरांमध्ये फार कमी प्रमाणात वापरला जाणारा हा पदार्थ केसांच्या आरोग्यासाठी वरदान आहे. स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये ज्यांच्यामध्ये केसांची वाढ खुंटली आहे किंवा होत नाही आहे त्यांच्यामध्ये तीन ते सहा आठवड्यांमध्ये अळीव नियमितपणे खाल्ल्याने अत्यंत चांगले परिणाम दिसू लागले आहेत.

कढीपत्ता​

नेहमीच वापरात खरंतर अत्यंत कमी दर्जाचे बांधले जाणारे आणि सहज उपलब्ध असणारा कढीपत्ता तुमच्या केसांच्या सुंदर केसांच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी अत्यंत आवश्यक आहे. नेहमीच्या आहारात किमान एक कप कढीपत्ता आवळा लिंबू असा रस जरी तुम्ही समाविष्ट केलात तरी देखील केसांचे आरोग्य शंभर टक्के सुधारू शकते​. तुमच्या आहारात नेहमी काय काय असतं?

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What to eat for good hair hldc dvr
Show comments