नुकताच श्रावण सुरू झालेला आहे शाकाहारी जेवणाकडे अनेकांचा कालदेखील वाढलेला आहे. किंबहुना माशांच्या प्रजनन क्रियेसाठी हा मोसम असल्यामुळे मांसाहार वर्ज्य करावा असे शास्त्रीयदृष्टया सांगितले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुद्दा असा कि रोज व्हेज काय खाणार ? या प्रश्नाच्या उत्तरासाठी आजचा विशेष लेख. भाजी मंडईमध्ये याच महिन्यात जणू भाजी महोत्सव सुरु असतो आणि खरं तर वरवर अत्यंत साधं रुपडं असणाऱ्या श्रावणातल्या काही भाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात . या कोणकोणत्या प्रकारच्या भाज्या आपण खाऊ शकतो आणि त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो त्याबद्दलचा आजचा लेख.

आणखी वाचा: Health Special: खाली बसून मांडी घालून जेवणं का महत्त्वाचं?

गवार

अत्यंत लवचिक आणि कोवळं हिरवा रंग असणारी गवार शरीरासाठी उपयुक्त आहे. विशेषतः ज्यांना खूप खोकला होतो किंवा कफ प्रकृती आहे त्यांच्यासाठी गवारीची भाजी औषधी आहे. मधुमेह असणाऱ्यांसाठी देखील वाफवून खाल्लेली गवारीची भाजी गुणकारक आहे. गवारीची भाजी बनवताना शक्यतो ती तुपावर परतून त्यावर हलके सैंधव मीठ टाकून ती परतावी. मात्र खूप जास्त तेल, मसाले त्यात टाकू नये ; त्यातले औषधी गुण निघून जातात. मात्र गवार निवडताना कोवळी गवार निवडणे फार महत्त्वाचे असते म्हणजे जर गवार खूप कडक आणि टणक असेल तर ती थोडी कडवटही असते आणि अशी भाजी आणि आरोग्याला हानीकारक असते.

घोसाळी

घोसाळी ज्याला गिलके असेदेखील म्हटले जाते. खरंतर कडू चवीची जास्त उपयुक्त मानली जाते. यात लोह आणि तंतुमय पदार्थ मुबलक असतात. खूप कफ साठून राहिल्यास उपचार म्हणून घोसाळ्याचा रस देऊन उलटी होऊन तो निघून जाण्यास मदत होते. आयुर्वेदाप्रमाणे ज्यांना जखमा भरून न येण्याचा त्रास आहे त्यांनी घोसाळी आहारात जरूर समाविष्ट करावीत. यकृताचे अनेक विकार कमी करण्यासाठी घोसाळ्याची भाजी उपयोगी मानली जाते. लघवीच्या वाटेवर जळजळ होत असेल तर घोसाळ्याची भाजी नियमितपणे आहारात समाविष्ट करावी.

आणखी वाचा: Health Specia: फूड फ्रीडम आणि चौरस आहार

श्रावण घेवडा

अतिशय लयबद्ध दिसणारी, नाजूक आणि हिरव्या बिया असणारी श्रावण घेवड्याची भाजी ही अत्यंत गुणकारी आहे. पित्तशामक आणि वातवर्धक असणारी ही भाजी पोट साफ करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. यात असणाऱ्या खनिजे द्रव्यांचे प्रमाण उत्तम आणि नेमक्या प्रमाणात असणारी प्रथिने या भाजीचेआहार शास्त्रातील महत्त्व वाढवतात. श्रावण घेवडा खूप जास्त वेळ शिजवू नये तो केवळ तेलावर परतून त्यात मुख्य मसाले टाकून चविष्ट करून खावा. अनेक ठिकाणी श्रावण घेवडा आणि मटकी किंवा उसळी एकत्र करून भाजी केली जाते. या प्रकारच्या भाज्यांमध्ये श्रावण घेवडा जास्त वेळ शिजवण्याची टाळावे.

दुधी भोपळा

दुधी भोपळ्याचे अनेक किस्से आणि औषधी उपचार तुमच्या ऐकिवात असतीलच. वजन कमी करणाऱ्यांसाठी सगळ्यात उपयुक्त असणारी भाजी म्हणून दुधी भोपळ्याकडे पाहिले जाते. दुधी भोपळ्याची भाजी , रस किंवा त्याचे सूप अशा विविध प्रकारे तुम्ही दुधी भोपळा खाऊ शकता. दुधीची भाजी बनवताना त्याच्यामध्ये शक्यतो ती ताजी बनवून . ज्यांना झोपेचा त्रास (झोप न लागणे ) आहे त्यांनी दुधीभोपळा तुपात परतून घेऊन थोडासा खिरीसारखा करून खावा. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी दुधी भोपळा नक्की खावा तसेच ज्यांना उच्च रक्तदाब त्यांच्यासाठी दुधी भोपळ्याचे सूप किंवा दुधी भोपळ्याची भाजी अत्यंत गुणकारी आहे शक्यतो दुधी भोपळ्याची भाजी करताना दुधी भोपळ्याला थोडंसं उकडून त्यावर हलकं मीठ टाकावं. भाजी करताना त्यात मीठ टाकू नये.

पडवळ

या मोसमात फिकट हिरवी पांढुरकी दिसणारे पडवळ ही थंड भाजी आहे . ज्यांना अत्यंत कमी भूक लागते किंवा ज्यांना खूप जास्त खाणं खावंसं वाटत नाही त्यांच्यासाठी पडवळ अत्यंत पोषक भाजी आहे .त्यामध्ये असणारे तंतुमय पदार्थ, हरितकं, खनिजे यांचा उत्तम परिणाम तुम्हाला शरीराला मिळू शकतो. ज्यांना खूप जास्त ताप येतो किंवा ज्यांना खूप जास्त थकवा येतो त्यांच्यासाठी पडवळाची भाजी किंवा पडवळाचा रस अत्यंत गुणकारी आहे. छातीत साठलेला कफ पडून जाण्यासाठी पडवळच्या भाजीचा उत्तम उपयोग होतो आणि पडवळ शक्यतो कोवळाच असावा भरपूर बिया असलेले जून असलेले पडवळ अतिशय अजिबात वापरू नये.

दोडका

बाजारामध्ये अनेक स्त्रिया दोडका निवडताना तो खूप सजगपणे निवडतात तो तोडून गोड आहे का किंवा तो किमान कोवळा आहे का; याचा अंदाज घेतला जातो. दोडका किंवा शिराळे या विविध नावांनी बाजारात मिळणारी ही भाजी ओळखली जाते. ज्यांना दमा खोकला खूप ताप येणे वारंवार थकवा येणे यासारखे विकार आहेत त्यांच्यासाठी दोडका अत्यंत उपयुक्त आहे. दोडका दुधी भोपळ्याप्रमाणेच उपयुक्त आहे. किंबहुना ज्यांना मधुमेह किंवा लठ्ठपणा असे विकार आहेत त्यांना दोडक्याची भाजी औषधी आहे. नेहमीच्या आहारात दोडका समाविष्ट करण्यासाठी हलक्या तेलावर परतून तयार केली जाणारी दोडक्याच्या शिरांची किसून तीळ मिसळून केलेली चटणी अत्यंत गुणकारी आहे.

तांबडा भोपळा

तांबडा भोपळा हा माझा सगळ्यात आवडता भोपळ्याचा प्रकार आहे ; याच मुख्य कारण एक म्हणजे तो हलका गोडसर असतो दोन म्हणजे त्याच्यासोबत तुम्ही कोणतीही भाजी एकत्र केल्यास तो चवीला खूप चांगला लागतो. भोपळा उकडून तुम्ही जर कणकेमध्ये मिसळून त्याचे पराठे केलेत किंवा थालीपीठात मिसळून त्याच्या मऊसर पोळ्या केल्यात तरी देखील ते चवीला चांगले लागतात किंवा आमटी करताना एकत्र केल्यास आमटी चविष्ट होते.

भोपळ्याच्या बिया या अत्यंत गुणकारी मानल्या जातात ज्यांना संप्रेरकांचे असंतुलन म्हणजेच हार्मोन इम्बॅलन्स असणाऱ्या स्त्रियांसाठी वरदान आहेत. तुम्ही त्याचं सूप बनवू शकता किंवा त्याचे काप बनवू शकता किंवा बनवू शकता. हलके तुपावर शिजवून तो सलाड म्हणून खायला अत्यंत रुचकर लागतो.

लहान मुलांसाठी भोपळा हे आरोग्यवर्धक टॉनिक आहे पचायला अत्यंत हलका शिजवायला अत्यंत सोपा आणि खायला चविष्ट असा भोपळा श्रावणाच्या मोसमा मध्ये खायलाच हवा.

क्रमशः