Sex after Childbirth: गर्भावस्था आणि प्रसुती महिलांच्या आयुष्यातील एक आनंदाचा क्षण असतो. पण त्याचबरोबर गरोदरपणाचा काळ हा स्त्रीच्या शरीराला अतिशय थकवणारा असतो. तिच्या शरीराने आयुष्यभर जेवढा त्रास सहन केलेला नसतो तेवढा त्रास तिला डिलिव्हरीच्या काळात सहन करावा लागतो. त्यामुळे तिच्या या भार सोसलेल्या शरीराला डिलिव्हरी नंतर जास्तीत जास्त आराम मिळणे गरजेचे असते, पण डिलिव्हरीनंतर सेक्स करणं योग्य आहे का, हा देखील प्रश्न पडतो. लग्न झाल्यावर असे प्रश्न अनेकांच्या मनात येत असतात. गरोदरपणातही असे प्रश्न निर्माण होत असतात. मूल झाल्यानंतर, डिलिव्हरीनंतर सेक्स करणे योग्य आहे की नाही, या संभ्रमात लोक सहसा असतात. हेच संभ्रम दूर करण्यासाठी इंडियन एक्सप्रेसला डॉ. नीना सिंह यांनी माहिती दिली आहे. चला तर जाणून घेऊया काय सांगतात तज्ज्ञ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन आई बाबांच्या मनामध्ये डिलिव्हरीनंतर लैंगिक संबंध कधी ठेवावेत, हा प्रश्न असतोच. सेक्समुळे बाळाच्या स्तनपानावर काही परिणाम होईल का, दुधाची मात्र कमी होईल का किंवा आईला काही त्रास होतो का, अश्या शंका त्यांच्या मनामध्ये असतात. पण यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे, डिलिव्हरी कोणत्या प्रकारे झाली आहे. टाके पडले आहेत का किंवा काही समस्या निर्माण झाल्या होत्या का, अश्या अनेक गोष्टी विचारात घेणे आवश्यक असते, असे तज्ज्ञ सांगतात.

धावपळीचे जीवन, बिघडलेली जीवनशैली आणि वाढता तणाव याचा परिणाम महिलांच्या गरोदरपणावर होताना दिसत आहे. आजकाल बहुतेक महिलांच्या गरोदरपणात काही ना काही अडचण असते, त्यामुळे डिलिव्हरी सिझेरियनने करावी लागते.

(हे ही वाचा : प्रसूतीनंतर वाढलेलं वजन कमी करायचेय? तज्ज्ञ सांगतात ‘तूप’ खा, जाणून घ्या रोज किती चमचे तूप खावं? )

डिलिव्हरी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे?

डॉ. नीना सिंह सांगतात, तुमची प्रसूती योनीमार्गे असो किंवा सिझेरियन असो, योनीतुन रक्तस्त्राव सुमारे चार ते सहा आठवडयांपर्यत चालू राहतो. त्यामुळे रक्तस्त्राव होत असताना संभोग करणे टाळले पाहिजे कारण संसर्गाचे प्रमाण या काळात वाढू शकते.

तज्ज्ञ सांगतात, गर्भधारणेदरम्यान महिलांच्या पुनरुत्पादक अवयवांचा आकार वाढतो. या अवयवांना त्यांच्या मूळ आकारात परत येण्यासाठी किमान सहा आठवडे लागतात. त्यामुळे काही वेळा प्रसूतीनंतर लवकर सेक्स न करणे हेच योग्य ठरते.

(हे ही वाचा: २० ग्रॅम शेंगदाणे, दोन-तीन भाज्या… हृदय चिरतरुण ठेवण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलं ‘हा’ सुपर-डाएट )

गर्भधारणा किंवा प्रसूतीनंतर लैंगिक संबंध प्रस्तापित करणं काही लोकांना फार कठिण वाटत असतं. गर्भधारणेदरम्यान कोणतीही गुंतागुंत नसल्यास नवीन मातांना प्रसूतीनंतर किमान सहा आठवडे प्रतीक्षा करावी. यामुळे बहुतांश धोके टाळता येऊ शकता.

खरं तर तज्ज्ञांच्या मते, शारिरीक संबंध ठेवण्यासाठी योग्य तो वेळ घेणे आवश्यक आहे. बाळंतपणानंतर काही दिवस सेक्स करणं टाळायला हवं. डिलिव्हरीनंतर सेक्स करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर डॉक्टरांशी न घाबरता, निसंकोच बोलणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What to expect from sex after giving birth how long do you have to wait know the expert tips pdb