२०२२ पासून जागतिक कर्करोग संस्थेने “क्लोज द गॅप” नावाने ३ वर्षासाठी मोहीम सुरु केली यात कर्करोगाशी संबंधित गैरसमज दूर करणे , कर्करोग बाधित व्यक्ती आणि कुटुंब या दोघांसाठी मदत गट तयार करणे, कर्करोग आणि त्यावरच्या उपायांसाठी योग्य माहिती तयार करून त्याचा प्रसार करणे यासारखे महत्वाचे काम सुरू केले.

कर्करोगाशी प्रतिकार करताना केवळ रुग्णच नव्हे तर कुटुंबालादेखील धीराने रुग्णासोबत मानसिक आणि आर्थिक लढा द्यावा लागतो. कर्करोग हा विविध आजारांचे एकत्रीकरण होऊन शरीरावर परिणाम करणारा आजार आहे.

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण

हेही वाचा…Health Special : जेट स्प्रे वापरताय…जरा सांभाळून!   

कर्करोग पेशीजन्य आजार असल्यामुळे त्यावर करता येणारे उपाय मर्यादित आहेत. कर्करोगाचे निदान झाल्यावर आहारावर अनेक बंधने येतात. अनेकदा कर्करोगावर उपचार करताना भूक कमी लागणे , केवळ द्रव स्वरूपात आहार घेणे अशा मर्यादेत आहाराची आखणी करावी लागते. जितक्या लवकर निदान होईल तितकं रुग्णाचं स्वास्थ्य योग्य उपाय करून जपलं जाऊ शकतं. त्यामुळे सकस आहार घेणे हे कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे .

कर्करोग होण्याच्या कारणांमध्ये अनुवांशिकता, शारीरिक अस्वच्छता आणि रासायनिक पदार्थांचा वापर याशिवाय जीवनशैली आणि आहार नियमन संबंधित काही बाबी देखील कारणीभूत आहेत.

कुपोषित आहार /अतिरेकी आहार

जीवनशैली

रोगप्रतिकारशक्ती कमी असणे

लठ्ठपणा

जीवनसत्वाची कमतरता

व्यसनाधीन जीवनशैली ( तंबाखू, दारू )

ही कारणे प्रामुख्याने आढळून येतात .

हेही वाचा…Health Special: पालकत्वाची शिकवणी

लठ्ठपणा

संशोधनाअंती हे लक्षात आले आहे की ३०% कर्करोग रुग्णांमध्ये अवाजवी वाढलेले वजन हा महत्वाचा घटक आहे. विशेषतः अशा रुग्णांमध्ये वजन वाढण्यासाठी साखरेचे अतिरेकी प्रमाण आणि नियमित खाल्ला जाणारे मैदा किंवा मैद्याचे पदार्थ दोन गोष्टी कारणीभूत आहेत. अनेकजणांमध्ये ग्लुकोजचे असंतुलन आणि चयापचय क्रियेचे असंतुलन आढळून येते. शिवाय स्थूलपणामुळे घातक पेशींचं प्रमाण देखील वाढीस लागतं. विशेषतः लठ्ठ पुरुषांमध्ये आतडं , गुदाशय , यकृत, स्वादुपिंड , पोटाचे कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे.

व्यसनाधीनता

फुप्फुस, अन्न नलिका ,आतडे, आमाशय यासारखे पचनसंस्थेशी निगडित कर्करोग होण्यासाठी तंबाखूचे सेवन , मद्यपान कारणीभूत ठरते. धूम्रपान केल्याने स्वादुपिंड, मूत्रपिंड, गर्भाशय याचा कर्करोग होण्याचं संभावना वाढते. तंबाखू तसेच धुम्रपानामुळे आतड्यातील आम्लांची आणि सूक्ष्माणूंच्या संख्येत घट होते तसेच शरीरातील सकस पेशींचे नुकसान होते. हळूहळू रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन कर्करोगाच्या पेशींचा प्रतिकार करणाऱ्या पेशींचे प्रमाण अत्यल्प होऊन कर्करोग शरीरात घर करू लागतो.

सातत्याने केले जाणारे मद्यपान स्वादुपिंडावर अतिरेकी ताण तयार करते आणि जीवनसत्त्वांच्या कमतरतेसाठी कारणीभूत ठरते.जागतिक कर्करोग रुग्णांची टक्केवारी पाहिली तर कर्करोगयाची बाधा होण्यासाठी ४५% रुग्णांमध्ये तंबाखू आणि मद्यपान हे मुख्य कारण आढळून येते.

हेही वाचा…Health Special : बसणं सोडा, ‘या’ गोष्टी करा आणि ठेवा स्वत:ला क्रियाशील

आहार

२००४ साली केलेल्या एका संशोधनामध्ये आहारातील काही सवयी कर्करोगाची शक्यता वाढविण्यासाठी करणीभूत ठरल्याचे आढळून आले आहे. उदाहरणार्थ

नियमित लाल मांस ( red meat) खाणे

आहारात साखरेचे अतिरेकी प्रमाण असणे

ओमेगा ३ आणि ६ चे असंतुलन

तंतुमय पदार्थ कमी खाणे किंवा न खाणे

अतिरिक्त ऊर्जेचे अन्नपदार्थ खाणे

सकस आहार आणि नेमक्या शारीरिक वजनाचा आग्रह करताना कर्करोग टाळण्यासाठी आहारात काही विशेष भाज्या असणे फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे. कोबी, गाजर, पालेभाज्या , फ्लॉवर यासारख्या भाज्या -ज्यात हरितके ,सल्फोरोफेन आणि इतर पोषणमूल्ये मुबलक प्रमाणात आहेत यांचे सेवन , कडधान्ये , जवस, तेलबिया यांचा नियमित समावेश कर्करोग होण्यापासून संरक्षण करू शकतात. दिवसातून किमान २ फळे खाणाऱ्या लोकांमध्ये कर्करोग होण्याची शक्यता ८५ % इतकी कमी होऊ शकते.

बी जीवनसत्त्व , ड जीवनसत्त्व , कॅरोटिनॉइड्स , काही पाचक द्रव्ये , यासारखे पदार्थ कर्करोगमुक्त आहाराचा भाग असणे आवश्यक असते.

हेही वाचा…Health Special : हिवाळ्यात वातप्रकोप होण्याची शक्यता का असते?

वरील सगळी पोषणमूल्यं आहारात असल्यास स्तन , गुप्तांग , आतडं यांना कर्करोगाची बाधा होण्याची शक्यता काही प्रमाणात कमी होते. याव्यतिरिक्त फुप्फुसाच्या कर्करोगापासूनही संरक्षण होऊ शकते. कर्करोगापासून दूर राहण्यासाठी आहार, जीवनशैली आणि स्वच्छता या तिन्ही बाबींकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.