What Happens If You Completely Stop Having Protein : प्रथिने (Protein) आपल्या शरीरस्वास्थ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. स्नायूंची वाढ, दुरुस्ती व देखभाल आणि वजन व्यवस्थापनात प्रथिनांचा हातभार असतो, ज्यामुळे तृप्ततेला (satiety) चालना मिळून एंझाइम आणि हार्मोन उत्पादनातदेखील योगदान मिळते. चेन्नईतील प्राग्मॅटिक न्यूट्रिशन येथील मुख्य पोषणतज्ज्ञ मीनू बालाजी यांच्या मते, प्रथिने आपल्या आरोग्यासाठी भरपूर आवश्यक आहेत. कारण- मानवी शरीर सर्व आवश्यक अमिनो आम्ल बनवू शकत नाही.

पण, तुमच्या शरीराला किती प्रथिनांची आवश्यकता आहे हे वय, वजन, ॲक्टिव्हिटी लेव्हल आणि आरोग्य उद्दिष्टे यांसारख्या घटकांवर अवलंबून असते. प्रौढांसाठीसुद्धा प्रथिनांची आवश्यकता वेगवेगळी असू शकते. पण, सामान्य मार्गदर्शक तत्त्वे प्रति किलोग्राम शरीराच्या वजनासाठी ०.८ ते १.२ ग्रॅम आहेत, असे उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समधील आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल म्हणाल्या.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की जर तुम्ही तुमच्या आहारातून प्रथिने वगळली, तर काय होईल? तर चला याबद्दल जाणून घेऊ…

१. जर तुम्ही आहारातून प्रथिने वगळली, तर त्याचे वेगवेगळे दीर्घकालीन परिणाम असू शकतात. पण, मीनू बालाजी यांच्या मते, प्रथिने नसलेला आहार जीवघेणा ठरू शकतो आणि असा आहार घेण्याची सहसा शिफारस केली जात नाही.

२. प्रथिने आपल्या आरोग्यासाठी अनेक कारणांमुळे महत्त्वाची असतात. फक्त स्नायूंबद्दल नाही. एंझाइम्स आणि हार्मोन्स हीसुद्धा आपल्या शरीरातील प्रथिने आहेत आणि आपल्याला पोषण, तसेच जगण्यासाठी त्यांची आवश्यकता असते. रक्तातील हिमोग्लोबिनमध्येही ‘ग्लोबिन’ असते, जे शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचवते, असे त्यांनी स्पष्ट केले.

३. मुलांची वाढ व विकास यांसाठीही प्रथिने अत्यंत महत्त्वाची असतात. गर्भधारणेसह आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावतात. विकसनशील देशांमध्ये, विशेषतः मुलांमध्ये, प्रथिनांची कमतरता क्वाशिओरकोर (Kwashiorkar) म्हणून दिसून येते.

जेव्हा तुम्ही प्रथिने खाणे पूर्णपणे बंद करता, तेव्हा तुम्हाला अल्पकालीन बदल जाणवू शकतात जसे की…

१. स्नायुबलात घट (Loss of muscle mass)

अभ्यासातून असे दिसून आले आहे की, सात दिवस प्रथिने न खाल्ल्याने स्नायुबलावर (muscle mass) त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. हा परिणाम वृद्धांमध्ये अधिक स्पष्टपणे दिसून येतो.

२. चयापचय मंदावते (Slows metabolism)

चयापचय प्रक्रियेचा योग्य दर राखण्यासाठी स्नायू महत्त्वाचे असतात. अपुऱ्या प्रथिनांअभावी स्नायुबल कमी झाल्यामुळे चयापचय प्रक्रिया मंदावते आणि वजन वाढू शकते.

३. रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो (Affects immunity)

रोगप्रतिकार शक्तीवर कमकुवत झाल्यामुळे आजारी पडण्याचा धोका अनेकदा वाढतो.

४. अधूनमधून काहीतरी खाण्याची इच्छा (Increases cravings)

प्रथिनांच्या अपुऱ्या सेवनाने तुम्हाला सतत भूक लागू शकते. कारण- तुम्हाला आवश्यक ते सर्व पोषक घटक मिळत नाहीत आणि त्यामुळे जेवणानंतर पोट भरल्यासारखे वाटत नाही.

५. त्वचा आणि केसांचे नुकसान (Skin and hair damage)

प्रथिने हे त्वचा आणि केसांच्या संरचनेचा अविभाज्य भाग आहेत. पुरेशा प्रमाणात प्रथिने न मिळाल्यास तुमची नखे ठिसूळ होणे, त्वचा निस्तेज होणे, केस गळणे अशा आरोग्याच्या त्रासांना सामोरे जावे लागू शकते.

६. हाडांच्या ताकदीवर परिणाम होतो (Affects bone strength)

प्रथिनांच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि अस्थिभंगाचा धोका वाढतो.

प्रथिनांचे योग्य प्रमाणात सेवन करण्यासाठी तुमच्या प्रथिन स्रोतांमध्ये विविधता आणणे आवश्यक आहे. कोवळे / चरबीरहित मांस, कुक्कुटपालन व मासे यांसारखे प्राणीजन्य पदार्थ शरीराला चांगल्या प्रमाणात प्रथिने पुरवतात. असे असले तरी सोयाबीन, मसूर, टोफू व क्विनोआसारखे वनस्पती-आधारित स्रोतदेखील तितकेच प्रभावी ठरू शकतात, असे मीनू बालाजी यांनी सांगितले. विविध प्रकारचे प्रथिनयुक्त पदार्थ समाविष्ट केल्याने तुम्हाला शारीरिक कार्यांसाठी आवश्यक असलेल्या अमिनो आम्लांचा एक संच मिळतो

Story img Loader