यंदा उन्हाची तीव्रता खूपच जास्त आहे. उष्णतेच्या लाटांमुळे देशभरातील नागरिक घामाघूम आहेत. तसेच अनेकांना त्वचेच्या अनेक समस्यांनादेखील सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्यात शरीराला जास्त पाण्याची आवश्यकता भासते, त्यामुळे तहानही भरपूर लागते. उन्हाळ्यात ताक, दही, लस्सी प्यावी असा सल्ला तज्ज्ञ देतात. उन्हाळ्यात ताक आणि दही या दोन्ही पदार्थांचे सर्वात जास्त सेवन केले जाते. हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. दूधापासून तयार करण्यात येणाऱ्या या दोन्ही पदार्थांमध्ये पोषक घटक समाविष्ट असतात. मात्र, असे असले तरी उन्हाळ्यात दही खाण्याऐवजी ताक पिणे योग्य असते असे म्हटले जाते. पण, उन्हाळ्याच्या उकाड्यावर मात करण्यासाठी तुम्ही रोज लस्सी किंवा ताक प्यायल्यास तुमच्या शरीराचे काय परिणाम होईल, याचविषयावर आहारतज्ज्ञ डॉ. तृप्ती पाधी यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा