संतुलित आहारामध्ये प्रत्येक भाजी महत्त्वाची भूमिका बजावते. मग हिरव्या मिरच्यांबाबतही हेच सत्य आहे का? होम शेफ मंजू मित्तल यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, “जेवणाबरोबर एक हिरवी मिरची खाणे आरोग्यासाठी खरोखर चांगले आहे. प्रत्येक जेवणाबरोबर एक हिरवी मिरची तुमची त्वचा स्वच्छ करण्यास, चयापचय सुधारण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते,” असा दावा केला. पण, हे खरंच सत्य आहे का? याबाबत तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊ…
दररोज जेवणाबरोबर हिरवी मिरची खावी का? (should you eat a green chilly every day with your meals?)
मुंबईतील ‘अपोलो स्पेक्ट्रा’मधील आहारतज्ज्ञ फौजिया अन्सारी म्हणाल्या की, हिरवी मिरची ही जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारख्या आवश्यक पोषक घटकांचा चांगला स्रोत आहे. तुमच्या चयापचयासाठी ती चांगली आहे हे खरे असले तरी हिरव्या मिरचीचे सेवन मर्यादित असले पाहिजे. “हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिनचे प्रमाण जास्त असल्याने पोटाला (stomach lining) त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे जळजळ, आम्लता (अॅसिटिडी) व छातीत जळजळ (Heartburn) हे त्रास होऊ शकतात,” असे अन्सारी म्हणाल्या.
दररोज जेवणाबरोबर हिरवी मिरची खाणे कोणी टाळावे? (Who should avoid eating green chilies with meals every day?)
त्यांनी पुढे सांगितले, “संवेदनशील पोट किंवा अॅसिड रिफ्लक्स किंवा अल्सर यांसारख्या आजार असलेल्या लोकांनी दररोज हिरवी मिरची खाणे टाळावे. कारण- त्यामुळे त्यांची स्थिती लवकर बिघडू शकते.
“तसेच, मिरच्या सामान्यतः मसालेदार असतात, ज्यामुळे तोंड आणि घशात जळजळ होऊ शकते. मिरच्यांमधील कॅप्सेसिन तुमच्या पचनसंस्थेतील वेदना रिसेप्टर्सना सक्रिय करू शकते. त्यामुळे आधीपासून जळजळ होत असलेल्या आतड्यामधून अन्न पुढे जाताना आणखी जळजळ निर्माण होऊ शकते,” असे अन्सारी म्हणाल्या.
रोज एक हिरवी मिरची खाण्याचे फायदे?
त्यांनी पुढे म्हटले की, मिरच्या खाण्याचा आणि स्वच्छ त्वचेचा थेट संबंध असल्याचे कोणतेही संशोधन नाही.
दररोज जास्त मिरच्या खाल्ल्याने पचनक्रिया जलद होऊ शकते; पण त्यामुळे मलविसर्जन किंवा तीव्र पेटके येऊ शकतात, असा इशाराही अन्सारी यांनी दिला. “म्हणूनच दररोज हिरवी मिरची खाणे टाळणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला हिरवी मिरची खायला आवडत असेल, तर एकापेक्षा जास्त खाऊ नका,” असे अन्सारी म्हणाल्या.
तज्ज्ञांचा सावगिरीचा इशारा
हलक्या हिरव्या मिरच्या गडद किंवा लाल मिरच्यांपेक्षा कमी तिखट असतात. त्यामुळे त्यांची निवड करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. “संतुलित आहाराकडे लक्ष द्या; जेणेकरून तुमचे आतडे आणि त्वचा चांगले आरोग्य प्रतिबिंबित करेल. जास्त मसालेदार पदार्थ दीर्घकाळ टाळणेदेखील उचित आहे,” असे अन्सारी म्हणाल्या.