How Your Farts Can Indicate Underlying Health Problems : आजकाल आपल्या आरोग्याविषयी अनेक जण सजग असतात. आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी नियमित व्यायाम करतात, आहारात बदल करतात. आहारात कोणताही बदल करताना त्याचा आपल्या आतड्यावर कसा परिणाम होईल हे लक्षात घेतले पाहिजे आणि याचकडे आपल्यापैकी अनेक जण दुर्लक्ष करतात. अनेकांना पचनाच्या समस्या असतात, काही जणांचे पोट साफ होत नाही, ज्याला बद्धकोष्ठता असे म्हटले जाते; तर काही लोकांना गॅसचा खूप त्रास होतो. अनेकदा लोकांना पोटातील गॅसमुळे पोटदुखी होते तर अनेकदा हा गॅस नकळतपणे बाहेर सोडला जातो. या क्रियेला वायू सोडणे असे म्हणतात. आपण या विषयावर मोकळेपणाने बोलत नाही, पण पोटातील गॅस बाहेर पडणे किंवा वायू सोडणे पचनक्रियेचा एक नैसर्गिक भाग आहे. पण, तुम्ही किती वेळा गॅस बाहेर सोडता आणि त्याचा वास या दोन्ही गोष्टी तुमच्या आतड्याच्या आरोग्याबद्दल बरेच काही सांगतात.
दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागातील सल्लागार डॉ. विकास जिंदाल यांच्या मते, “वेगवेगळ्या प्रकारचे गॅस विशिष्ट पचन प्रक्रिया आणि समस्यांशी संबंधित असू शकतात. येथे डॉ. जिंदाल दुर्गंधीयुक्त गॅस आणि दुर्गंधी नसलेला गॅस म्हणजे काय आणि तुम्ही निरोगी पचनसंस्थेला कसे समर्थन देऊ शकता हे स्पष्ट करतात.
दुर्गंधीयुक्त वायू विरुद्ध दुर्गंधी नसलेला वायू (Smelly vs. non-smelly gas)
जर तुम्हाला गॅसची समस्या असेल आणि जेव्हा तुमच्या पोटातील गॅस बाहेर पडतो, तेव्हा त्याला जर तीव्र वास येत असेल तर ते अंतर्निहित पचन समस्या किंवा असंतुलन दर्शवू शकते. डॉ. जिंदाल यांच्या मते, “विशेषतः दुर्गंधीयुक्त गॅस हे स्लो ट्रान्सिट टाईम (अशी स्थिती जिथे अन्न पचनसंस्थेतून खूप हळू जाते), डिस्बायोसिस (तुमच्या आतड्यातील बॅक्टेरियामध्ये असंतुलन) किंवा इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) किंवा इन्फ्लेमेटरी बोवेल डिसीज (IBD) सारख्या समस्या दर्शवू शकते.” या परिस्थिती सामान्य पचन प्रक्रियेत व्यत्यय आणू शकतात, ज्यामुळे बॅक्टेरिया न पचलेले अन्न अधिक हळूहळू पचवतात आणि दुर्गंधीयुक्त वायू निर्माण करतात.
बद्धकोष्ठता, आणखी एक सामान्य पचन समस्या, वास वाढवू शकते, कारण अन्न पचनमार्गात जास्त काळ राहते, ज्यामुळे बॅक्टेरियांना वायू सोडण्यासाठी अधिक वेळ मिळतो. लहान आतड्यात बॅक्टेरियाची अतिवृद्धी (SIBO) ही आणखी एक स्थिती आहे, जी लहान आतड्यात जास्त प्रमाणात बॅक्टेरियाच्या किण्वनामुळे दुर्गंधीयुक्त वायू निर्माण करू शकते.
दुर्गंधी नसलेले वायू
दुग्धशर्करा किंवा फायबर पचवण्यास समस्या निर्माण होत असेल तर दुर्गंधी येत नसलेले वायू सामान्यतः उद्भवते, असे डॉ. जिंदल स्पष्ट करतात. “ज्या अन्नात काही विशिष्ट साखर असतात, जसे की दुधात लॅक्टोज, फळांमध्ये फ्रुक्टोज किंवा साखरमुक्त उत्पादनांमध्ये साखर अल्कोहोल, ते तीव्र दुर्गंधी न येऊ देता वायू निर्माण करू शकतात.” या प्रकारचा वायू बहुतेकदा तुमच्या आतड्यातील बॅक्टेरियाचे उप-उत्पादन असतो, जे न पचलेले कर्बोदके आणि फायबर आंबवतात, जे सूचित करते की, तुमचे मायक्रोबायोम कार्य करत आहे, परंतु काही पदार्थांच्या सेवनामुळे यात अडचण येऊ शकते.
पोटातून जास्त गॅस बाहेर पडणे आरोग्यासाठी चिंताजनक आहे का?(Is passing too much gas a health concern?)
कधीकधी पोटातील गॅस बाहेर पडणे हा पचनक्रियेचा एक सामान्य भाग असला तरी सतत वास येणे किंवा जास्त प्रमाणात गॅस बाहेर पडणे हे पचनाच्या समस्या दर्शवू शकते. डॉ. जिंदाल सांगतात, “जर तुमचा गॅस वारंवार दुर्गंधीयुक्त असेल, तर ते खराब पचन किंवा असंतुलित आतड्यांतील मायक्रोबायोममुळे असू शकते, जे GERD किंवा क्रोहन रोगासारखे जठरांत्रीय विकार (Crohn’s disease) दर्शवू शकते.” त्याचप्रमाणे, वारंवार वास नसलेला गॅसदेखील हेच दर्शवतो की, काही कार्बोहायड्रेट्स पचवण्यात अडचण, एंजाइमची कमतरता किंवा अन्न पदार्थांची अॅलर्जी यांसारख्या समस्या आहेत.
जेव्हा पोट फुगणे, पोटदुखी किंवा आतड्याच्या कार्यात अडथळा यांसारख्या इतर लक्षणांसह दोन्ही प्रकारच्या गॅसची समस्या निर्माण होते तेव्हा डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे.
पचन आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी टिप्स (Tips for improving digestion and gut health)
जर तुम्हाला दुर्गंधीयुक्त गॅस किंवा वारंवार गॅसचा त्रास होत असेल, तर तुमचे पचन सुधारण्यासाठी आणि निरोगी आतड्यासाठी काही उपाय डॉ. जिंदल यांनी सुचवले आहेत
गॅसच्या समस्येतून तात्काळ आराम मिळावा यासाठी (Immediate Relief)
पाचनास मदत करणारे(Digestive Aids):
जेवणापूर्वी पाचक एंजाइम किंवा कडू पदार्थ घेतल्याने पोटातील आम्ल आणि एंजाइम उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते. जेवणापूर्वी पाण्यात एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगरदेखील पचनास मदत करू शकते.
हायड्रेशन(Hydration):
भरपूर पाणी पिणे, विशेषतः इलेक्ट्रोलाइट्ससह, पचन क्रिया सुलभ होण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करू शकते.
बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी (For Constipation)
फायबरचे सेवन वाढवा (ncrease Fiber Intake):
तुमच्या आहारात सायलियम हस्क फायबर समाविष्ट केल्याने नियमित आतड्यांची कार्य सुधारू शकते, परंतु, बद्धकोष्ठता वाढू नये म्हणून भरपूर पाणी प्या
शारीरिक हालचाल(Physical Activity):
नियमित शारीरिक हालचाल करणे, जसे की सकाळी चालणे, पचन उत्तेजित करण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता कमी करू शकते.
प्रोबायोटिक्स(Probiotics):
काही महिने सतत घेतलेले दर्जेदार प्रोबायोटिक सप्लिमेंट तुमच्या आतड्यातील बॅक्टेरिया संतुलित करण्यास मदत करू शकते.
आतड्यातील असंतुलनासाठी (For Gut Imbalance)
आहारातील बदल (Dietary Adjustments):
प्रक्रिया केलेले अन्न, ग्लूटेन, साखर आणि दुग्धजन्य पदार्थ कमी केल्याने दाहकता कमी होऊ शकते आणि आतड्याच्या कार्यात संतुलन होऊ शकते.
प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स(Probiotics and Prebiotics):
प्रोबायोटिक सप्लिमेंटचा समावेश करणे आणि केळी आणि कांदे यांसारखे प्रीबायोटिक-समृद्ध अन्न खाल्ल्याने सूक्ष्मजीव विविधता वाढू शकते आणि पचन सुधारण्यास मदत होते.