प्रत्येक ऋतुनुसार बाजारामध्ये विविध रंगाच्या भाज्या आणि फळे उपलब्ध होतात. “तुम्हाला तुमच्या आहारात व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स हवे असतील तर केशरी रंगाची फळे आणि भाज्या निवडा”, असे अपोलो हॉस्पिटलच्या मुख्य पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी सुचवले आहे. आज आपण नारंगी किंवा केसरी रंगाच्या फळे आणि भाज्यांबाबत जाणून घेऊ या, जे हिवाळा या ऋतुमधील सर्वात सहज उपलब्ध होणारे सुपरफूड मानले जाते.
व्हिटॅमिन सी :
केसरी फळे आणि भाज्यांमध्ये उच्च व्हिटॅमिन सी असते, जे आपल्याला लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. जेव्हा आपण सर्दी आणि फ्ल्यूचा संसर्ग होणाऱ्या ऋतूंचा सामना करत असतो, तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. संत्री, आंबा, पिवळी आणि लाल शिमला मिरची हे यासाठी उत्तम पर्याय आहे. याशिवाय ते कोलेजन तयार करण्यात मदत करतात, जे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
बीटा-कॅरोटीन :
काही फळे आणि भाज्यांमध्ये चमकदार केशरी रंगाची छटा असते, जी त्यात उच्च बीटा-कॅरोटीन असल्याचे दर्शवते, जे ‘व्हिटॅमिन ए’चा एक चांगला स्त्रोत मानले जाते. हे पोषक तत्व चांगली दृष्टी, रोगप्रतिकारक कार्य आणि त्वचेचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. रताळे, गाजर हे बीटा-कॅरोटीनचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत, जे विविध प्रकारचा स्वादही देतात.
अँटिऑक्सिडंट :
फ्री रॅडिकल्सला तटस्थ करण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स आवश्यक आहेत. फ्री रॅडिकल्समुळे पेशींचे नुकसान(cellular dama) होऊ शकते आणि दीर्घकाळ टिकणारे आजार (chronic disease) होऊ शकतात. कॅरोटीनोइड्स (Carotenoids), एक प्रकारचा शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट, सामान्यतः केशरी रंगाच्या भाज्यांमध्ये आढळतो. जर्दाळू, पपईचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यासाठी मदत करते आणि दीर्घकालीन आरोग्यासाठी आवश्यक असलेले घटक यात मिळतात. डोळ्याच्या मॅक्युलामधील (Macula) कॅरोटीनोइड्स (रेटिनाच्या मध्यभागी) निळा प्रकाश ९० टक्क्यांपर्यंत कमी करू शकतात. प्रोस्टेट आणि फुफ्फुसाच्या कर्करोगात त्यांची प्रतिबंधक भूमिका अभ्यासात आढळून आली आहे.
निरोगी हृदयासाठी फायदेशीर :
लिंबूवर्गीय फळे, विशेषतः, हृदयाच्या आरोग्याशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ, संत्री आणि द्राक्ष फळांमध्ये फायबर, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात.
पाण्याची कमतरता भरून काढते आणि पोषण देते :
अनेक केशरी रंगाची फळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवतात, ज्यामुळे पाण्याची कमतरता होत नाही आणि तृप्त झाल्याची भावनाही मिळते.
वर्षाच्या इतर कोणत्याही वेळी तुम्हाला निवडण्यासाठी इतकी केशरी रंगाची फळे आणि भाज्या सापडणार नाहीत. संत्री, लिंबूवर्गीय फळांसह दिवसाची सुरुवात केल्यास तुम्हाला ताजेतवाने असल्यासारखे वाटते. गाजर कच्चे असो किंवा शिजवलेले ते तुमचा नाश्ता पौष्टिक बनवतात. भाजलेले किंवा स्मॅश केलेले रताळे जेवणात समाविष्ट केल्यास आरामदायी भावना निर्माण करते. आंबादेखील आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे. पपईच्या रसाळ गोड चवीचा आनंद घेऊ शकतात किंवा फळांच्या सॅलडमध्येदेखील खाऊ शकता.
फळे : संत्री, आंबा, जर्दाळू, पीच.
भाज्या : गाजर, रताळे, भोपळे, भोपळी मिरची आणि टोमॅटो.
ऋतूतील नैसर्गिक विपुलतेचा स्वीकार करा, विविध चवींचा आस्वाद घ्या.