Are Carbs Bad For The Heart : अलीकडच्या काळात आपल्या आहारात तेलाचा वापर कमी करण्याबद्दल बरीच चर्चा झाली आहे. परंतु, आपल्याला आणखी एक मॅक्रोन्यूट्रिएंट – कार्बोहायड्रेट्स आहारातून कमी करण्याची आवश्यकता आहे. शिफारस केल्यानुसार प्रौढांसाठी दररोजचे स्वयंपाकाच्या तेलाचे सेवन चार चमचे किंवा सुमारे २० ग्रॅम असावे. परंतु, जर तुम्ही कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण मर्यादित करीत नसाल, तर तेलाच्या प्रमाणावर मर्यादा ठेवून काय फायदा?
बहुतेक भारतीय लोक बैठी जीवनशैली जगतात हे लक्षात घेता? जोपर्यंत ते खूप जास्त व्यायाम करीत नाहीत तोपर्यंत कॅलरीजचे एकूण सेवन दररोज १,४०० ते १,६०० कॅलरीजदरम्यान असले पाहिजे. म्हणून दिवसभरातील तुमच्या एकूण कॅलरीज नियंत्रणात राहण्यासाठी)३० टक्के कार्बोहायड्रेट्स, १५ ते २० टक्के फॅट्स, ३० ते ४० टक्के प्रोटीन आणि उर्वरित फायबर या प्रमाणात आहार घेतला गेला पाहिजे. या आहारात जरी कॅलरीजचे प्रमाण कमी असले तरी त्यातून तुम्हाला अन्नावर आतड्यातील जीवाणूंद्वारे आंबण्याची क्रिया झाल्यावर ऊर्जा मिळू शकते. परंतु, भारतीय आहारात सामान्यत: कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे दररोजच्या कार्बोहायड्रेट्सच्या प्रमाणाच्या ५० ते ७० टक्के असते.
कार्बोहायड्रेट्सचा हृदयावर कसा परिणाम होतो? (How do carbohydrates affect the heart?)
तर्क सोपे आहे, जास्त कॅलरीज चरबीमध्ये (फॅट्स) रूपांतरित होतात. हे लक्षात घेता, जरी तुम्ही आहारातील फॅट्सचे सेवन नियंत्रित करीत असलात तरी जोपर्यंत तुम्ही तुमचे कार्बोहायड्रेट्सच्या सेवनावर नियंत्रण ठेवत नाही तोपर्यंत तुमच्या शरीरातील फॅट्सचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्तच राहील.
जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेट्स आणि साध्या साखरेचे जास्त प्रमाणात सेवन करता तेव्हा तुमचे शरीर त्यांचे ट्रायग्लिसराइड्समध्ये रूपांतर करते आणि ते तुमच्या शरीरात चरबी (फॅट्स) म्हणून साठवते. ही प्रक्रिया यकृतामध्ये तेव्हा होते, जेव्हा शरीराला कॅलरीजची ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी जितकी गरज असते त्यापेक्षा जास्त कॅलरीजचे सेवन तुम्ही करता. मग या चरबीत रूपांतरीत झालेल्या अतिरिक्त कॅलरीज पोटाच्या स्थूलतेला कारणीभूत ठरतात. ट्रायग्लिसराइड्स तुमच्या धमन्यांमध्ये दाहकता निर्माण करू शकतात, ज्यामुळे प्लेक जमा होतात किंवा एथेरोस्क्लेरोसिस होतो. कालांतराने जास्त कार्बोहायड्रेट्समुळे इन्सुलिन प्रतिरोध होऊ शकतो, जेव्हा शरीर इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देणे थांबवते. दीर्घकालीन उच्च रक्तातील साखर शरीरात दाहकता वाढवू शकते, जी पुन्हा एथेरोस्क्लेरोसिसशी संबंधित आहे.
चांगल्या आणि वाईट कोलेस्ट्रॉलचा परिणाम (The effect of good and bad cholesterol)
ट्रायग्लिसराइड्स आणि उच्च घनता लिपोप्रोटीन (HDL) किंवा चांगले कोलेस्ट्रॉल यांचा परस्परसंबंध आहे. म्हणून जेव्हा सुरुवातीला त्याचे प्रमाण शरीरात वाढते तेव्हा नंतर त्याचे प्रमाण कमी होते. ट्रायग्लिसराइड्स मोठ्या, हलक्या व धोकादायक नसलेल्या कमी घनता लिपोप्रोटीन (LDL) किंवा वाईट कोलेस्ट्रॉल रेणूंना हृदयासाठी हानिकारक लहान, दाट व चिकट रेणूंमध्ये रूपांतरित करतात.
उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले कार्बोहायड्रेट्स किंवा पांढरे ब्रेड आणि साखरेचे पेय यांसारखे साखरेचे पदार्थ शरीरात ज्या वेगाने विघटन करतात, त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण जलद वाढण्याची आणि ‘चिकट’ LDL तयार होण्यास हातभार लागण्याची शक्यता जास्त असते. हे रक्तवाहिन्यांच्या अस्तरात (lining of arteries) सहजपणे प्रवेश करू शकते, प्लेक्स (plaques) तयार करू शकते, धमन्या कडक करू शकते आणि त्यामुळे दाहकता होऊ शकते. जरी चाचणी अहवालांमध्ये एकूण LDL कोलेस्ट्रॉल पातळी सामान्य दिसत असली तरीही विरघळणारे फायबर (Soluble fibre) शरीरात LDL शोषण रोखते आणि म्हणूनच तुमच्या आहारात फायबर समाविष्ट करण्याचा आग्रह केला जातो.
अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ज्यांनी जास्त कार्बोहायड्रेट्स खाल्ले आहेत, त्यांच्यामध्ये मृत्यवर जास्त आहे, जे सॅच्युरेडेट फॅट्सपेक्षा (Saturated fat) जास्त आहे.
तुमची ट्रायग्लिसराइड मर्यादा किती असावी? (What should be your triglyceride limit?)
२०० मिलिग्राम/डीएलपेक्षा जास्त ट्रायग्लिसराइड पातळी हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढवते. हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही तुमचे ट्रायग्लिसराइड १०० मिलिग्राम/डीएलपेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
(डॉ. शेट्टी हे बेंगळुरू येथील स्पर्श हॉस्पिटलमध्ये प्रमुख हृदयरोगतज्ज्ञ व वैद्यकीय संचालक आहेत.)