सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहण्याची योग्य वेळ कोणती याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? शरीरासाठी ड जीवनसत्त्व किती महत्त्वाचे आहे आणि जेव्हा त्याची कमतरता असते तेव्हा काय होते? ही संकल्पना अधिक समजून घेण्यासाठी तज्ज्ञ काय सांगतात ते घ्या जाणून…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरीरात पुरेसे ड जीवनसत्त्व तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशात किती वेळ राहणे आवश्यक आहे?

याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना जनरल फिजिशियन डॉ. मनजिता नाथ दास यांनी सांगितले, “सूर्यस्नानासाठी सकाळी ८ ते ११ ही चांगली वेळ आहे. विशेषत: उत्तरेकडील भागात जिथे एखाद्या व्यक्तीला अत्यंत उष्ण आणि शुष्क तापमानाचा सामना करावा लागतो, तसेच त्वचेवर १५ मिनिटे सूर्यप्रकाश घेणे पुरेसे आहे.”

ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेची सामान्य लक्षणे कोणती?

ड जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास विविध लक्षणे दिसून येतात. त्यामध्ये सतत थकवा, शरीरात वेदना, शारीरिक हालचालींशी संबंधित नसलेली सांधेदुखी आणि अधूनमधून किंवा सतत हाडांचे दुखणे या बाबींचा समावेश होतो.

हेही वाचा –चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यनने भाताऐवजी खाल्ला Cauli Rice? काय आहे हा cauli rice? तुम्ही खाऊ शकता? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे दीर्घकालीन आरोग्यावर काय परिणाम होतात?

दीर्घकाळापर्यंत ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामध्ये हाडे कमकुवत होऊन, सामान्यत: आढळणारा ऑस्टिओपोरोसिसचा आजार होऊ शकतो. या स्थितीमुळे अस्थिभंगाचा म्हणजे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. ड जीवनसत्त्वाची कमतरता टाळण्यासाठी किंवा त्यावर उपाय करण्यासाठी नियमितपणे ड जीवनसत्त्वयुक्त पूरक आहार घेण्याची शिफारस केली जाते. गंभीर कमतरतेच्या बाबतीत, ड जीवनसत्त्वाचे इंजेक्शन आवश्यक ठरू शकते. योग्य उपचारानंतर बऱ्याच व्यक्तींच्या लक्षणांमध्ये काही आठवड्यांत झपाट्याने सुधारणा होते.

हेही वाचा –“रात्री ९.३० वाजता ध्यान करते अन् १० वाजता झोपते”, समंथा रुथ प्रभुच्या दिनचर्येबाबत काय म्हणाले तज्ज्ञ?

ज्या व्यक्ती मर्यादित सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात, त्यांना ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा धोका जास्त असतो. त्यामध्ये जे लोक बराच वेळ घरामध्ये घालवतात अशा लोकांचा समावेश होतो; जसे की वृद्ध किंवा दीर्घकालीन आजार असलेले लोक. त्याव्यतिरिक्त कृष्णवर्णीय व्यक्तींमध्ये वाढलेल्या मेलेनिनमुळे सूर्यप्रकाशापासून ड जीवनसत्त्व कमी तयार होते. मेलेनिन हे नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून कार्य करते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whats the right time for sunlight intake for vitamin d we ask the experts snk