अनेक तरुणी मुली पुरळ, कोरडी किंवा तेलकट त्वचा अशा कित्येक समस्यांचा सामना करतात, पण अभिनेत्री ऐश्वर्या रायची त्वचा वयाच्या पन्नाशीमध्येही तितकीच उजळ आणि तजेलदार दिसत आहे. एक सुप्रसिद्ध बॉलीवूड सेलिब्रिटी म्हणून ती बऱ्याचदा चर्चेत असते; परंतु तिच्या स्किनकेअरमुळे सध्या ती चर्चेत आली आहे.

२०२४ मध्ये Harper’s Bazaar UK ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने तिची सुव्यवस्थित दैनंदिन दिनचर्या (streamlined daily routine) शेअर केली आहे, ज्यानुसार ती भरपूर पाणी पिणे (हायड्रेशन) स्वच्छता आणि आराम यांना प्राधान्य देते. “हे खरं तर खूप सोपे आहे, मी इतर स्त्रीसारखी आहे. आम्ही सर्व स्त्रिया काळाच्या विरोधात धावत आहोत; तुम्हाला रोज सकाठी उठायचे आहे आणि दिवसाची नव्याने सुरुवात करायची आहे, त्यामुळे मला वाटते की, “सर्वात सोपी आणि प्रभावी गोष्ट म्हणजे भरपूर पाणी पिणे (हायड्रेटेड) आणि स्वच्छ (हायजेनिक) राहणे. असे ऐश्वर्याने सांगितले.

sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कुणासमोरही झुकत नाही; प्रचंड स्वाभिमानी असतात, जाणून घ्या स्वभाव
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव

ऐश्वर्याच्या दिनचर्येत सकाळपासून रात्रीपर्यंत भरपूर पाणी पिणे आणि त्वचेला मॉइश्चरायझ करणे समाविष्ट आहे. या सवयी, ज्या तिच्या सिनेमाच्या सुरुवातीच्या दिवसांपासून तिच्या दिनचर्येचा भाग आहेत. “मॉइश्चरायझिंग हा देखील जीवनाचा एक मार्ग बनला आहे. कामाचा दिवस असो किंवा नसो दिवसाच्या सुरुवातीला आणि शेवटी मॉइश्चरायझिंग माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जसे आहात तसेच राहा आणि कम्फर्ट (comfort) महत्त्वाचा आहे असे तिने सांगितले.

पण ही दिनचर्या किती प्रभावी आहे, याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला लेडी कर्झन आणि बोअरिंग हॉस्पिटल बेंगळुरू येथील त्वचाविज्ञानाच्या (dermatology ) सहाय्यक प्राध्यापक (assistant professor) डॉ. स्वेता श्रीधर यांनी माहिती दिली.

हेही वाचा –तहान लागते म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते का? तज्ज्ञांनी केला खुलासा…

त्वचेचे आरोग्य आणि तेज राखण्यासाठी हायड्रेशन किती महत्त्वाचे आहे? (How important is hydration for maintaining skin health and radiance?)

डॉ. श्रीधर सांगतात, “त्वचेच्या आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे, कारण ते त्वचेच्या संरचनेवर आणि कार्यावर थेट परिणाम करते. त्वचेचा बाह्य स्तर म्हणजेच स्ट्रॅटम कॉर्नियम हा संरक्षणात्मक अडथळा म्हणून कार्य करतो आणि पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने हा संरक्षणात्मक अडथळा कायम ठेवतो. जेव्हा त्वचेच्या पेशींमध्ये पाण्याची पुरेशी पातळी असते तेव्हा ते चांगल्या प्रकारे कार्य करते, परिणामी त्वचेची लवचिकता सुधारते, सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा एकंदर तेजस्वी दिसते.”

दुसरीकडे पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा निस्तेज, कोरडी होते आणि प्रदूषणामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. ऐश्वर्या रायने सांगितल्याप्रमाणे मूलत: पुरेशा प्रमाणात पाण्याची पातळी असतानाच त्वचा आतून बाहेरून चमकते.

त्वचेची स्वच्छता राखल्याने त्वचेच्या संपूर्ण आरोग्यावर कसा परिणाम होतो? (How maintaining skin cleanliness impacts overall skin health)

डॉ. श्रीधर यांच्या म्हणण्यानुसार, त्वचेची स्वच्छता राखण्याचे महत्त्व नाकारता येणार नाही. चांगली स्वच्छता राखून व्यक्ती त्वचेवरील धूळ, तेल आणि प्रदूषक तयार होण्यापासून रोखू शकते. धूळ, तेल आणि प्रदूषकांमुळे त्वचेची छिद्र बंद होण्याची शक्यता असते आणि मुरूम किंवा त्वचारोग यांसारख्या दाहक (inflammatory) परिस्थिती उद्भवू शकतात.

याव्यतिरिक्त त्वचेवर जमा होणारे पर्यावरणीय प्रदूषक आणि सूक्ष्मजंतू काढून टाकल्याने त्वचा निरोगी राहते आणि रोगजनकांच्या विरुद्ध अडथळा म्हणून त्याचे कार्य प्रभावीपणे पार पाडू शकते. त्वचेवरील ॲसिड आवरण (skin’s acid mantle) म्हणजेच घाम आणि सेबमचा पातळ संरक्षणात्मक थर हा त्वचेच्या पृष्ठभागावर संतुलित मायक्रोबायोम राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. चांगली देखभाल केलेली त्वचा मायक्रोबायोम त्वचेच्या रोगप्रतिकारक प्रतिसादास समर्थन देते आणि संक्रमण टाळते.

हेही वाचा –जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…

सकाळी आणि रात्री? मॉइश्चरायझिंग हा ऐश्वर्याच्या दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग आहे, हे सातत्याने करण्याचे फायदे काय आहेत? (Moisturising morning and night is a vital part of Aishwarya’s regimen — what are the benefits of this consistency?)

“सकाळी आणि रात्री सातत्याने मॉइश्चरायझिंग करणे त्वचेवर संरक्षणात्मक अडथळा टिकवून ठेवण्यास आणि दिवस आणि रात्रभर ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. स्किन रिसर्च अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, “नियमित मॉइश्चरायझिंग केल्याने त्वचेची हायड्रेशन पातळी कालांतराने ३५% पर्यंत सुधारू शकते,” असे डॉ. श्रीधर सांगतात.

प्रौढ त्वचेसाठी मॉइश्चरायझरमध्ये कोणते विशिष्ट घटक शोधावे? (Specific ingredients to look for in a moisturiser for mature skin)

“प्रौढ त्वचेसाठी हायलुरोनिक ॲसिडसारखे घटक विशेषतः फायदेशीर आहेत, कारण ते पाण्याच्या तुलनेत १००० पट जास्त ओलावा टिकवू शकते.
हे ह्युमेक्टंट (humectant) म्हणून काम करते, जे आसपासच्या हवेतून (वातावरण) पाणी त्वचेमध्ये शोषून घेते आणि त्वचेचा ओलावा टिकवते; तर सिरॅमाइड त्वचेवरील लिपिडचा (lipid barrier चरबीचा थर) संरक्षात्मक थर पुन्हा निर्माण करण्यात मदत करते, त्वचेचा ओलावा कमी होणे टाळते,” असे डॉ. श्रीधर स्पष्ट करतात.

“पेप्टाइड्स आणि रेटिनॉइड्ससारख्या वृद्धत्वविरोधी घटकांचादेखील सातत्यपूर्ण वापरामुळे फायदा होतो. हे घटक कोलेजन उत्पादनास उत्तेजन देण्यास आणि पेशींच्या हालचालींना गती देण्यास मदत करतात, या महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत, ज्या वयानुसार कमी होतात. सातत्याने मॉइश्चरायझेशन कोरडेपणा आणि त्वचेच्या वृद्धत्वासह येणाऱ्या त्वचेला अधिक तरुण, तजेलदार दिसण्यास मदत करते.”

Story img Loader