Proteins हे मानवी शरीराच्या विकासाठी खूप आवश्यक असतात. प्रोटीन्स (प्रथिने) वेगवेगळ्या अन्नपदार्थांमधून शरीरांमध्ये पोहचत असतात. परंतु बिघडलेल्या जीवनशैलीमुळे बऱ्याचश्या लोकांच्या शरीरामध्ये ही जीवनसत्वे अपेक्षित प्रमाणामध्ये नसतात. अशा लोकांना डॉक्टराकडून प्रोटीन सप्लीमेट्सची घेण्याचा सल्ला दिला जातो.फिटनेस इंडस्ट्रीमध्ये यांचे सेवन करणे सामान्य समजले जाते. प्रोटीनमुळे मसल टिश्यूंना उभारी येऊन मसल मास वाढण्यास मदत होते. याशिवाय रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठीही प्रोटीन सप्लीमेट्स घेतली जातात. मसल मास वाढवून योग्य शरीरयष्टी कमावण्यासाठी अनेक बॉडी बिल्डर्स प्रोटीन सप्लीमेंट घेत असतात. यांच्या व्यतिरिक्त इतर लोकसुद्धा या सप्लीमेंट्सचे सेवन करु शकतात.
प्रोटीन सप्लीमेंट्स अतिप्रमाणात घेतल्याने अनेक समस्या उद्भवतात. तसेच त्यांचे प्रमाण कमी असल्यास शरीरावर फारसा परिणाम होत नाही. अशा वेळी शरीराच्या गरजेनुसार सप्लीमेंट्सचे सेवन करणे फायदेशीर ठरु शकते. सौम्या सेनगुप्ता, आरोग्य तज्ञ आणि सीईओ, बिल्ड., यांनी एचटी लाइफस्टाइलला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रोटीन सप्लीमेंट्ससंबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Proteins supplements चे सेवन कधी करावे?
– वर्कआउट सेशन संपल्यानंतर
व्यायाम करणे शरीरासाठी लाभदायक असते. जिममध्ये वर्कआउट करताना मसल टिश्यू ब्रेक होत असतात. हे ब्रेक झालेले टिश्यू पुन्हा जोडण्याकरिता प्रोटीनची मदत होत असते. यामुळे वर्कआउट केल्यानंतर प्रोटीन सप्लीमेंट्स घेण्याचा सल्ला दिला जातो. माहितीनुसार, व्यायाम केल्यानंतर ३० ते ६० मिनिटांच्या कालावधीमध्ये प्रोटीन सप्लीमेंट्सचे सेवन केल्याने मसल मास वाढण्यास मदत होते.
– रात्री झोपण्यापूर्वी
झोपण्याआधी प्रोटीन सप्लीमेंट्स घेणे फायदेशीर समजले जाते. रात्री झोपेमध्ये शरीरामध्ये प्रथिने संश्लेषण (Protein synthesis) ही प्रक्रिया घडत असते. यामुळे दिवसभर शरीराची हालचाल केल्याने मसल टिश्यूंचे नुकसान भरुन काढले जाते. त्याशिवाय नवीन स्नायू तंतूची निर्मिती देखील होत असते. रात्री झोपण्यापूर्वी सप्लीमेंट्स घेतल्याने ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या अमीनो अॅसिड्सच्या उत्पादनाचे प्रमाण वाढत जाते.
– ऑफिसमध्ये काम करताना
व्यायाम आणि झोप घेण्याव्यतिरिक्त, ऑफिसमध्ये काम करत असताना प्रोटीन सप्लीमेंट्सचे सेवन करणे योग्य मानले जाते. सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवणामध्ये खालेल्या पदार्थांपासून शरीरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन पोहोचत असते. काहीजणांच्या आहारामध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी असते. असे लोक प्रोटीन सप्लीमेंट्सची मदत घेऊ शकतात. दिवसभर काम करताना शरीरामधील स्नायूंमध्ये बदल होत असतात. मसल मास वाढण्यासाठी ऑफिसच्या वेळेमध्ये प्रोटीन सप्लीमेंट्स घेणे सोईस्कर ठरते.
शारीरिक वृद्धी होण्यासाठी प्रोटीन्सयुक्त पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करावेत. गरज असेल तरच प्रोटीन सप्लीमेंट्सचे सेवन करावे. शरीरामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असल्यास त्याचा परिणाम मूत्रपिंडावर होऊ शकतो. मूत्रपिंडावर ताण आल्याने इतर समस्या उद्भवू शकतात. त्यासह डिहायड्रेशनदेखील होऊ शकते. शरीराच्या प्रति किलोग्रॅम वजनाच्या तुलनेनुसार २ ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन्स शरीरामध्ये असणे हानिकारक असते.