अनेकांना त्यांच्या आहारात पुरेश्या प्रमाणात फळांचे सेवन करत नाही. परंतु जर तुम्हाला तुमचे निरोगी आरोग्याची उद्दिष्टे पूर्ण करायची असतील तर तुमच्या रोजच्या आहारात फळांचा समावेश केल्यास तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या २०२१ मध्ये व्हिडीओमध्ये सांगितले की” फळे ही पचनासाठी सर्वात प्रभावी अन्न आहे,” आहारात फळांचा समावेश का आवश्यक आहे हे याबाबत सद्गुरु यांनी सांगितले की, “फळे तुमच्या शरीराला आश्चर्यकारक फायदे देऊ शकतात. फळांचे सेवन करणारी एखादी व्यक्ती खूप उत्साही आणि सक्रिय होऊ शकते आणि तुमचा मेंदू उत्तम काम करतो. फळ हे सर्वात पचण्याजोगे अन्न आहे.” दरम्यान एखाद्याच्या आहारात फळे का आवश्यक आहेत याबाबत तज्ज्ञांचे काय मत आहे, चला जाणून घेऊ या…
फळे म्हणजे आनंददायी आहार आहे त्याचबरोबर पौष्टिक गरजा देखील पूर्ण करते. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते हृदयाच्या आरोग्याला चालना देण्यापर्यंत, एकूणच आरोग्याच्या कल्याणासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. फळे आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात. त्यात भरपूर व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स आहे जो आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला महत्त्वपूर्ण चालना देते. ही रोगप्रतिकार शक्ती आपल्याला संसर्ग आणि रोगांचा सामना करण्यासाठी उपयूक्त ठरते.
“ दररोज विविध प्रकारच्या फळांचा सेवन केल्याने चांगल्या आरोग्यासाठी पोषक तत्वांचा वैविध्यपूर्ण आहाराचे सेवन घेतले जाते.,” असे आहारतज्ज्ञ आणि प्रमाणित मधुमेह शिक्षक डॉ अर्चना बत्रा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.
हेही वाचा – तुमची झोप पूर्ण होत नाही का? तुमच्या ‘या’ पाच सवयींमुळे बिघडते तुमचे चयापचय
फळांमध्ये आढळणारी नैसर्गिक शर्करा प्रक्रिया केलेल्या मिठाईला एक आरोग्यदायी पर्याय ठरते, रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवते. डॉ बत्रा यांच्या मते, फळांमधील फायबर घटक पचनास मदत करते, आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळते. “
“याशिवाय, अभ्यासात असे दिसून आले आहे की, फळांनी भरपूर आहार घेतल्यास हृदयविकार, स्ट्रोक आणि काही कर्करोग यांसारख्या दीर्घकालीन स्थितींचा धोका कमी होतो,” असे डॉ बत्रा यांनी स्पष्ट केले.
शिवाय, फळांचे रंग फायटोकेमिकल्सची उपस्थिती दर्शवतात. फायटोकेमिकल्स हे संयुगे आहे जे रोगाशी लढण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाते. डॉ. बात्रा यांनी सांगितले की,”या फायटोकेमिकल्समध्ये दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट प्रभाव असतो, हानिकारक मुक्त रॅडिकल्समुळे झालेल्या नुकसानापासून पेशींचे संरक्षण करतात.”
हेही वाचा – मद्यपान कमी करणे किंवा पूर्णपणे बंद करणे हेच आहे सर्वोत्तम आरोग्याचे रहस्य? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
थोडक्यात, फळे ही संतुलित आहाराचे आवश्यक घटक आहेत. “त्यांची पौष्टिक समृद्धता, त्यांच्या रोगाशी लढण्याच्या क्षमतेसह संपूर्ण आरोग्य आणि कल्याण यांना चालना देण्यासाठी त्यांचे महत्त्व अधोरेखित करते. त्यामुळे, पुढच्या वेळी तुम्ही स्नॅक्स खाण्याची इच्छा होईल तेव्हा तुमच्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो हे लक्षात ठेवा आणि आहारात फळांचा समावेश करा.