“मी सकाळी ६ वाजता उठतो. मग माझी तयारी करतो. मी कोमट पाणी पितो. थंड शॉवर घेतो. मी सर्वांना हा सल्ला देतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही थंड पाण्याने अंघोळ करा. अगदी दिल्लीच्या हिवाळ्यातही. ते जितके थंड असेल तितके चांगले. तुम्ही मरणार नाही. तुमचे शरीर लवकर सुधारेल आणि त्यामुळे वजनदेखील कमी होते. तुम्ही हे करून बघा,” असा सल्ला दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्री यांनी एका मुलाखतीदरम्यान दिला.

रोज थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीर लवकर सुधारते किंवा वजन कमी होईल याबाबत तज्ज्ञांकडून जाणून घेतले. याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना गुरुग्राम येथील मरेन्गो एशिया हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल केअर अॅण्ड इमर्जन्सी विभागामध्ये सीनियर रजिस्ट्रार म्हणून कार्यरत असलेले डॉ. मुझामिल सुलतान कोका यांनी सांगितले, “दररोज थंड पाण्याने अंघोळ केल्यास तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होऊ शकतो. थंड पाण्यामुळे रक्ताभिसरण आणि शरीरप्रकृती चांगली सुधारते आणि वजन कमी होते. पण, थंड पाण्यामुळे अंघोळ करण्याच्या या परिणामांबाबत कोणतेही वैज्ञानिक संशोधन केले गेलेले नाही. परंतु, वैयक्तिकरीत्या आपण असे म्हणू शकतो की, थंड पाण्याने अंघोळ करण्याचे मानसिक आरोग्याचेही काही फायदे आहेत; ज्यामुळे तणाव कमी होतो आणि मूड सुधारतो.”

Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Nagpur, Thieves stole donation box Mahal,
साक्षात ‘विघ्नहर्ता’ मंडपात, तरीही चोरट्यांनी साधला डाव
kalyan dombivli municipal corporation marathi news
कल्याण डोंबिवली पालिकेतील दोन अभियंत्यांना आयुक्तांची कारणे दाखवा नोटिस, मलवाहिन्या सफाई कामातील ठेकेदाराच्या कामात त्रुटींकडे दुर्लक्ष
Golden Jackal
Golden Jackal : विक्रोळीत लांडग्यांची दहशत? वनअधिकारी म्हणतात, “तो लांडगा नव्हे तर…”
vladimir putin in touch with india china brazil over ukraine war
अन्वयार्थ : पुतिन यांचे ‘मित्र’ !
sanjay raut criticized devendra fadnavis
Sanjay Raut : “हा महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रकार”; राजकोट किल्ल्यावरील राड्यावरून संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले, “भाजपाच्या गुंडांनी काल…”
Pune potholes, Pune Municipal Commissioner,
पुणे : खबरदार… खड्डे न बुजविणाऱ्या मंडळांना आयुक्तांचा इशारा

थंड पाण्याने अंघोळ करण्याबाबत दिल्ली येथील सी. के. बिर्ला हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसिन विभागाचे संचालक डॉ. मनीष अरोरा म्हणाले, “थंड पाण्यामुळे शारीरिक प्रणालीला धक्का बसू शकतो. त्यामुळे सिंपथेटिक नर्व्हस सिस्टीम उत्तेजित होते आणि परिणामी हृदयाची गती व रक्तदाब वाढतो. कालांतराने शरीर थंड पाण्यासह जुळवून घेते आणि त्यामुळे अनेक संभाव्य फायदे होऊ शकतात.”

हेही वाचा – तुम्ही जेवताना तोंडातील घास एकाच बाजूने चावता का? असे करू नका, तज्ज्ञांनी दिली चेतावणी

रक्ताभिसरण सुधारण्यापासून तणाव कमी करण्यापर्यंत थंड पाण्याच्या अंघोळीचे विविध फायदे खालीलप्रमाणे :

रक्ताभिसरणात सुधारणा(Improved circulation) –

थंड पाण्याने अंघोळ केल्यास रक्तवाहिन्या आकुंचित होतात आणि नंतर विस्तारतात. त्यामुळे एकूणच रक्ताभिसरण सुधारते.

शरीरप्रकृतीत लवकर सुधारणा होण्यास मदत (Faster recovery) –

थंड पाण्याने अंघोळ केल्यास तीव्र शारीरिक हालचालींनंतर स्नायू दुखणे आणि सूज कमी होते.

रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ (Boosted immune System) –

नियमित थंड पाण्याने अंघोळ केल्यास पांढऱ्या पेशींचे उत्पादन वाढते आणि त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीही वाढते.

सतर्कतेत वाढ (Increased alertness) –

थंड पाण्याने अंघोळ केल्यामध्ये सतर्कता आणि ऊर्जेची पातळी वाढते.

त्वचा आणि केसांच्या आरोग्यात सुधारणा (Glowing skin and hair) –

थंड पाण्यामुळे त्वचेवरील छिद्रे मोकळी होतात आणि क्युटिकल घट्ट होते. परिणामी त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते.

वजनात घट (Weight loss)-

थंड पाण्याने अंघोळ केल्याने ब्राऊन फॅट्स सक्रिय होतात आणि त्यामुळे ऊर्जानिर्मितीसाठी कॅलरीजचा वापर होतो. ब्राऊन फॅट्स, ज्याला तपकिरी अॅडिपोज टिश्यूदेखील म्हणतात. ते ब्राऊन फॅट्स जेव्हा आपले शरीर खूप थंड होते तेव्हा आपल्या शरीराचे तापमान राखण्यासाठी मदत करतात.

तणावात घट (Reduced stress) –

थंड पाण्याने अंघोळ केल्याने कॉर्टिसोलची पातळी घटते आणि तणाव कमी होतो.

मूडमध्ये चांगला बदल – (Improved mood)

थंड पाण्याने अंघोळ केल्याल एंडोर्फिनची पातळी वाढते आणि नैसर्गिकरीत्या मूड सुधारतो.

हेही वाचा – तुम्ही पावसाळ्यात इअरड्रॉप्स वापरता का? आता सोडा ही सवय, तज्ज्ञांनी सांगितले कारण….

धोका काय ते लक्षात घ्या (Risks and considerations)

  • शारीरीक प्रणालीला धक्का : हृदयविकार किंवा इतर आरोग्य स्थिती असलेल्या व्यक्तींसाठी अचानक थंड पाण्याचा संपर्क धोकादायक ठरू शकतो.
  • संभाव्य हायपोथर्मिया : खूप थंड पाण्याचा दीर्घकाळ संपर्क राहिल्यास शरीराचे तापमान धोकादायकपणे कमी होऊ शकते. काय लक्षात घ्यावे?

थंड पाण्याने अंघोळ करण्याचे अनेक आरोग्य फायदे देतात; परंतु ते सावधगिरीने हाताळणे आवश्यक आहे. “तुम्हाला काही आरोग्यविषयक चिंता असल्यास, तुमच्या दिनचर्येत महत्त्वपूर्ण बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. सावकाश ती सुरुवात करा आणि थंड पाण्याने अंघोळीचा लाभ घेण्यासाठी तापमान हळूहळू कमी करा,” असे डॉ. कोका म्हणाले.

एकंदरीत, सहा महिने दररोज थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीर लवकर बरे होते आणि काही प्रमाणात वजन कमी होणे यांसारखे फायदे मिळू शकतात. परंतु, हे परिणाम व्यक्तींपरत्वे भिन्न असतात आणि इतर निरोगी जीवनशैलीच्या पद्धतींसह ते पूरक असले पाहिजेत.