श्रियाचा सक्काळ सकाळी मेसेज आला – “श्रावण सुरु होईल आणि अधिक मास आहेच – सध्या गोड करताना गूळ वापरतोय आम्ही चालेल का ?”
श्रियाच्या घरी साखरेला निरोप देऊन साधारण ६ ते ८ महिने झाले होते. आणि त्याचे उत्तम परिणाम तिलाही दिसू लागले होते. मात्र सणासुदीला गोड पदार्थ तर हवेतच, या जाणिवेने पर्यायी गोडव्यासाठी गुळाचा वापर करावा की, नाही या संभ्रमात पडली होती.

गूळ – साखरेला पर्याय म्हणून गूळ. शरीरातील लोह वाढावं म्हणून गूळ, शरीराला उत्तम म्हणून गूळ. पूर्वापार चालत आलेलं औषधी शिवाय गोड म्हणून गूळ. भारतीय आहारात गुळाचे वेगळे स्थान आहे.

Tomato
पावसाळ्यात टोमॅटो वापरण्यापूर्वी एकदा नव्हे दोनदा करा खात्री, कारण तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
actress Bhagyashree shared recipe of unpeeled potato
‘मैने प्यार किया’फेम भाग्यश्री म्हणते, “न सोललेल्या बटाट्यांमुळे कमी होतो क्रॅम्प्सचा त्रास” खरंच हे शक्य आहे का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
Plaster of Paris, eco-friendly Ganesh idol, POP,
विश्लेषण : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पर्यावरणास हानिकारक कसे ठरते? पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणे शक्य आहे का?
Healthy Foods for Your Liver
लिव्हर खराब होण्याचा धोका वाटतोय? लिव्हरमधील फॅट्स झपाट्याने काढून टाकतात ‘हे’ आठ पदार्थ? सेवनाची पद्धत घ्या समजून…
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
can diabetics eat potatoes
उकडलेला बटाटा खाल्ल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं की नियंत्रित राहतं? तज्ज्ञांनी दिलं उत्तर

आणखी वाचा: Health Special: दिवसा आणि रात्रीच्या पावसाच्या पाण्याचा आपल्यावर काय परिणाम होतो?

लेखाच्या सुरुवातीलाच मला आवर्जून सांगावेसे वाटते : ज्यांना मधुमेह आहे त्यांनी आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच गूळ आहारात समाविष्ट करावा. कारण मधुमेही शरीरात कोणत्याही गोड पदार्थाचा विपरीत परिणाम टाळण्यासाठी त्याचे आहारातील प्रमाण हे पोषक किंवा घातक ठरू शकते. गूळदेखील त्याला अपवाद नाही. शरीरातील इन्शुलिनची पातळी प्रत्येक कर्बोदके असणाऱ्या पदार्थावर अवलंबून असते त्यामुळं गुळाच्या गोडव्याचा अतिरेक नकोच.

गेली ३००० हून जास्त वर्षे गुळाचा आहारात वापर केला जातो. भारतासारख्या देशात जिथे कुपोषण आणि अतिपोषण अशा दोन्ही प्रकारचे आहारविषयक प्रश्न भेडसावतायत तिथे कुपोषण दूर करण्यासाठीदेखील गुळाचा आहारातील वापर वाढविण्याकडे भर दिला जातो. वर्षानुवर्षे आयुर्वेदिक औषधांमध्ये गुळाचा वापर केला जातोय. अनेक आशियाई आणि आफ्रिकन देशांमध्ये गुळाचे आहारातील प्रमाण वाढलेले लक्षात येते. अगदी च्यवनप्राश ते शीतपेये यांच्यामध्ये वेगेवेगळ्या प्रकारे गुळाचा वापर आढळून येतो.

आणखी वाचा: Health Special: तांबे, पितळ, स्टील-कशातून खावंप्यावं?

गूळ हा भारतीय शब्द आहे आणि आयुर्वेदामध्ये गोड म्हणजे गूळ अशी साधी सोपी गुळाची व्याख्या आहे. तुम्ही म्हणाल पण पांढरी साखर आणि गूळ दोन्ही मध्ये फरक काय? गोडच आहे ना? पांढऱ्या साखरेत सुक्रोज नावाची साखर असते आणि गुळामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि कमी प्राणात सुक्रोज आढळून येते. तसेच त्यात लोह, जस्त, तांबे, कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम या खनिजांचे प्रमाण मुबलक असते. गूळ केवळ ऊर्जाच नव्हे तर शरीरासाठी गुणकारी आहे.

गुळाचे काही उपयोग खालीलप्रमाणे आहेत
-संधिवात कमी करणे
-शरीरातील पित्तविकार कमी करणे
-स्नायू आणि मज्जातंतूंना शिथिल होण्यापासून वाचविणे
-शरीराची लवचिकता अबाधित राखणे
-रक्तदाब नियंत्रणात आणणे
-घसा आणि फुफ्फुसाच्या संसगापासून रक्षण करणे
-(सर्वप्रसिद्ध आणि सर्वोन्मुख ) हिमोग्लोबिनची पातळी वाढविणे

गुळातील लोह अनेमिया आणि कुपोषणावर मात करण्यास मदत करते. यातील मुबलक कॅल्शिअम हाडांच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. यातील मॅग्नेशिअम स्नायूंवरील ताण कमी करते. आहारातील गुळाचा योग्य वापर मज्जासंस्थेला बळकट करण्यास गुणकारी ठरू शकतो. यातील पोटॅशिअमचे प्रमाण रक्तदाब असणाऱ्यांसाठी गुणकारी आहे. गुळातील खनिजे आणि पोषणमूल्ये रक्त शुद्ध करून संधिवात होण्यापासून वाचवू शकतात. काविळीसारख्या आजारांमध्ये गूळ औषधी आहे. गुळाचे योग्य प्रमाण शरीरातील शुक्राणूंचे प्रमाण वाढविण्यासाठीदेखील उपयुक्त आहे .

गूळ हे नैसर्गिक पाचक आहे. सकाळी गरम पाण्यातून गूळ प्यायल्याने चयापचय क्रिया सुधारते आणि भूक नियंत्रणात येते. सकाळी प्यायले जाणारे हे पाणी पित्तशामक आहे. तसेच शरीरातील आम्लांश कमी करण्यासाठी पूरक आहे. यामुळे शरीरातील पाचक आम्लांचे प्रमाण नियमित राखले जाऊन वजन कमी होण्यास देखील मदत होऊ शकते. चणे किंवा दाणे आणि गूळ एकत्र खाल्ल्यामुळे स्नायूंचे आरोग्य उत्तम राखले जाते. “मी रोज चणे आणि गूळ एकत्र करून खातो म्हणून माझी बुद्धी तल्लख आहे” असं वर्गात ऐकून आमचा एक शाळकरी मित्र वर्गातील अर्ध्याहून जास्त ‘मित्रवर्ग चणे गूळ मंडळा’त सहभागी झाला होता. चण्यातील प्रथिने आणि पोषणद्रव्ये स्नायूंची बळकटी वाढवतात आणि गूळ शरीरातील खनिजद्रव्ये आणि चयापचय क्रियेचे संतुलन राखतात. उत्तम त्वचेसाठीदेखील चणे-गूळ जोडगोळी अत्यंत गुणकारी आहे.

हळद आणि गूळ ह्याचे मिश्रण भारतीय घराघरात वापरले जाते. बद्धकोष्ठ दूर करणे, पचन सुधारणे, रोगप्रतिकारशक्ती वाढविणे यासाठी हे मिश्रण पूरक आहे. मानसिक आरोग्यासाठी तसेच नखे आणि केस उत्तम राखण्यासाठी हळद-गुळाचे मिश्रण आरोग्यकारक आहे. जेवणानंतर गूळ -तूप खाण्याची पद्धत अनेक प्रांतांमध्ये प्रसिद्ध आहे. शरीरातील इन्शुलिनवर योग्य अंकुश ठेवून विविध प्रकारचे क्रेविंग्स किंवा अवेळी गोड खाण्याची सवय कमी करण्यासाठी हे मिश्रण गुणकारी मानले जाते. तसेच त्वचा, केस आणि नखांच्या आरोग्यासाठी हे मिश्रण गुणकारी मानले जाते. ज्यांना अर्धशिशी किंवा मायग्रेन आहे त्यांच्यासाठी गूळ -तूप (दिवसभरात केवळ एक चमचा ) अत्यंत आरोग्यदायी आहे.

पांढरी साखर वापरण्यापेक्षा गूळ वापरणे कधीही उत्तम!
पावसाळ्यात चहा, कॉफी किंवा तत्सम पेये करताना – गोडव्यासाठी गुळाचा वापर करणे केव्हाही बेहत्तर आहे.

योग्य गूळ कसा निवडावा?
बाजारात गुळाचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. गूळ खरेदी करताना खालील मुद्दे जरूर लक्षात घ्यावेत.
-गूळ कडवट किंवा खारट नसावा.
-गूळ दाणेदार नसावा.
-गुळाचा रंग तांबूस किंवा गडद तपकिरी असावा.
-गूळ घट्ट म्हणजेच तोडायला अवघड असावा.

हे सगळे मुद्दे वाचल्यावर – मग गूळ पावडर बद्दल काय करावं, असा प्रश्न नक्कीच पडला असेल. गूळ पावडर निवडताना देखील त्याचा रंग आणि चव याकडे लक्ष देणं आवश्यक आहे.