शरीरातील पाण्याची पातळी राखणे किती आवश्यक आहे, याबाबत वैद्यकीय क्षेत्रामध्ये चर्चा आहे आणि दिवसभरामध्ये किती वेळा पाणी प्यायले पाहिजे याबाबत विविध मदभेद आहेत. पण, या सर्वांमध्ये दिवसभर आपली तहान भागवणाऱ्या पाण्याच्या बाटल्या मात्र दुर्लक्षित होत आहेत. आपल्यापैकी बहुतेक लोक पाण्याच्या बाटल्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता याकडे दुर्लक्ष करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोएडा येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट पेडिएट्रिशियन म्हणून कार्यरत असलेले डॉ. प्रशांत यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की, पाण्याच्या बाटलीची नियमित स्वच्छता न केल्यास बॅक्टेरियांची वाढ होते. बंदिस्त आणि ओलसर भागात बॅक्टेरियाच्या वाढीस चालना मिळते. साल्मोनेला (salmonella) आणि E.coli यांसारखे बॅक्टेरिया पाण्याच्या बाटलीमध्ये वाढतात. तसेच पाण्याच्या बाटलीमध्ये बुरशी निर्माण होण्याची शक्यता आहे.

वेळच्या वेळी प्लास्टिकच्या बाटल्या न धुतल्याने दुर्गंधी येऊ शकते. पाण्याच्या बाटलीमध्ये बायोफिल्म (biofilm) नावाचा बॅक्टेरिया विकसित होतो, जो साफ करून नष्ट करणे अवघड आहे.

हेही वाचा – भारतीयांमध्ये आहे लोह, कॅल्शियम व फोलेटची कमतरता; लॅन्सेट अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष, जाणून घ्या, तुम्ही कोणते पदार्थ खावेत?

तुम्ही तुमच्या पाण्याच्या बाटल्या कशा धुतल्या पाहिजे?

डॉ. प्रशांत यांनी सुचवले की, वाहत्या पाण्याखाली फक्त बाटली धुण्यापेक्षा रोज साबणाच्या पाण्याने बाटली धुणे जास्त योग्य आहे. पाण्याच्या बाटलीचा वापर जर ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक यांसारख्या पेयांसाठी केल्यास ती बाटली प्रत्येकवेळी धुवून मगच वापरावी.

जर प्लास्टिकची बाटली तुम्ही वापरत असाल तर हे लक्षात ठेवले पाहिले की, जेव्हा ते गरम पाणी किंवा रासयिनक डिटर्जंट पावडरच्या संपर्कात आल्यास त्यांचे नुकसान होऊ शकते. तसेच जर काचेची बाटली वापरत असाल तर ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत उष्णता सहन करू शकते, तसेच स्टेनलेस स्टीलची बाटली कधीकधी ब्लीच आणि क्लोरीनच्या संपर्कात आल्यास रासायनिक प्रक्रिया होते, ज्यामुळे तुमच्या भांड्याच्या आतील बाजूस नुकसान होऊ शकते.

हेही वाचा – “तुम्हाला जिमची गरज नाही, फक्त कॉमन सेन्स वापरा’, मिलिंद सोमण यांनी सांगितला फिटनेस मंत्र

तुम्ही पाण्याची बाटली निवडताना काळजी घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When was the last time you washed your water bottle know what expert says snk