माणसाला स्मरणशक्ती ही देणगी मिळाली आहे. अनेक चांगल्या-वाईट आठवणी आपल्या स्मृतीत असतात. काही आठवणी या एकमेकांशी संबंधितही असतात. काही आठवणींमुळे आपण जगात घडणाऱ्या घटनांचे आकलन करत असतो. या आठवणी शरीरात कुठे साठवल्या जातात, आठवणी येण्याचे कार्य कसे घडते, हे समजून घेणे रंजक ठरेल.
स्मृती या आपल्या मेंदूमध्ये साठवलेल्या असतात. आपण जे बघतो, शिकतो ते मेंदूच्या विशिष्ट भागांमध्ये साठवले जाते. या स्मृती आपल्याला भविष्यकाळात घडणाऱ्या घटना समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. स्मृतींचे विभाजनही केले जाते. मेंदूमध्ये सर्वच गोष्टी, घटना लक्षात राहत नाही. काही लोकांच्या स्मरणशक्तीमध्ये बहुतांशी गोष्टी राहतात. परंतु, सामान्यतः मेंदू विश्वसनीय आणि ज्यांचा उपयोग आहे, अशा गोष्टी अधिक लक्षात ठेवतो. मेंदूमध्ये स्मरणशक्ती कुठे असते आणि ती कार्य कसे करते, यावरती नुकतेच नवीन संशोधन करण्यात आले. संशोधनानुसार सर्व स्मृती हिप्पोकॅम्पस या ठिकाणाहून निओकॉर्टेक्समध्ये स्थलांतरित केल्या जातात. मेंदूचा हिप्पोकॅम्पस हा भाग पाहिलेली ठिकाणे, जागा, इमारती लक्षात ठेवण्याचे काम करतो. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी एखाद्या ठिकाणी आपण गेलो असू तर आता नवीन झालेले बदल, जागेच्या रचना यांची आपण तुलना करू शकतो. निओकॉर्टेक्स हा सेरेब्रल कॉर्टेक्स चा भाग आहे. मानवी मेंदूची अर्ध्याहून अधिक जागा त्यांनी व्यापलेली असते. ध्यान, स्मरण, आठवणी, अशा गोष्टी लक्षात राहतात. एपिसोडिक मेमरी म्हणजे प्रासंगिक स्मरणशक्ती यामध्ये साठवली जाते. जसे ठिकाण, भौगोलिक स्थान अशा प्रकारच्या आठवणी यामध्ये असतात. तथापि, संशोधनात असे दिसून आले आहे की, हिप्पोकॅम्पसमध्ये काही आठवणी वेळ निघून गेल्यानंतरही राहतात. परंतु, ब्रेनस्ट्रोक, ट्युमर, अल्झायमर अशा रोगांमध्ये हिप्पोकॅम्पसला दुखापत होऊन स्मृतीवर परिणाम होतो.
हेही वाचा : जिमला जाताय? तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा… व्यायाम करताना होणारे अपघात टाळण्यासाठी काय करावे ?
हॉवर्ड ह्यूजेस मेडिकल इन्स्टिट्यूट, यूएस, युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन, यूके यांच्या सहकार्याने हे संशोधन मॅथमॅटिकल न्यूरल नेटवर्क थेअरी (mathematical neural network theory) मांडते, ज्यानुसार स्मृती निओकॉर्टेक्समध्ये कायमस्वरूपी एकत्रित राहतात.
हेही वाचा : Health Special: योग्य पद्धतीने वजन वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ नक्की खा !
जर्नल नेचर न्यूरोसायन्समध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार, स्मृतींचे सामान्यीकरण केले जाते. त्यांचे विभाजनही होते. आवश्यक-अत्यावश्यक स्मृती, भौगोलिक जागा, ठिकाणे, जागा यांचे ज्ञान होते. पाण्याचा अंदाज, कुठे-कधी किती पाणी असू शकते, यांचे अंदाज आपण या स्मृतींमुळे करू शकतो. एपिसोडिक स्मृतींपेक्षा या स्मृती वेगळ्या असतात ज्यामध्ये विशिष्ट वैशिष्ट्यांसह भूतकाळातील तपशीलवार आठवणी असतात, जसे पाण्यातील साहसी खेळ खेळताना केलेल्या गोष्टी या प्रकारे.
हेही वाचा : शिजवलेल्या अन्नासह सॅलड खाताय ? ‘हे’ पदार्थ ठरू शकतात धोकादायक
या सिद्धांतानुसार, एकत्रीकरणामध्ये मेंदूच्या एका भागातून दुस-या भागामध्ये आठवणी कॉपी करण्याऐवजी मागील आठवणींमधून सामान्यीकृत नवीन स्मृती तयार केल्या जातात. हिप्पोकॅम्पसमध्येही स्मृती स्थिर राहते आणि निओकॉर्टेक्समध्येही नव्याने साठवली जाते.
प्रायोगिक अभ्यासांसह या सैद्धांतिक प्रस्तावाचा पाठपुरावा करणे ही या संशोधनाची पुढची पायरी आहे, ज्यात एकत्रीकरणाचे नियमन करताना मेंदू स्मरणांच्या अपेक्षित आणि अनपेक्षितपैलूंमध्ये फरक कसा करू शकतो, याच्या मॉडेल्सची चाचणी करणे समाविष्ट आहे.मानवी मानसिक आरोग्य आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये संभाव्य महत्त्व असलेल्या आकलनशक्तीच्या आकलनासाठी स्मरणशक्ती कशी कार्य करते, हे समजून घेण्यासाठी हे संशोधन सुरु आहे.