प्रोटीन आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त घटक मानले जाते. प्रोटीनमध्ये अमिनो आम्ल आढळते, ज्यामुळे शरीरातील वेगवेगळ्या क्रिया व्यवस्थित पार पडण्यास मदत होते. यासह रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, हाडं मजबुत करणे, मेटाबॉलिजम सुधारणे असे प्रोटीनचे अनेक उपयोग आहेत. त्यामुळे प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. कोणत्या पदार्थांमध्ये भरपूर प्रोटीन आढळते जाणून घ्या.
या पदार्थांमध्ये आढळते भरपूर प्रोटीन
आणखी वाचा: हिवाळ्यात गूळ खाणे ठरेल आरोग्यासाठी वरदान! जाणून घ्या फायदे
बटाटा
बटाट्यामध्ये भरपूर प्रोटीन आढळते. यामध्ये भरपूर स्टार्च असते, यासह यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेटसारखे महत्त्वाचे पोषकतत्व आढळतात. पण बटाट्यामध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असल्याने हे योग्य प्रमाणात खाणे आवश्यक आहे.
सोयाबीन
हेल्थलाईननुसार सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळते, यासह यात कॅल्शियम, मॅग्नेशियम असे पोषकतत्त्वही आढळतात. सोयाबीन वजन नियंत्रित ठेवण्यासह, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते.
आणखी वाचा: ‘या’ फळांमुळे वाढू शकते रक्तातील साखर; मधुमेहाच्या रुग्णांनी वेळीच व्हा सावध
मसूर
एक कप मसूरच्या डाळीत १८ ग्रॅम प्रोटीन असते. यामध्ये फोलेट, मँगनिज, लोह आढळते, तसेच यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होण्यासह रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते व वजन कमी होण्यासही मदत होते. त्यामुळे रोजच्या जेवणात मसूरच्या डाळीचा समावेश करावा.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)