Which finger should you get a glucometer test done on? डायबिटीज आता एक गंभीर आजार बनला आहे. भारतात डायबिटीजचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जगभरात लाखो लोकांना डायबिटीज आहे. डायबिटीज रुग्णांना खूप काळजी घ्यावी लागते. जीवनशैलीत बदल करणे औषधांद्वारे सतत काळजी घेणे. मात्र, औषधांमध्ये हलगर्जीपणा केल्यास रक्तातील साखरेच्या पातळीवर गंभीर परिणाम होऊ शकतात. तसेच डायबिटीज रुग्णांना वरचेवर टेस्टही कराव्या लागतात. तुम्हालाही डायबिटीज आहे का? मग ऐका! तुम्हीही ग्लुकोमीटर चाचणीसाठी वारंवार डॉक्टरकडे जात असाल, तर काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. डायबिटीजची टेस्ट करण्यासाठी तुम्ही कोणत्या बोटाचा वापर करावा, काय खबरदारी लक्षात घ्यायला हवी हे आज आपण जाणून घेऊ. तसेच या विषयावर जागरूकता वाढवण्यासाठी होलिस्टिका वर्ल्डचे संस्थापक व संचालक डॉ. धर्मेश शाह यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
टेस्ट करताना कोणत्या बोटावर करायची?
ग्लुकोमीटर टेस्टसाठी सामान्यतः अंगठा व तर्जनी न घेता इतर बोटांच्या टोकाची बाजू वापरण्याची शिफारस केली जाते. डॉ. धर्मेश शाह यांच्या मते, ग्लुकोमीटर टेस्टसाठी सहसा मधले बोट किंवा करंगळी वापरली जाते. शहा यांनी स्पष्ट केले की, बोटांची टोकाची बाजूला कमी संवेदनशील असते आणि त्यामध्ये जास्त रक्तवाहिन्या असतात आणि त्यामुळे पुरेसा रक्त नमुना मिळणे सोपे होते. “रोटेशनमध्ये वेगवेगळ्या बोटांचा वापर केल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. जास्त पिळण्यामुळे रक्ताचा नमुना टिश्यू फ्लुइडने पातळ होऊ शकतो, ज्यामुळे चुकीची टेस्ट होऊ शकते. म्हणून टेस्ट करताना योग्य बोटावर टेस्ट करावी. अंगठा आणि तर्जनी अधिक संवेदनशील असल्याने ते टाळण्याची शिफारस केली.
ग्लुकोमीटर टेस्टसाठी जाताना या गोष्टी लक्षात ठेवा
डॉ. धर्मेश शहा म्हणाले की, टेस्ट करण्याआधी तुम्ही तुमचे हात धुवा आणि चाचणीपूर्वी ते स्वच्छ आणि कोरडे असल्याची खात्री करा. तुमच्या बोटाच्या टोकाला टोचून घ्या, कारण ते कमी वेदनादायक आणि रक्ताचा नमुना तयार करण्यात अधिक प्रभावी आहे. तुम्ही प्रत्येक चाचणीसाठी वेगवेगळी बोटे फिरवण्याचा प्रयत्न करू शकता आणि वेदना होण्यापासून रोखू शकता,”
हेही वाचा >> डायबिटीजची औषधे घेणे अचानक बंद केल्यावर शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात
ग्लुकोमीटर टेस्टसाठी तुम्ही योग्य लेन्सिंग डिव्हाइस सेटिंग वापरत आहात याची खात्री करा.
डॉ. धर्मेश शहा म्हणाले की, टेस्ट केल्यानंतर ते रेकॉर्ड करा. “तुमच्या रक्तातील साखरेचे रीडिंग नोंदवून ठेवा, तारीख, वेळ आणि कोणतेही चढ-उतार व बदलांचे निरीक्षण करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी जेवण किंवा औषधांसारखे कोणतेही संबंधित घटक लक्षात ठेवा.”