Uric Acid: शरीरात युरिक ऍसिड वाढत असताना वेळीच उपचार केला नाहीतर अगदी उठताना बसताना सुद्धा शरीर साथ देणं थांबवू शकतं. डॉ. अमरेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते, शरीरातील युरिक ऍसिड हे मुख्यतः किडनीच्या मार्फत फिल्टर होऊन मलमूत्रातून बाहेर पडते पण जेव्हा किडनीची कार्यक्षमता कमी होते तेव्हा युरिक ऍसिड शरीरात छोट्या खड्यांसारखे जमा होते. युरिक ऍसिड जसे वाढते तसेच ते कमी करणे सुद्धा आपल्याच हातात आहे. आहारावर नियंत्रण ठेवून आपणही या समस्यांवर मात करू शकता. आहारतज्ज्ञांच्या मते व्हिटॅमिन सी असणाऱ्या फळांच्या सेवनाने युरिक ऍसिडचा शरीरातील स्तर कमी होण्यास मदत होते. ही व्हिटॅमिन सी युक्त लिंबू गटातील फळं कोणती व त्यांचा नेमका फायदा काय हे ही जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्यांना युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त असल्याने उद्भवणारे त्रास असतात, अशा लोकांनी सिट्रसयुक्त फळांचे सेवन करणे फायद्याचे ठरू शकते. यात विशेषतः संत्रे, आवळा, लिंबू अशी फळं समाविष्ट असतात. या आम्लयुक्त फळांमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण मुबलक असते. ही फळे शरीरातील टॉक्सिन्स पदार्थ बाहेर काढून टाकण्यात मदत करतात.

युरिक ऍसिडचा त्रास असल्यास ‘या’ फळांचे सेवन ठरते फायद्याचे

किवी

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलजी इन्फॉर्मेशन NCBI (National Center for Biotechnology Information)च्या अभ्यासानुसार, किवीमध्ये पोटॅशियम, फोलेट, विटामिन सी व विटामिन ई चे मुबलक प्रमाण असते परिणामी युरिक ऍसिडवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. आपल्याला अपचनाच्या संबंधित तक्रारी असल्यास त्यावरही किवीचे सेवन गुणकारी ठरू शकते.

सफरचंद

सफरचंद खाल्ल्याने युरिक ऍसिडचा स्तर कमी होण्यास मोठी मदत होऊ शकते. सफरचंद हे फायबरचा साठा असणारे फळ आहे. एक सफरचंद खाल्ल्यावर भूक सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते. फायबरमुळे युरिक ऍसिड शोषून घेतले जाते व नंतर मल मूत्रमार्ग अतिरिक्त युरिक ऍसिड शरीरातून बाहेर फेकले जाते.

युरिक ऍसिडचा त्रास असल्यास ‘या’ फळांचे सेवन टाळावे

चिंच


चिंचेत असणाऱ्या फ्रुक्टोजमुळे शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाणे वाढते, त्यामुळे चिंच ही युरिक ऍसिडचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते.

खजूर

खजूरात प्यूरीनचे प्रमाण कमी व फ्रुक्टोजचे प्रमाण अधिक असते. यामुळे रक्तातील फ्रक्टोज व परिणामी युरिक ऍसिड वाढू लागते.

हे ही वाचा<< युरिक ऍसिडच्या त्रासात लिंबासह ‘या’ पदार्थांचे सेवन ठरते रामबाण उपाय; हृदय व किडनी आजारांपासून राहा लांब

चिकू


चिकुमधील फ्रुक्टोजमुळे शरीरात युरिक ऍसिड वाढते त्यामुळे चिकूचे सेवन शक्यतो टाळावे किंवा कमी करावे.

(वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which fruits can increase or reduce uric acid in body kidney disease symptoms seen in body svs
Show comments