Which is more helpful for weight loss Curd vs Buttermilk: अनेक लोक ताकापेक्षा दही खाण्यास अधिक पसंती दर्शवतात. त्यामुळे तुलनेत दही सर्वाधिक लोकप्रिय आहे, असे म्हटले जाते. उत्तम पचन आणि आरोग्यासाठी नियमित आहारात दह्याचा समावेश करा, असा सल्ला डॉक्टर देतात; तर तज्ज्ञ दह्यापेक्षा ताकाला प्राधान्य दिले पाहिजे, असे सांगतात. कारण- ते पचायला हलके असते. त्याशिवाय आयुर्वेदानुसार ताक हे शरीराला आरोग्यासाठी चांगले आहे. पण, दही आणि ताक दोन्ही गोष्टी सारख्याच प्रक्रियेने बनवल्या जातात. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की, दह्याचे सेवन करावे की ताकाचे. तेव्हा चला तर मग जाणून घेऊ की, दही आणि ताकाचे आपल्याला नक्की कोणते फायदे होतात? आरोग्य प्रशिक्षक डॉ. डिंपल जांगरा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
शरिरातील उष्णतेमुळे दही आंबते आणि थंड होण्याऐवजी ते तुमचे शरीराला उष्णतेचा अधिक त्रास होतो. ” डॉ. डिंपल यांनी एका Instagram व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
वजन कमी करण्यासाठी ताक फायदेशीर
तज्ञ सांगतात की,ताक हलके असते; तर दही जड असते. ताकाचा वापर आपण वजन कमी करण्यासाठी करू शकतो; तर दही आपले वजन वाढवू शकते. त्यातून दही हे गरम; ताक त्या मानानं थंड असते. @drdimplejangda या इन्टाग्राम पेजवरून डॉ. डिंपल यांनी हा फरक समजावून सांगितला आहे. त्यामुळे जर का तुमच्या शरीरात उष्णतेची कमतरता असेल, तर तुम्ही ताकापेक्षा दही घ्यावे आणि जर का तुमच्या शरीरात उष्णता जास्त असेल, तर तुम्ही ती कमी करण्यासाठी ताक पिऊ शकता.
वजन कमी करण्यासाठी ताक पिऊ शकता
याव्यतिरिक्त, डॉ. डिंपल यांच्या मते, ताक हे सर्व ऋतूंमध्ये शरीरासाठी चांगले असते. “ते दह्यापेक्षा खूप आरोग्यदायी आहे”, असंही त्या सांगतात. याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला जर का वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही ताक पिऊ शकता; अन्यथा दही तुमच्यासाठी योग्य आहे. येथे तुम्ही वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरेल.
कुणी दही खाऊ नये?
- लठ्ठपणा, कफ विकार, रक्तस्राव विकार, दाहक विकार, जडपणा वाढणे, सांधेदुखी अशा व्यक्तींनी दही टाळावे.
- रात्री दही खाऊ नये. कारण- त्यामुळे सर्दी, खोकला होऊ शकतो. (परंतु, जर तुम्हाला रात्री दही खाण्याची सवयच असेल, तर त्यात चिमूटभर काळी मिरी किंवा मेथी टाकावी.)
- दही गरम करून खाणे टाळा. कारण- अशा पद्धतीने दह्याचे सेवन केल्याने त्यातील सर्व पौष्टिकता निघून जाते.
- त्वचेचे विकार, पित्ताचे असंतुलन, डोकेदुखी, झोपेचा त्रास आणि पचनाचे विकार असलेल्या लोकांनी दही खाणे टाळले पाहिजे.
- “ताक हा दह्याला उत्तम पर्याय मानला जातो,” असे डॉ. डिंपल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. तसेच ताक कसे तयार करायचे हेही सांगितले आहे. दोन चमचे दही किंवा दही फेटून, त्यात एक ग्लास पाणी घाला. थोडी जिरेपूड, गुलाबी मीठ घालून कोथिंबिरीने सजवा.
काय आहेत ताकाचे फायदे?
- ताक पचायला हलके आहे. कारण- ते आपले पचन सुधारते. त्यामुळे सूज, पचनाचे विकार, भूक न लागणे, अशक्तपणा यासाठी ते फायदेशीर आहे. हिवाळ्यात अपचनावर उपचार करण्यासाठीही ते फायदेशीर आहे.
- याव्यतिरिक्त पोषणतज्ज्ञ डॉ. योगिनी पाटीलही दह्याऐवजी ताक पिण्याची शिफारस करतात. पचनासाठी ताक हे हलके असते, तसेच त्यामुळे भूक वाढण्यास मदत होते. दही पचायला जड असल्यामुळे रात्रीच्या जेवणात ते खाऊ नये. शिवाय, जर एखाद्याला बद्धकोष्ठता इत्यादी पचनाच्या समस्या असतील, तर गोड ताक घेणे चांगले ठरेल.
- वजन कमी करण्यासाठी : जर तुमची पचनक्रिया चांगली असेल, तर दही खाल्ल्याने वजन वाढण्यास मदत होते. वजन कमी करायचे असेल, तर ताक सेवन करा आणि दह्यापासून दूर राहा.
- सोबतच ताक हे आपल्या शरीरासाठी थंड व आरामदायी असते. त्यामुळे त्याचा आपल्या शरीराला चांगला फायदा होतो.
हेही वाचा >> Blood pressure: हाय बीपीच्या लोकांनी रोज सकाळी फक्त ‘हा’ एक प्राणायाम करा, औषधाची गरज होईल कमी
काय आहेत दह्याचे फायदे?
- दही खाल्ल्याने आपल्याला शरीरातील व्हिटॅमिन बीचीही कमतरता कमी होते.
- त्याचसोबत दह्याने इम्युनिटीही वाढते.