Best Spice for Health : अन्नपदार्थांमध्ये स्वाद आणण्यासाठी मसाले हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. मसाले हे केवळ जेवणाचा स्वाद वाढवत नाही तर आरोग्यासाठी तितकेच फायदेशीर असतात. जेवणाची चव वाढवण्यापासून आरोग्याच्या इतर फायद्यांसाठी मसाले हे महत्त्वाचे घटक आहे. मसाल्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेसुद्धा आहेत, पण त्यासाठी आहारात या मसाल्यांची भूमिका समजून घेणे महत्त्वाचे आहे. या संदर्भात न्यूट्रिशनिस्ट अपूर्वा अग्रवाल यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी आरोग्यासाठी चांगले असे मसाले सांगितले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हळद

अपोलो हॉस्पिटलच्या न्यूट्रिशनिस्ट डॉ. प्रियंका रोहतगी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, “हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट करकुमिन असते, जे शरीरासाठी चांगले असते. अनेक संशोधनातून समोर आले आहे की, हळद पचनाशी संबंधित समस्या आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजार दूर करण्यास मदत करतात. त्यात असलेले पिवळ्या रंगाचे द्रव्य मेंदूच्या कार्यावर प्रभाव करू शकतात.”

दिल्लीच्या एनएफसी येथील आर्टेमिस लाइटच्या न्यूट्रिशनिस्ट डॉ. संगीता तिवारी सांगतात, “हळदीमध्ये कर्करोगावर मात करणारे गुणधर्म असू शकतात. हळद कर्करोगाच्या पेशी वाढू नये, म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात.”
त्या पुढे सांगतात, “हळदीचे अतिप्रमाणात सेवन करणेसुद्धा चांगले नाही. जी लोकं दीर्घ कालावधीसाठी हळदीचे सेवन करत असतील, त्यांना यकृत किंवा पित्ताशयाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. याशिवाय ज्या लोकांना वारंवार रक्त गोठण्याचा आजार असेल, त्यांनी हळदीचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.”

काळी मिरी

डॉ. रोहतगी सांगतात, “काळी मिरीला मसाल्यांचा राजा म्हटले जाते. कारण काळी मिरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि बॅक्टेरियाचे वाढ थांबवणारे गुणधर्म असतात. याशिवाय काळी मिरी पोषक तत्वे शोषून घेण्यास आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात.

डॉ. तिवारी सांगतात, “काळी मिरीच्या अति जास्त वापरामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनलच्या समस्या निर्माण होऊ शकतात. गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स आजार (GERD) या सारखी गॅस्ट्रोइंटेस्टाइनलची समस्या निर्माण होऊ नये, म्हणून काळी मिरीचा मर्यादेत वापर करावा.

हेही वाचा : वजन झटपट कमी करण्यासाठी आहारात ‘या’ एका सुपरफुड्सचा समावेश करा; कोलेस्‍ट्रॉलही राहील नियंत्रणात

दालचिनी

डॉ. रोहतगी सांगतात, “दालचिनी हृदयाशी संबंधित आजार कमी करते. दालचिनी उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.”
तर डॉ. तिवारी सांगतात, “अति प्रमाणात दालचिनीचे सेवन केल्यामुळे यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दालचिनीचा मर्यादित वापर करणे गरजेचे आहे. या ऐवजी सीलोन दालचिनी तुम्ही वापरू शकता.

धणे

रोहतगी सांगतात, “धणे हे पचनाशी संबंधित समस्येसाठी फायदेशीर आहेत. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते आणि धण्यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

कोणते मसाले आरोग्यासाठी चांगले आहेत?

डॉ. रोहतगी सांगतात, “हळद करकुमिन अँटिऑक्सिडंटमुळे सर्वात प्रभावी मसाल्यांपैकी एक आहे. ज्या लोकांना यकृत किंवा पित्ताशयाची समस्या नाही, त्यांच्यासाठी हळद अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर आहे. दालचिनीदेखील तितकीच फायदेशीर आहे. दालचिनीमुळे रक्तातील साखर कमी होते, कोलेस्ट्रॉलची मात्रा सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कॅसिया दालचिनीचे सेवन केल्याने यकृत निरोगी राहण्यास मदत होते.”

“काळी मिरी पोषक तत्वे शोषून घेण्यास मदत करते, हळद रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते आणि दालचिनी ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. अन्य अँटिऑक्सिडंट गुणधर्मासाठी धणेदेखील फायदेशीर आहे. मसाले आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी त्यातील पोषक घटक जाणून घेणे आणि मर्यादेत सेवन करणे गरजेचे आहे”, असे डॉ. रोहतगी सांगतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which is the best spice for your health turmeric cinnamon black pepper or coriander which one is good for health ndj