Work Out for Weight Loss: आजकाल वजन वाढ ही अनेकांची समस्या झालेली आहे. प्रत्येक जण आपल्या आरोग्याबाबत आणि वाढत्या वजनाबाबत चिंतेत असतो. अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण तासंतास जीममध्ये जाऊन घाम गाळतात. एवढंच नव्हे तर खाण्या-पिण्यावरसुद्धा नको तितकं नियंत्रण ठेवून डायटिंग केलं जातं. मात्र, तरी सुद्धा त्याच्या पदरी निराशाच पडते. प्रत्येक व्यक्तीसाठी निरोगी वजन असणे खूप आवश्यक आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वजन कमी करण्यासाठी, आपल्याला स्ट्रिक्ट डायट आणि हेवी एक्सरसाइजचा अवलंब करावा लागतो. वजन कमी करण्यासाठी अनेकजण हजारो रुपये खर्च करतात. हिवाळा ऋतू आला आहे आणि या ऋतूमध्ये लोकं त्यांच्या आरोग्याबाबत थोडे अधिक जागरूक असतात. निरोगी आहार आणि व्यायामासाठी थंडीचा काळ उत्तम मानला जातो. अलीकडे १२-३-३० चा व्यायाम खूप लोकप्रिय झाला आहे आणि बरेच लोक ते फॉलो करत आहेत. पण हा व्यायाम केल्याने वजन झपाट्याने कमी होऊ शकतो का, याच विषयावर आरोग्य तज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

हा अभिनव ट्रेडमिल वर्कआउट सर्वप्रथम लॉरेन गिरल्डोने सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. त्याने हा व्हिडिओ २०१९ मध्ये यूट्यूबवर आणि त्यानंतर २०२० मध्ये टिकटॉकवर शेअर केला होता. गिराल्डने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरही हा व्हिडिओ शेअर केला आहे.

(हे ही वाचा : बेली फॅट झपाट्याने कमी करण्यासाठी पपई, संत्री की सफरचंद कोणते फळ खाणं अधिक फायदेशीर? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या… )

१२-३-३० वर्कआऊट काय आहे?

हा एक ट्रेडमिल वॉकआउट आहे, हा वर्कआउट ट्रेडमिलवर ठराविक वेळेसाठी ठराविक वेगाने केल्याने तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळू शकतात. तुम्ही ट्रेडमिलवर वर्कआऊट करता तेव्हा तुमचा वेग ३ आणि १२ असावा. तुम्ही हे ३० मिनिटांसाठी करु शकता. असे मानले जाते की, हा व्यायाम एक महिना सतत केल्याने एक महिन्यानंतर तुमच्या शरीरात बरेच बदल दिसून येऊ शकतात. म्हणजेच वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

हा वर्कआउट खूप शक्तिशाली मानला जातो, कारण हा व्यायाम करताना तुम्ही इंक्लाइंड ट्रेडमिलवर चालता, ज्यामुळे तुम्ही अधिकाधिक कॅलरी बर्न करु शकता. ३० मिनिटांसाठी १२-३ च्या वेगाने चालण्याने, तुम्ही सुमारे २४० ते २५० कॅलरीज बर्न करू शकता.

या व्यायामाने सांधेदुखी असलेल्या किंवा अगदी तंदुरुस्त नसलेल्या कोणाच्याही नुकसानीची शक्यता कमी असते, असे तज्ज्ञ सांगतात. १२-३-३० व्यायाम हा त्यांच्या वजनावर नियंत्रण ठेवू इच्छिणाऱ्या किंवा त्यांचे हृदय मजबूत करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक इष्ट पर्याय आहे. हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी खूप चांगले असल्याचे ते सांगतात.

डाॅक्टर सांगतात, हा व्यायाम करताना काळजी घ्यायला हवी. कोणतेही व्यायाम करण्यापूर्वी तज्ज्ञांचा नक्की सल्ला घ्या, असेही डाॅक्टर सांगतात, खरंतर वजन कमी करण्यासाठी हे पुरेसे नसून आपल्या दिनचर्येकडेही लक्ष देण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिलायं. झोप आणि आहार याकडे लक्ष द्यायला पाहिजे ते सांगतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which is the most effective exercise for weight loss heres how 12 3 30 workout helps you burn fat pdb
Show comments