पल्लवी सावंत-पटवर्धन

“या दिवाळीत मी शक्य तितका हेल्दी फराळ करणार आहे” सारिका अत्यंत लहान आवाजात बोलत होती. मी चिवड्यासाठी ऑलिव्ह ऑइल वापरणार आहे. त्याचा स्मोकिंग पॉईंट कमी असतो ना? त्याच निमिताने इसेन्शिअल फॅट्स पोटात जातील आणि शंकरपाळे तुपात टाळणार आहे. चकलीसाठी करडई वापरणार आहे. का अवोकाडो ऑइल वापरू? मला असा फराळ बनवायचा आहे जेणेकरून प्रत्येकजण फक्त आणि फक्त हेल्दी फराळ करू शकेल. नो कोलेस्ट्रॉल, नो फॅट्स. एखादा पदार्थ खाऊन किती फॅट्स वाढतायत याचाही स्ट्रेस नको. खाणाऱ्याला पण आणि करणाऱ्याला पण. “मी त्या दुकानातून फराळ खरेदी करणार होते पण मलाच खात्री नाहीये खरंखुरं ऑलिव्ह ऑइल वापरलं असेल का? नकोच ते. मीच करणार आहे सगळं”.

attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
artificial intelligence to develop ability to create substances with specific qualities
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतून हव्या त्या गुणधर्मांचा पदार्थ

दिवाळी दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि त्यानिमित्ताने दिवाळीच्या फराळांसाठी घराघरांमध्ये लगबग चालू आहे. तळणासाठी वापरले जाणारे तेल आणि त्यानिमित्ताने आरोग्यावर होणारे परिणाम याची जनमानसात जाणीव असणं ही आहारतज्ज्ञ म्हणून सुखावणारी बाब आहे. त्याबरोबर चांगलं तेल म्हणून अवाजवी दरातील तेल वापरणं ही तितकीच खटकणारी बाब.

आणखी वाचा-Health Special: पोषक सुपांची गोष्ट

दिवाळीची चाहूल आणि हिवाळा या दोन्ही गोष्टीचा विचार करताना शरीराला माफक प्रमाण मुबलक ऊर्जा आणि उत्तम जीवनसत्त्वे मिळावी हे खरंतर फराळाचं प्रयोजन ! त्याची चव, पोत , चटपटीत हे निकष देखील आलेच. वेगवेगळ्या डाळी , वाळवलेले पातळ पोहे , सुकामेवा , डाळींची पीठे यापासून दिवाळीतील तयार केले जातात.

यात सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे तळणे! फराळासाठी वापरले जाणारे तेल आणि “अरे बापरे तेल म्हणजे वाईट “ असं खरंच आहे का हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे

१. तेलाचे प्रमाण- फराळासाठी वापरले जाणारे तेल हे एका ठराविक प्रमाणात वापरा. एका वेळी भरपूर तेल गरम करणे टाळा . ठराविक प्रमाणात पदार्थ तयार करा आणि त्यातही योग्य आकाराचे भांडे वापरा (शक्यतो माध्यम आकाराची कढई किंवा पातेलं वापरा )
२. योग्य तेलाची निवड- तळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाचा उष्मांक जास्त असायला पाहिजे. म्हणजेच खोबरेल तेल, सूर्यफुलांच्या बियांचं तेल , करडईचं तेल , तूप यासारखे पदार्थ तळण्यासाठी वापरू शकता.
३. तेलाचे तापमान- तेल गरम करताना योग्य अंदाज घ्या. तेल काळे होईपर्यंत किंवा त्यातून धूर येईपर्यंत किंवा त्याला उग्र वास येईपर्यंत गरम करू नका.
४. वापरलेले तेल आणि त्याचा साठा- वापरलेले तेल साधारण तापमानापर्यंत थंड होऊ द्या . त्यानंतर एखाद्या मऊ कापडाचा वापर करून हे तेल गाळून ठेवा. तुम्ही दिवे लावण्यासाठी किंवा घरात उपकरणांसाठी वंगण म्हणून हे तेल वापरू शकता. एकदा वापरलेले तेल पुन्हा कोणतीही प्रक्रिया करण्यासाठी वापराने टाळा. म्हणजेच त्या तेलात पदार्थ शिजवणे, तळणे कटाक्षाने टाळा. वापरलेले तेल कधीही बेसिन मध्ये किंवा उघड्यावर ओतू नका. यामुळे हवेतील आणि पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण वाढते .

आणखी वाचा-Health Special: बहुगुणी सफरचंद

आपण एकदा तेल तापवले की त्यामध्ये असणारे असे स्निग्धांश असतात त्याचे प्रमाण बदलते. त्यातील ट्रान्स फॅट्स आणि ग्लिसेराईड्सच्या बदललेल्या प्रमाणामुळे हे तेल हृदयवाहिन्यांसाठी अत्यंत धोकादायक असते. पुन्हा पुन्हा तेच तेल टाळण्यासाठी वापरले गेल्यास शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते आणि फराळासाठी खाल्ले जाणारे चटपटीत पदार्थ हृदयाचे आरोग्य बिघडविण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

फराळासाठी वापरली जाणारी भांडी

शक्यतो दिवाळीतील फराळ हा लोखंडी कढईमध्ये तळण्याचा प्रयत्न करा. याचे तीन फायदे आहेत. लोखंडाचा उष्मांक खूप चांगला असतो, त्यामुळे गरम झालेले तेल त्यामध्ये अधिक काळ गरम राहू शकते त्यामुळे तुमचा गॅसही वाचू शकतो आणि श्रमही वाचू शकतात. शिवाय काही प्रमाणात का होईना त्या कढईतील लोखंडाचे थोडेसे तरी प्रमाण तुमच्या फराळामध्ये येऊ शकते.

आणखी वाचा-Health Special: उपासाचं व्यवस्थापन

पारंपारिक पद्धतीनुसार पितळेच्या भांड्यात , स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात किंवा लोखंडाच्या भांड्यात तळले गेलेल्या फराळाची चव आणि पोत या दोन्ही गोष्टी अत्यंत उत्तम असतात त्यामुळे चविष्ट फराळ बनवण्यासाठी या दिवाळीत आवर्जून लोखंडाचे किंवा पितळ्याची भांडी वापरा.

आहारासाठी केली जाणारी गुंतवणूक ही संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी केली जाणारी गुंतवणूक असते. या दिवाळीत स्वयंपाकघरातील महत्वाच्या गुंतवणुकीकडे कटाक्षाने लक्ष देऊया. प्लास्टिक, अॅल्युमिनिअम यासारख्या हलक्या दर्जाची भांडी वगळून पारंपरिक पद्धतीनं पदार्थ तयार करुयात आणि स्वास्थ्याचे नवे पायंडे पाडूयात.