Difference Between White Salt and Rock Salt: अधिक मीठ खाल्ल्याने शरीराला होणारे नुकसान आपण सगळेच जाणून आहोत. अलीकडेच एका निरीक्षणानंतर जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत जगभरात मिठाच्या अधिक सेवनाने तब्बल ७० लाख मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली होती. अनेकदा नियमित वापरल्या जाणाऱ्या मिठासह आपल्या घरात सैंधव मिठाची सुद्धा बरणी असतेच, भलेही तिचा आकार लहान असेल. उन्हाळ्याच्या दिवसात विशेषतः ताकामध्ये किंवा रविवारच्या दिवशी मच्छीला मॅरीनेट करायला सैंधव मीठ आवर्जून वापरले जाते. पण तुम्हाला माहित आहे का आपण वापरतो ते पांढरे मीठ व खड्याचे सैंधव मीठ यात नेमका फरक काय? यातील कोणत्या मिठाच्या किती सेवनाने तुमच्या शरीराला फायदा होऊ शकतो? चला तर जाणून घेऊया…
एका दिवसात किती मीठ खायला हवे? (How Much Salt To Eat In a Day)
जागतिक सरासरीनुसार साधारण व्यक्ती दिवसभरात १०. ८ ग्रॅम मीठाचे सेवनकरते . तर जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार आपण दिवसभरात ५ ग्रॅमहुन अधिक मीठ खाणे धोकादायक ठरू शकते. ५ ग्रॅम मीठ म्हणजे एका छोट्या (टीस्पून) एवढे मीठ. जास्त मीठ खाल्ल्यास आरोग्याचे नुकसान होऊ शकते.
पांढरे मीठ व सैंधव मीठ यातील फरक…
सैंधव मीठ व पांढऱ्या मिठाच्या चवीत फारसा फरक नसतो. मात्र जे लोक आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेतात ते रॉक सॉल्ट म्हणजेच सैंधव मीठ वापरण्याला प्राधान्य देतात. या दोन्ही मिठाचा रंग वेगळा असतो सैंधव मीठ हे गुलाबी तर साधे मीठ हे पांढऱ्या रंगाचे असते.
सैंधव मीठ का उत्तम ठरते? (Why Is Rock Salt Better)
सैंधव मीठ हे मुख्यतः समुद्र किंवा खाऱ्या पाण्याच्या ओढ्याने बनवले जाते. यातून सोडियम क्लोराईडहे रंगीत क्रिस्टल रुपी खडे बनतात. या मीठाला बनवताना फार प्रक्रिया केली जात नाही व नैसर्गिक स्वरूपातच सेवन केले जाते.
पांढऱ्या मिठाने शरीरावर काय परिणाम होतो?
तर पांढरे मीठ तयार करण्यासाठी रिफाईंड पद्धतीचा वापर केला जातो. यात ९५ टक्के अधिक सोडियम असते तसेच यात विसरून आयोडीन सुद्धा मिसळले जाते. याच कारणाने पांढरे नियमित मीठ हे आरोग्यास हानिकारक मानले जाते. पांढऱ्या मीठाचे सेवन अधिक केल्यास यातून उच्च रक्तदाब, हेउदयविकार असे आजार होण्याची शक्यता असते. यामुळे या मीठाचे सेवन कमी प्रमाणात करायला हवे.