Obesity, Diabetes And Cancer: WHO ने शरीराचे वजन नियंत्रित करण्यासाठी किंवा असंसर्गजन्य आजारांचा धोका कमी करण्यासाठी तुमच्या चहाच्या तसेच गोडाच्या पदार्थांच्या रेसिपीमध्ये एक अत्यंत आवश्यक बदल सुचवल्याचे समजतेय. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेने असे सुचवले आहे की अशा पदार्थांच्या वापरामुळे खरं तर शरीरातील चरबीचा धोका वाढू शकतो. टाइप-2 मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग इतकेच नाही तर प्रौढांमध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढू शकते. अनेकदा साखरेचे दुष्परिणाम टाळण्यासाठी नॉन-शुगर स्वीटनर (NSS)चा वापर केला जातो पण याच पर्यायाचा आपल्या शरीरावर अत्यंत भीषण परिणाम होऊ शकतो.

आहारात ‘हा’ पदार्थ नक्की टाळावा (What To Avoid In Diet)

नॉन-शुगर स्वीटनर (NSS) च्या वापरामुळे शरीरातील चरबीमध्ये दीर्घकालीन घट होत नाही. NSS मध्ये acesulfame K, aspartame, advantame, cyclamates, neotame, saccharin, sucralose, stevia आणि stevia derivatives यांचा समावेश असतो जे शरीरासाठी घातक ठरू शकतात. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे, कृत्रिम स्वीटनरचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच नवीन मार्गदर्शक तत्त्वे “आहाराची गुणवत्ता सुधारणे आणि असंसर्गजन्य आजारांचा धोका कमी करणे” या हेतूने तयार केलेली आहेत असेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले.

triphala in excess is beneficial or harmful for health
जास्त प्रमाणात त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Health Special What happens to the body if you consume more than 30 grams of protein for breakfast?
Health Special: नाश्त्यात ३० ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिने घेतल्यावर शरीरावर काय परिणाम होतो; पोषणतज्ज्ञांनी सांगितलं योग्य प्रमाण
Trigrahi Yog 2024
Trigrahi Yog 2024 : ५० वर्षानंतर कन्या राशीमध्ये बनतोय त्रिग्रही योग, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
Lancet study finds iron calcium and folate deficiency among Indians
भारतीयांमध्ये आहे लोह, कॅल्शियम व फोलेटची कमतरता; लॅन्सेट अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष, जाणून घ्या, तुम्ही कोणते पदार्थ खावेत?
10 food items that should not be refrigerated and should never be kept in the fridge
फ्रिजमध्ये हे १० पदार्थ चुकूनही ठेवू नका! आरोग्यावर होऊ शकतो परिणाम
Oropouche virus marathi news
विश्लेषण: जगासमोर गूढ ओरोपूश विषाणूचे संकट? काय आहे हा आजार?
effective treatment on psoriasis with side effects advice from dermatologist
सोरायसिसवर आता प्रभावी उपचार अन् दुष्परिणामही कमी! त्वचाविकारतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…

नॉन शुगर स्वीटनर कोणी व का टाळावी? (Who & Why Should Avoid Non- Sugar Sweetener)

जागतिक आरोग्य संघटनेचे, पोषण आणि अन्न सुरक्षा संचालक फ्रान्सिस्को ब्रँका सांगतात की, “नॉन-शुगर स्वीटनर हे आहारातील आवश्यक घटक नाहीत आणि त्यांना कोणतेही पौष्टिक मूल्य नाही. लोकांनी त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सुरुवातीपासूनच आहारातील गोडवा नियंत्रणात ठेवला पाहिजे,” ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे आधीपासूनच मधुमेह असलेल्या व्यक्तींशिवाय इतरांनाही लागू होतात. या नॉन-शुगर स्वीटनरमध्ये पूर्व-पॅकेज केलेले पदार्थ आणि पेयांमध्ये साखरेला पर्याय म्हणून वापरल्या जाणार्‍या सर्व सिंथेटिक स्वीटनर्सचा समावेश आहे.

नॉन शुगर स्वीटनरला पर्याय काय? (Options For Non- Sugar Sweetener)

प्राप्त माहितीनुसार, साखर वगळून हे पर्याय स्वीकारले तरी त्याचा दीर्घकालीन वजन नियंत्रणात मदत होत नाही. लोकांना साखरेचे सेवन कमी करण्यासाठी इतर मार्गांचा विचार करणे आवश्यक आहे. जसे की नैसर्गिक पदार्थांमधून मिळणारी साखरेचे सेवन करणे, जसे की फळे किंवा गोड न केलेले अन्न आणि पेये, हे पर्यायही आपण स्वीकारू शकता.

हे ही वाचा<< लघवीचा रंग व वास देतो आजारांचे संकेत? कसे ओळखाल स्वतःचे शरीर, ‘ही’ लक्षणे नक्की लक्षात ठेवा

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, नॉन-शुगर स्वीटनर पदार्थांचे जास्त सेवन लठ्ठपणाशी जोडले गेले आहे. जगभरातील प्रौढ लोकसंख्येच्या 40% आणि लाखो लहान मुलांवर याचा परिणाम होऊ शकत. असं असलं तरी, टूथपेस्ट, स्किन क्रीम आणि औषधे किंवा कमी-कॅलरी/ साखर असणाराने अल्कोहोल (पॉलिओल) या उत्पादनांना ही शिफारस लागू होत नाही, असे WHO ने म्हटले आहे.

(वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. याचा अवलंब करण्याआधी वैद्यकीय सल्ला आवश्य घ्या)