साधारणपणे आपण आपल्या व्यायामात कार्डियो (हृदयाची क्षमता वाढवणारे व्यायाम), स्ट्रेन्थ ट्रेनिंग (स्नायूंची शक्ती वाढवणारे व्यायाम ) आणि फ्लेक्सिबिलिटी (शरीराची लवचिकता वाढवणारे व्यायाम ) यांचा समावेश करतो. पण व्यायामाच्या रुटीनमध्ये अजून एक व्यायाम प्रकार समाविष्ट करायलाच हवा तो म्हणजे अजिलिटी-चपळता वाढवणारे व्यायाम!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तुमच्या वयानुसार, शारीरिक परिस्थितीनुसार, गरजेनुसार हे व्यायाम तुमच्या रुटीन मध्ये समाविष्ट करू शकता, अर्थातच हे करताना फिजिओथेरपिस्ट च सल्ला, मार्गदर्शन आणि मदत तिन्ही गरजेचं आहे!
हेही वाचा : मिठाचे ‘हे’ पर्याय उच्च रक्तदाब ४० टक्क्यांनी करतील कमी? जाणून घ्या कोणी सेवन करावे, कोणी नाही?
अजिलिटी व्यायामामुळे काय होतं?
या व्यायामांमुळे हालचालीचा वेग सुधारतो शिवाय हालचाल करताना पटकन दिशा बदलण्याची क्षमता वाढते, पायर्या चढताना उतरताना कुणी मध्ये आलं तर तुम्ही न थांबता बाजूने जाता, रस्त्याने चालताना कुणी एकदम मध्ये आलं तर तुम्हाला पटकन थांबता येतं किंवा बाजूने चालत जाता येतं, झटकन वळता येतं आता हे ऐकल्यावर असा वाटेल की हे तर आम्हाला आत्ता सुद्धा करता येतं त्यासाठी व्यायामाची काय गरज? पण असं पटकन थांबता येणं, दिशा बदलणं यासाठी तुमच्या स्नायू आणि शरीरावर येणारा ताण हा समान प्रमाणात विभागला जाणं आवश्यक असतं. लहान वयात शरीर हे स्वतहून करत असतं पण जसजसं वय वाढतं तसं ही क्षमता कमी होत जाते मग पटकन थांबायला किंवा दिशा बदलायला , वळायला जमतं पण नंतर स्नायू आणि लिगामेंट्स दुखवतात. हे टाळण्यासाठी अजिलिटी व्यायामाची गरज असते.
सुसूत्रता वाढणं आणि तोल सांभाळणं
या व्यायाम प्रकारांमुळे स्नायूंमधील सगळे फायबर्स एकत्रितपणे आणि अचूक काम करतात त्यामुळे कुठलीही हालचाल अधिक प्रभावी होते आणि स्थिरता वाढते. दिशा बदलण्याच्या व्यायामांमुळे मेंदूच तोल सांभाळणारा भाग उत्तेजित होतो त्यामुळे पडण्याची भीती आणि शक्यता दोन्ही कमी होते.
हेही वाचा : Health Special: टीबीच्या रुग्णांसाठी AI कसं उपयोगी ठरु शकतं?
शरीर आणि मनाचं संतुलन
वेगवेगळ्या वातावरणात शरीराच्या विविध हालचाली नियंत्रित करणे, तोल सांभाळणे यात शारीरिक घटक तर कार्यान्वित होतातच पण त्यासोबत संज्ञानात्मक कार्ये देखील समाविष्ट होतात, ज्यामध्ये व्हिज्युअल प्रोसेसिंग, वेळ, समज आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता यांचा समावेश होतो ज्यामुळे शरीर आणि मन यांचं संतुलन राखण्यास मदत होते.
हे व्यायाम फक्त खेळांडूपूरते मर्यादित नसून कुठल्याही वयाच्या व्यक्तींमध्ये समाविष्ट करता येतात. अजिलिटी व्यायाम सुरू करताना या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.
-हे व्यायाम स्वतःच्या मनाने करू नका
-हे व्यायाम फिजिओथेरपिस्ट किंवा स्ट्रेन्थ आणि अजिलिटी तज्ञ यांच्याकडून शिकून घ्या
-या व्यायामांना सुरुवात करण्यापूर्वी स्नायूंची शक्ती वाढवणारे व्यायाम करा
-आवश्यक स्ट्रेचिंग करा
हेही वाचा : Health Special: कुंकू किंवा बिंदीची ॲलर्जी आल्यास काय कराल?
-एका जागी उभ राहून तोल सांभाळणारे व्यायाम करा
-पुरेशा प्रमाणात हृदयची क्षमता वाढवणारे व्यायाम करा
-हालचालीच्या वेगावर लक्ष केन्द्रित करू नका, मध्यम गतीने सुरुवात करून हळू हळू वेग वाढवा
-हे व्यायाम करताना पायाला पूर्ण आणि भक्कम आधार देणारे स्पोर्ट शूज वापरा!