हिवाळ्यामध्ये हवेच्या तापमानामध्ये जे बदल होतात, त्यांच्या परिणामी गरम हवेचा एक थर थंड हवेच्या थरावर तयार होतो, जो एखाद्या आवरणासारखा काम करुन हवेमधील प्रदूषित घटकांना पृष्ठभागावरच दाबून ठेवतो. असा गरम हवेचा थर का तयार होतो याचे पहिले कारण म्हणजे, हिवाळ्यातल्या रात्री तापमान खूप खाली उतरते. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान सुद्धा घटते. पृष्ठभागाच्या निकट असलेली हवा अधिक थंड होते. या थंड हवेच्या थरांमध्येच गरम हवेचा थर जमतो किंवा अडकतो.

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे थंड हवा ही मुळातच तुलनेने अधिक घन आणि साहजिकच अधिक जड असते. या हवेचा मोठा असलेला आकार आपल्या वजनामुळे खाली घसरतो आणि पृथ्वीच्या थंड पृष्ठभागाजवळ गेल्यावर अधिकच थंड होतो. त्या थंड हवेच्या थरांमध्ये गरम हवेचा थर अडकतो. विशेषतः डोंगरांच्या मध्ये वसलेल्या शहर- गावांमध्ये असे होते. हवेचा मोठा आकार डोंगरांवरुन चक्क खाली घरंगळतो आणि डोंगरांच्यामध्ये अडकून पृष्ठभागावर जाऊन विसावतो.

Mumbai citizens suffer from cold and cough due to polluted air
प्रदुषित हवेमुळे मुंबईकर सर्दी, खोकल्याने त्रस्त
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
two dead in tanker accident
जळगाव जिल्ह्यात टँकरच्या धडकेने दोन जणांचा मृत्यू
Mumbais air quality is currently in poor to very poor category
मुंबईची हवा खालावलेलीच, गारठा व प्रदूषकांमुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले
Why does winter make you more vulnerable to colds
हिवाळ्यामुळे तुम्हाला सर्दी होण्याची अधिक शक्यता का असते? तज्ज्ञांनी केला खुलासा….
Can lemon ginger water really cleanse the liver Here’s how it works on your body
आले-लिंबाचे पाणी खरंच यकृताच्या आरोग्यासाठी योग्य आहे का? शरीरावर कसा होतो परिणाम?
Idiopathic Pulmonary Fibrosis (IPF), lung disease, Zakir Hussain
विश्लेषण : झाकिर हुसेन यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला ‘इडिओपॅथिक पल्मनरी फायब्रॉसिस’ विकार काय आहे? त्यावर अजून ठोस उपाय का नाही?
How to take care of your pets in the air pollution
दिवसेंदिवस वाढणाऱ्या वायू प्रदूषणात तुमच्या पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्याल? तज्ज्ञांचे मत वाचा…

हेही वाचा : Health Special: मानसिक आघाताची लक्षणे कोणती? तो कसा ओळखावा?

तिसरं कारण म्हणजे एकमेकांच्या निकट असलेले शीत व उष्ण प्रदेश. अशा ठिकाणी थंड व गरम हवा परस्पर संपर्कात आल्यावर घन व जड असलेली थंड हवा हलक्या असलेल्या गरम हवेला वर ढकलते आणि पुढील प्रक्रिया वरीलप्रमाणेच घडते. यामध्ये गरम हवेचा थर खालच्या थंड हवेला बाहेर निसटू देत नाही आणि त्या पृष्ठभागाजवळील थंड हवेमध्ये तिथे जमलेले वाहने, कारखाने, घरगुती उपकरणे वगैरेंमधून होणार्‍या घातक वायू- उत्सर्जनामधील विविध विषारी घटक तसेच दबून राहतात. एखादा मोठ्या आकाराच्या अदृश्य तंबूमध्ये हवा अडकली तर त्यामधील विषारी घटक तिथेच जमून राहतील तसेच इथे सुद्धा होते आणि हवा अधिक प्रदूषित होते. अर्थातच हे अधिक लोकसंख्येच्या, अधिक वाहने असलेल्या शहरांमध्ये आधिक्याने अनुभवास येते. अशा शहरांमधील लोकांनी हिवाळ्यात पहाटे- पहाटे फिरायला जाणे आरोग्यास उपकारक तर होणार नाहीच, उलट बाधक होऊ शकेल.

हेही वाचा : कानाच्या पाळीवरील ‘ही’ खूण असते हृदय व रक्तवाहिन्यांच्या विकाराचं चिन्ह? हृदयरोग तज्ज्ञांनी दिली स्पष्ट माहिती

बरं, हा मुद्दा केवळ अधिक लोकसंख्येच्या शहरांनाच लागू होतो असंही समजू नये. लहान आकाराच्या गावांमध्ये सुद्धा हिवाळ्यात हवा अधिक प्रदूषित होते, ज्याचे कारण वेगळे असते. उत्तर महाराष्ट्र, उत्तर भारत व हिमालयानजीकचे प्रदेश जिथे हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडते अशा प्रदेशांमध्ये थंडीचे निराकरण करण्यासाठी घरांमध्ये, शेतावर किंवा जिथे लोक एकत्र येतात अशा सर्व जागी शेकोटी केली जाते. पाणी तापवण्यासाठी ज्या बंबाचा उपयोग केला जातो त्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी चुलीचा उपयोग होत असल्यास त्यासाठी सुद्धा लाकूडफाटा खूप मोठ्या प्रमाणात जाळला जातो.

हेही वाचा : Health Special: व्हिटामिन्समधून शरीराला ऊर्जा मिळते; समज की, गैरसमज?

लाकूडफाट्याबरोबरच सुके गवत, पालापाचोळा, लाकडाचा भुसा, जुने फर्निचर, टायर वगैरे वेगवेगळे पदार्थ जाळले जातात, जे हवा प्रदूषित करतात. या सर्व पदार्थांच्या ज्वलनामधून तयार होणारे पार्टिक्युलेट मॅटर (particulate matter) हे घटक अतिशय सूक्ष्म असतात आणि हवेमधून आपल्या फुप्फुसांमध्ये शिरुन शरीरावर घातक परिणाम करतात. हिवाळ्यात हवा प्रदूषित होण्याची ही महत्त्वाची कारणे आहेत. दुर्दैवाने हिवाळ्यात विविध पदार्थांच्या ज्वलनामुळे होणारे हवेचे प्रदूषण आपल्या देशामध्ये आधिक्याने होते.

Story img Loader