केरळमधल्या कन्नूर जिल्ह्यातील केणिच्चिरा या गावातील घटना. मोबाईलचे व्यसन लागलेल्या मुलाला मोबाईलच्या अतिवापराबद्दल आईने टोकले असता मुलाने आईवरच प्राणघातक हल्ला केला. घरातल्या भिंतीवर तिचे डोके जोराने आपटले. हा हल्ला इतका जबरदस्त होता की त्यात आई मृत्युमुखी पडली. आईवर आठवडाभर रुग्णालयात उपचार झाले पण झालेल्या जबर दुखापतीतून ती वाचू शकली नाही.

ही क्वचित घडणारी घटना वाटू शकते, अपवादात्मक. पण खरंतर शारीरिक हल्ला नसला तरी मोबाईलवरुन शाब्दिक हल्ले आणि थोडेबहुत प्रमाणात आई वडिलांशी मारामारी हे प्रकार आजूबाजूला घडू लागले आहेत. वाढताना दिसतायेत. इथे शारीरिक मारामारी दोन्ही बाजूने सुरु आहे. मोबाईल वापरू नकोस म्हणून मुलांना चारवेळा सांगितलं आणि तरीही मुलांनी ऐकलं नाही तर पालक त्यांच्यावर सर्रास हात उगारतात, पॉर्न क्लिप्स बघताना दिसले की मारहाण करण्याचं प्रमाण आहेच. आता उलट वारही व्हायला सुरुवात झालेली आहे. आईबाबांनी मोबाईल बाजूला ठेव असं नुसतं म्हटलं तरी मुलं कावतात, चिडतात, धुसफूस करायला लागतात. संतापतात. हे अगदी घरोघरी बघायला मिळतंय. याचंच पुढचं पाऊल म्हणजे मारहाण. प्रत्येक घरात मारहाण होत नसली यावरुन तरी पालक आणि मुलं यांच्यातल्या विसंवादाचं; खरंतर भांडणाचं कारण मोबाईल होऊ बघतो आहे आणि हे अतिशय गंभीर आहे.

good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
swargate police file case against three for gang rape of woman by threatening to kill children
मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामुहिक बलात्कार; स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला

हेही वाचा… Money Mantra: प्रश्न तुमचे उत्तरं तज्ज्ञांची: क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डात काय फरक असतो?

यात पालक चुकतात की मुलं चुकतात असा विचार करण्यापेक्षा पालक आणि मुलं यांचं मिळून जे कुटुंब बनलेलं आहे त्यात प्रचंड विसंवाद आहेत. विसंवादाचे मुद्दे अनेक आहेत, अगदी खाण्यापिण्याच्या सवयींपासून, कपडे कसे घालायचे, डेटिंग करायचं का, कधी करायचं, काय बघायचं, काय ऐकायचं, लैंगिक अग्रक्रम.. अगणित मुद्दे आहेत. ज्यामध्ये पालक आणि मुलं यांचा ‘कॉमन ग्राऊंड’ नाहीये. म्हणजे पालक आणि मुलं यांच्यात समान गोष्टी फार कमी उरलेल्या आहेत. या आधीच्या पिढयांमध्ये घरात सगळ्यांच्यात मिळून एकच टीव्ही किंवा रेडिओ होता. त्यामुळे एकमेकांच्या सीरिअल्स आवडो न आवडो माणसं एकत्र बसून बघत होती. सिनेमे, नाटकं, पुस्तकं, गाणी या सगळ्या मध्ये पालक आणि मुलं यांच्या जगात प्रचंड मोठी दरी नव्हती. एकमेकांच्या जगात काय सुरु आहे याचा पत्ताच नाही अशी परिस्थिती नव्हती. पण मोबाईल आणि त्यात इंटरनेट आल्यावर एक प्रकारचं एकलकोंडेपण ही माध्यमं घेऊन आली आहेत. मनोरंजनापासून रेसिपीपर्यंत आणि डेटिंगपासून अध्यात्मापर्यंत सगळ्या गोष्टी ज्याच्या त्याच्या मोबाईलच्या ब्लॅक स्क्रीनमध्ये घडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे घरात चार काय सहा (आजीआजोबा) माणसं असतील तरीही त्यांच्यात समान धागा अनेकदा नसतो. तो असायला पाहिजे, त्यासाठी विशेष मेहनत घेतली पाहिजे हा कसलाच विचार नाहीये. मुलं केपॉप ऐकतात, गेमिंग करतात म्हणून आरडा ओरडा करणाऱ्या पालकांनी कधी केपॉप गाणी ऐकून बघण्याचा प्रयत्न केलाय का? ती आपल्याला आवडायला पाहिजेत असं मुळीच नाहीयेत पण तुझ्या जगाची मला ओळख करुन दे हा संदेश त्यातून आपोआप मुलांपर्यंत पोहोचतो आणि मग तेही पालकांच्या जगात डोकावायला तयार होतात. ‘कॉमन ग्राऊंड’ समान जमीन अशीच तयार होत असते.

हेही वाचा… Money Mantra: जागतिक अनिश्चितता; बाजारांचा नरमाईचा पवित्रा

पण पालकही मुलांइतकेच मोबाईलमध्ये अडकलेले आहेत. त्यांनाही त्यांच्या व्हॉट्सअप गप्पा सोडवत नाहीत, त्यांच्या सीरिअल्सचे एपिसोड बाजूला ठेवून पोरं काय म्हणू बघता आहेत हे ऐकायला फुरसत सापडत नाही. शिवाय सतत हातात फोन हवा ही सवयही पालकांकडूनच बऱ्याचदा मुलांपर्यंत पोहोचलेली असते. लहानपणी जेवावं म्हणून डोळ्यासमोर ठेवलेला मोबाईल कधी त्या मुलांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनतो ते ना पालकांच्या लक्षात येतं ना मुलांच्या. गोष्टी हाताबाहेर जायला लागल्या की अनेकदा पालक जागे होतात पण तोवर फार उशीर झालेला असतो. अनेकदा मुलं मोबाईलच्या अवलंबत्वाकडून व्यसनाकडे वळलेली असतात. कुठलंही व्यसन करणाऱ्या माणसाला तू व्यसन करु नकोस म्हटलं की तो आक्रमक होतो. त्यांच्या व्यसनाच्या गोष्टी काढून घेतल्या की चिडतो, अंगावर धावून यायलाही मागे पुढे पाहत नाही, कारण तेव्हा मेंदू फक्त व्यसनाचा विचार करत असतो. तेच मुलांच्याही बाबतीत होतं. त्यांना त्यांचं जग मोबाईल वाटायला लागतं. मोबाईल नसेल तर आपलं आयुष्यच अडकून पडेल अशी काहीतरी त्यांची धारणा होऊन बसते आणि मग त्या मोबाईलबद्दल कुणीही काहीही म्हटलं की मुलं चिडतात, रागावतात.

यावर हे ६ उपाय कायम लक्षात ठेवा

  • पालकांनी न चिडता, न रागावता, मुलांच्या अंगावर हात न उगारता त्यांच्याशी शांतपणे मोबाईलच्या अतिवापरातून निर्माण होणाऱ्या धोक्यांविषयी बोललं पाहिजे.
  • गरज वाटली तर समुपदेशकांची मदत घेतली पाहिजे.
  • आपल्याकडे टीनएजर नैराश्याची समस्या मोठी आहे. अनेकदा कारण मोबाईल होतं पण मूळ भलतंच असतं. आपलं मुलं नैराश्याशी झुंजत नाहीयेत ना हे बघितलं पाहिजे.
  • लहानपणापासून मोबाईलची सवय टाळली पाहिजे. जेवताना मोबाईल दाखवत जेवण भरवणं ही अत्यंत चुकीची सवय आहे, ती टाळली पाहिजे.
  • पालक आणि मुलांमध्ये समान विषय अधिकाधिक कसे तयार होतील याकडे पालकांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे.
  • स्वतःचा मोबाईलचा वापर सीमित केला पाहिजे. मुलं पालकांचं बघून अनेक सवयी उचलतात. त्यामुळे स्वतः दिवसरात्र मोबाईलमध्ये अडकलेले पण मुलांच्या वापरावर रेशनिंग असं उपयोगाचं नाही.