Joint Pain: पावसाळ्याच्या दिवसांत अनेक व्यक्तींना सांधेदुखीच्या समस्या जाणवतात. आयुर्वेद चिकित्सक डॉ. मनीषा मिश्रा यांनी सांगितले की, हे दुखणं आणि वेदना शरीरातील वात किंवा हवेच्या प्रमाणात असमतोल झाल्यामुळे होते; पण यात काळजी करण्यासारखे काही नाही. कारण- त्यासाठी दोन उपाय आहेत; जे या दुखण्यावर मदत करू शकतात. त्यातील एक उपाय म्हणजे कोरड्या आल्याच्या पावडरचा चहा. हे वात कमी करण्यास मदत करणारे एक पेय आहे. त्यासाठी “कोरड्या आल्याची पावडर पाण्यात उकळून घ्या आणि ते पेय दिवसातून दोनदा सकाळ आणि संध्याकाळी प्या.”

डॉ. मिश्रा यांनी सांगितलेला दुसरा उपाय म्हणजे शरीराच्या ज्या भागात दुखत असेल, त्या भागावर एरंडेल तेल लावावे. त्यामुळे सांधेदुखी बरी होते आणि तुम्हाला व्यवस्थित चालता येईल.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास

पावसाळ्यात वेदना कशामुळे होतात?

पावसाळ्यात हवामानात गारवा असतो. “आयुर्वेदात विसर्ग काल म्हणून ओळखला जाणारा हा काळ, जेव्हा पृथ्वी सूर्यापासून दूर जाते आणि चंद्राचा प्रभाव वाढतो आणि ज्यामुळे वातावरण थंड होते. पावसाळ्याचा ऋतू वात आणि कफ दोषांशी संबंधित आहे; जो या काळात वाढतो. पाणी आणि पृथ्वीच्या घटकांचे प्रतिनिधित्व करणारा कफ दोषदेखील या काळात वाढतो”, असे शास्त्रीय हठ योग शिक्षक व जीवनशैली तज्ज्ञ श्लोका यांनी सांगितले.

थंड, ओलसर आणि बदलत्या हवामानामुळे वात दोष वाढून शरीरात अस्थिरता येते. “या असंतुलनामुळे सांध्यातील ओलावा कमी होतो आणि त्यामुळे घर्षण, जळजळ, सांधेदुखी, स्नायू दुखणे आणि कडकपणा येतो,” असे श्लोका यांनी सांगितले.

पावसाळ्यातील जड, ओले वातावरण कफ दोष वाढवते. “अतिरिक्त कफामुळे सांध्यामध्ये तरल पदार्थ साचतो. त्यामुळे जळजळ व सूज येते आणि संधिवात, आर्थायटिस आणि टेंडिनायटिस यांसारख्या समस्या उदभवतात.

तज्ञांनी सांगितले, “थंड, ओलसर हवामानामुळे पाचन अग्नी अधिक कमकुवत होतो. त्यामुळे पचन नीट होत नाही आणि त्यामुळे विषारी पदार्थ शरीरात जमा होतात. पचन बिघडल्यामुळे शरीरात जमा होणारा आमयुक्त विषारी पदार्थ शरीराच्या विविध भागांमध्ये जळजळ आणि वेदनांना कारणीभूत ठरतो.

हे उपाय फायदेशीर ठरतील का?

डॉ. मिश्रा यांनी सुचविलेल्या उपायांना सहमती देत श्लोका यांनी सांगितले की, प्रभावित जागेवर एरंडेल तेलाचे पॅक (कोमट एरंडेल तेलात भिजवलेले स्वच्छ कापड) लावल्याने मदत होऊ शकते. सूज कमी करण्यासाठी आणि रक्ताभिसरण वाढविण्यासाठी ३०-४५ मिनिटे दिवसातून १-२ वेळा असे लावून ठेवावे.”

आयुर्वेदिक उपाय

मोहरीच्या तेलाने मालिश

मोहरीचे तेल थोडे कोमट करा आणि प्रभावित स्नायू किंवा सांध्यांमध्ये हलक्या हाताने मसाज करा. सांधेदुखी कमी करण्यासाठी निलगिरी किंवा पेपरमिंट यांसारख्या तेलांचे काही थेंब घाला. हा मसाज रोज झोपायच्या आधी करा.

मेथीच्या दाण्यांचा वापर

मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून, त्याची पेस्ट बनवा. पेस्ट प्रभावित भागात लावा आणि स्वच्छ कापडाने झाकून ठेवा. हे ३०-६० मिनिटे राहू द्या. नंतर स्वच्छ धुऊन घ्या. ही पेस्ट सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते.

हेही वाचा: बाळाचा रंग उजळण्यासाठी केशर फायदेशीर ठरते का? जाणून घ्या गर्भवती महिलांनी केशराचे सेवन का करावे?

एप्सम मीठ बाथ

कोमट पाण्यात १-२ कप एप्सम मीठ घाला आणि प्रभावित भाग त्यात २०-३० मिनिटे भिजवा. एप्सम मिठामधील मॅग्नेशियम स्नायूंना आराम करण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करतो.

हर्बल शेक

पाणी उकळवा आणि त्यात औषधी वनस्पती आले, हळद किंवा अश्वगंधा भिजवा. वनौषधींच्या उकडीत स्वच्छ कापड भिजवा आणि प्रभावित भागात लावा. दिवसातून १-२ वेळा २०-३० मिनिटे हर्बल शेक चालू ठेवा.