Winter Blues : सध्या हिवाळा सुरू झाला आहे. सगळीकडे थंड वातावरण आणि गारवा जाणवतोय. असं म्हणतात, हवामान बदलामुळे माणसाच्या शरीरावर खूप खोलवर परिणाम होतो आणि हे खरंय. पण, तुम्हाला माहिती आहे का, ऋतू बदलांमुळे माणसाच्या मूडवरसुद्धा त्याचा परिणाम होतो, त्यामुळे हिवाळ्यात आपल्याला अनेकदा उदास वाटते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसनी डेहराडून येथील थ्रिविंग माइंडच्या संस्थापक मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अंकिता प्रियदर्शनी यांच्या हवाल्याने माहिती दिली. त्या सांगतात, “सिझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर (Seasonal Affective Disorder)मुळे उदासपणा जाणवतो. अशावेळी व्यक्तीमध्ये अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटक खूप महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येतात. नैराश्य येण्यापूर्वीची स्थिती असो किंवा हार्मोन्स असंतुलित होणे, याशिवाय वातावरणातील बदलांमुळे आपल्याला उदासपणा जाणवू शकतो.

सूर्यप्रकाशाचे महत्त्व

मेंदूतील सेरोटोनिन हार्मोन व्यक्तीला आनंदी ठेवण्यास मदत करतात, पण हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी होतो, त्यामुळे आपल्या दैनंदिन शारीरिक प्रक्रियांवर आणि या सेरोटोनिन पातळीवर त्याचा परिणाम होतो, त्यामुळे आपल्याला उदास वाटते आणि नैराश्य जाणवते.

त्या पुढे सांगतात, “सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे मेलाटोनिन हार्मोन आणि व्हिटॅमिन डी ची पातळी घसरते, ज्याचा थेट परिणाम आपल्या मूडवर होतो. सूर्यप्रकाश एक महत्त्वाचा घटक असून, ज्यामुळे व्यक्तीच्या संवेदनशीलतेवर त्याचा परिणाम जाणवतो.

हेही वाचा : Heart Attack In Winter : हिवाळ्यात का वाढते हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण? वाचा तज्ज्ञ काय सांगतात…

हिवाळ्यात उदासपणा कसा दूर करायचा?

  • भरपूर सूर्यप्रकाश घ्या किंवा कृत्रिम प्रकाशात राहा, यामुळे तुमच्या दररोजच्या शारीरिक प्रक्रिया सुरळीत राहतील. याशिवाय हिवाळ्यात थंड ठिकाणी जाणे टाळा. वातावरण गरम राहील, अशा ठिकाणी राहा.
  • दिवसभर घराबाहेर वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. दिवसा थोड्याफार सूर्यप्रकाशात चाला.
  • कामाच्या ठिकाणी किंवा घरात खिडकीजवळ बसा, ज्यामुळे तुम्हाला नैसर्गिक प्रकाश मिळू शकतो.
  • जर तुम्हाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल तर व्हिटॅमिन डी समाविष्ट असलेला आहार घ्या. यासाठी तुम्ही जवळच्या तज्ज्ञांशी संपर्क करू शकता आणि त्यांचा सल्ला घेऊ शकता.
  • शारीरिक क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी नियमित झोपा आणि तुमची दिनचर्या बनवा. रात्री सात ते आठ तास चांगली झोप घ्या.
  • हिवाळ्यात आळशीपणा दूर करा. घरी व्यायाम, योगा आणि डान्स करा. यामुळे शारीरिक हालचाली होतील. व्यायामामुळे तुमचा मूड सुधारू शकतो.
  • मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबाबरोबर वेळ घालवा. आनंदी राहून तुम्ही उदासपणा दूर करू शकता.
  • काही वेळा मानसिक विकारांचा उपचार करताना भावनिक गोष्टींचा विचार करून परिस्थितीवर कशी मात करायची, हे आपण जाणून घेऊ शकतो; पण काही प्रकरणांमध्ये औषधांची गरज भासू शकते.
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why are you feeling winter blues read what health expert said winter season affects on persons mood and lifestyle ndj
Show comments