उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन हा एक गंभीर आजार आहे. (Hypertension) या आजाराला सायलेंट किलर असेही म्हटले जाते. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, रक्तवाहिन्यांसंबंधी आजार आणि मूत्रपिंडाचा आजार यांसारख्या अनेक आरोग्य समस्यांचे हे प्रमुख कारण आहे. अशा वेळी, अधिक वेळ औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी जीवनशैलीत सुधारणा करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. जेव्हा तुमचे ब्लड प्रेशर १४० mmHg सिस्टोलिकपेक्षा जास्त आणि ९०mmHg डायस्टोलिकपेक्षा जास्त असेल तेव्हा तुम्हाला हायपरटेन्सिव्ह मानले जाते. अशा वेळी डॉक्टरांकडून आहारात बदल करणे, वेळेवर झोपणे, नियमित शारीरिक हालचाली करण्याची शिफारस केली जाते. अनेकदा औषधे वेळेवर घेऊन आणि आहारात बदल करून आणि इतर उपाय करूनही ब्लड प्रेशर नियंत्रित करता येत नाही. या वेळी आहारातील मिठाचे प्रमाण अधिक असल्याने ही समस्या उद्भवत असल्याचे समोर येते. ज्यामुळे आपल्या ब्लड प्रेशरवर सातत्याने परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका दिवसात मिठाचे पाच ग्रॅमपेक्षा कमी सेवन केले पाहिजे. परंतु सरासरी भारतीय दररोज सुमारे १० ग्रॅम मिठाचे सेवन करतात. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, दररोज जितके जास्त मीठ सेवन केले जाते तितका सिस्टोलिक ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. मिठामुळे हृदयाची गती वाढते. आहारातील सोडियम/मिठाचे सेवन कमी केल्याने केवळ ब्लड प्रेशरच नियंत्रणात राहत नाही, तर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार आणि मृत्यूचे प्रमाणदेखील कमी होऊ शकते, अशी माहिती चंदिगडमधील पोस्ट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (PGIMER) अॅडव्हान्स्ड कार्डियॅक सेंटर, कार्डियोलॉजी विभागाचे प्रोफेसर डॉ. राजेश विजयवर्गीय यांनी दिली. प्रौढ व्यक्तीच्या ब्लड प्रेशरचे प्रमाण १४०/९० mmHg पेक्षा कमी असावे. पण भारतातील प्रौढ शहरी लोकसंख्येपैकी सुमारे २५ टक्के लोक हे शारीरिक हालचालींचा अभाव आणि लठ्ठपणा, तणाव, आहार आणि धूम्रपान यांसारख्या अस्वस्थ जीवनशैलीमुळे हायपरटेन्शनचे शिकार होत आहेत. यात जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, पॅक किंवा कॅन केलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात मिठाचे प्रमाण अधिक वाढते. हे प्रमाण नियंत्रणात न ठेवल्यास ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. जर तुम्हाला आधीच ब्लड प्रेशरचा त्रास असेल आणि तुम्ही मिठाचे सेवन प्रमाणात करत नसाल, तर तुमचा ब्लड प्रेशरचा त्रास अजून वाढेल आणि तु्मच्यावर कोणत्याही औषधांचा फरक जाणवणार नाही.

कोणताही व्यायाम करा, पण आधी ‘ही’ गोष्ट करायला विसरु नका! तज्ज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत

डॉ. विजयवर्गीय यांच्या म्हणण्यानुसार, मिठाचे सेवन कमी केल्याने तुम्हाला शरीरात खूप लवकर चांगला फरक दिसेल. ब्लड प्रेशरची पातळी काही आठवड्यांतच कमी होईल. ब्लड प्रेशर ७ mmHg वाढल्याने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचा धोका २७ टक्क्यांनी वाढतो. याउलट यात ६ mmHg घट झाली तर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका १६ टक्क्यांनी कमी होतो आणि स्ट्रोकचा धोका ४२ टक्क्यांनी कमी होतो. स्ट्रोकमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ५७ टक्के आणि हृदयविकाराच्या मृत्यूंपैकी २४ टक्के मृत्यूंसाठी ब्लड प्रेशर हा आजार थेट जबाबदार असल्याचे समोर आले आहे.

मीठ आणि ब्लड प्रेशरचा काय संबंध आहे?

युरोपियन हार्ट असोसिएशनने केलेल्या अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, मिठाचे सेवन कमी केल्याने ब्लड प्रेशरचा धोका कमी होऊ शकतो, यात एका व्यक्तीने कितीप्रमाणात मिठाचे सेवन केले पाहिजे याविषयी माहिती देण्यात आली आहे. दररोज सुमारे १.७५ ग्रॅम सोडियम (४.४ ग्रॅम सोडियम क्लोराईड/दिवस) कमी केल्याने ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवता येते. अनुक्रमे ४.२/२.१ मिमी एचजी सिस्टोलिक/डायस्टोलिक ब्लड प्रेशर कमी होणे. हायपरटेन्शन असलेल्या रुग्णांमध्ये अधिक स्पष्ट परिणाम (५.४/२.८ mmHg घट) दिसून आला.

मिठामुळे ब्लड प्रेशर कसे वाढते?

जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते. म्हणजे रक्ताभिसरणाचे प्रमाण जास्त असते. यामुळे हृदयातील रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि किडनीचे परफ्यूजन प्रेशर वाढते. जेव्हा मूत्रपिंडाच्या परफ्यूजनचा दाब वाढतो, तेव्हा शरीरातील द्रवाचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी ग्लोमेरुलर फिल्टरेशन रेट आणि सोडियम उत्सर्जन दोन्ही वाढतात. जेव्हा हे होत नाही तेव्हा हायपरटेन्शनचा धोका वाढतो. अनेक संशोधनांत असेही आढळून आले आहे की, मिठाचे जास्त सेवन केल्याने एन्डोथेलियल नायट्रिक ऑक्साईड (NO) मध्ये लक्षणीय घट होऊ शकते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांसंबंधीचा प्रसार प्रभावित होतो. जास्त प्रमाणात मिठाचे सेवन रक्तवाहिन्यांच्या लवचिकतेवर परिणाम करते आणि त्यांना कडक करते.

मिठाचे सेवन कशा प्रकारे केले पाहिजे?

२०२० इंटरनॅशनल सोसायटी ऑफ हायपरटेन्शन ग्लोबल हायपरटेन्शन प्रॅक्टिसच्या गाइडलाइन्सनुसार, स्वयंपाक करताना आणि जेवताना मिठाचे प्रमाण कमीत कमी असले पाहिजे. याशिवाय फास्ट फूड, सोया सॉस आणि प्रक्रिया केलेले अन्न (ब्रेड) यांसारखे जास्त मीठ असलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे किंवा त्यांचे मर्यादित सेवन केले पाहिजे. मिठाचे सेवन कमी करण्यासाठी आहारात ताज्या भाज्या आणि फळांचा वापर वाढवायला हवा.

आहारातील मिठाचे प्रमाण कमी करण्यासाठी पदार्थांमध्ये काहीही न घालता ते तयार करा आणि खा, प्रक्रिया केलेले पदार्थ घेणे टाळा. दररोज 5 gm पेक्षा कमी सोडियमची नियमित गरज नियमितपणे न खाल्ल्या जाणाऱ्या काही पदार्थ्यांच्या खाण्याने पूर्ण होते, त्यामुळे स्वयंपाक करताना अतिरिक्त मीठ वापरण्याची गरज नाही, असेही डॉ. विजयवर्गीय यांनी सांगितले.

मोहालीतील फोर्टिस हॉस्पिटलच्या कॅथलॅब्सचे संचालक, विभागप्रमुख आणि कार्डिओलॉजीचे संचालक डॉ. आर. के. जसवाल यांनी शरीरात मिठाचे प्रमाण वाढवणाऱ्या पदार्थांची यादी तयार केली आहे. हे पदार्थ खाणे आपण टाळले पाहिजे. यात लोणचे, पापड, रेडीमेड सूप, चिप्स, चटणी, कॅन केलेले खाद्यपदार्थ, पिझ्झा आणि बेकिंग पावडर टाकून तयार केलेले पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला आहे. साखर घातलेल्या गोड पेयांचे नियमित सेवन केले पाहिजे. ५.१ किलो वजनाची घट ४.४ mmHg च्या सिस्टोलिक बीपी आणि ३.६ mmHg च्या डायस्टोलिक बीपीशी संबंधित आहे. रोज सकस आहार, योग्य व्यायाम असे रुटीन फॉलो करून तुम्ही ब्लड प्रेशरवर औषधांशिवाय उपचार करू शकता. कमी खा, योग्य खा, वेळेवर खा, भरपूर चाला, चांगली झोप घ्या आणि आनंदी राहा, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

डॉ. विजयवर्गीय पुढे सांगतात की, हायपरटेन्शनपासून दूर राहण्यासाठी आहारात लवकर सुधारणा करणे हाच सोपा मार्ग आहे. प्रत्येकाने १८ ते २० वर्षांच्या वयात एकदा आपले ब्लड प्रेशर मोजले पाहिजे आणि नंतर दर पाच वर्षांनी लवकर निदान केले पाहिजे.

WHO ने २०२५ पर्यंत जागतिक स्तरावर मिठाच्या सेवनाचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी करण्यासाठी एक योजना तयार केली आहे. मात्र भारतात हे या मुदतीपर्यंत शक्य होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. आदित्य विक्रम रुईया असे सांगतात की, अमेरिकन हार्ट असोसिएशनकडून दररोज २.३ ग्रॅम सोडियम (सुमारे एक चमचा मीठ) पेक्षा जास्त न वापरण्याची शिफारस केली जात आहे, पण भारतात दररोज सुमारे १० ग्रॅम मीठ वापरले जात आहे. वजन नियंत्रणात ठेवत, अल्कोहोल आणि धूम्रपान न केल्यास हायपरटेन्शनची समस्या आटोक्यात आणण्यास मदत होते.