बाळ जन्माला आलं की, आईच्या स्तनपानातूनच आपली भूक भागवतं. पहिले सहा महिने बाळाला आईच्या दुधाशिवाय कोणताही दुसरा पदार्थ भरवणे योग्य नसते ही गोष्ट तुम्हाला माहीत असेलच. कारण- या काळात बाळाची पचनसंस्था अन्य आहार पचवण्यासाठी सक्षम नसते. आईचं दूध हलकं असल्यानं ते बाळाला सहज पचतं. बाळ सहा महिन्यांचं झालं की, त्याला ठोस आहार भरवायला सुरुवात केली जाते. कारण- या काळापासून त्याची पचनसंस्था हळूहळू सक्षम होत जाते आणि हळूहळू त्याला ठोस आहार पचायला सुरुवात होते.

मात्र, आजकालच्या धावपळीच्या जगात काही स्त्रिया बाळ सहा महिन्यांचं होण्याआधीच पुन्हा जॉबला जातात. काही परिस्थितींमुळे आईला पुरेसं दूध येत नाही किंवा ती नोकरी करणारी स्त्री असू शकते. बाळाला बाटलीतून दूध पाजण्याची अनेक कारणं असू शकतात.अशा वेळी बाळाला स्तनपान करणं त्यांच्यासाठी कठीण होतं आणि मग त्या दुसरे पर्याय शोधू लगातात. मात्र, यामुळे बाळाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते. अनेक जण त्याला बाटलीतून दूध पाजण्यास सुरुवात करण्याचा सल्ला देतात. अशा वेळी आपण हे किती घातक आहे हे समजून घेतलं पाहिजे.

Teachers Day 2024 Gift Ideas
Teachers’ Day 2024 Gift Ideas: तुमच्या आवडत्या शिक्षकाला गिफ्ट द्यायचं आहे? ‘या’ चार आयडिया बघा; नक्कीच आवडेल अन् आठवणीतही राहील
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Bollywood actress Kriti Sanon like do you also feel not wanting people around if your mood is off
क्रिती सेनॉनप्रमाणे तुम्हालाही मूड ऑफ असेल तेव्हा लोक जवळ नको असतात? जाणून घ्या, भावनिकदृष्ट्या स्वत:ची काळजी कशी घ्यावी?
a man sings a amazing song kya hua tera wada
“नशा दौलत का ऐसा भी क्या…” व्यक्तीनं गायलं सुरेख गाणं, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “काकांना प्रेमात धोका मिळाला..”
a man saved dogs life | dog lovers
याला म्हणतात खरी माणुसकी! स्वतःचा जीव धोक्यात टाकून वाचवले कुत्र्याचे प्राण, व्हिडिओ होतोय व्हायरल
News About Sanjoy Roy What His Mother in Law Said?
Sanjoy Roy : “संजय रॉयला फाशी दिली तरीही आम्हाला काहीच..”, कोलकाता प्रकरणातील आरोपीच्या सासूची प्रतिक्रिया
What to do if your brakes fail while driving rto officer told easy trick
अचानक गाडीचे ब्रेक फेल झाले तर काय कराल? आरटीओ अधिकाऱ्याने सांगितली सोपी ट्रिक, Video एकदा पाहाच
India, Decline in Research Oriented Careers, Indian student and researchers, Indian parents, lack of research field in india, career choice of Indian students, World Level Science and Mathematics Olympiad,
आपल्याला चंद्रावर जायचंय, पण वैज्ञानिक मात्र तयार करायचे नाहीत, असं कसं चालेल?

डॉ. वैद्य म्हणतात, “मातांनी हे जाणून घेतलं पाहिजे की, त्यांनी कधीही आपल्या बाळाला बाटलीनं दूध पाजण्याचा प्रयत्न करू नये. कारण- त्यामुळे दुधाचं व्यसन लागतं. आणि बाळ स्तनपान करणं लवकर बंद करतं. बाटलीतून दूध पिणं आणि मातेनं स्तनपान करणं यामध्ये फरक पडतो. आईचं दूध बाटलीमधून देणं देखील स्तनपानाच्या योग्यतेचं होत नाही.”

स्तनपान करणा-या माता जेव्हा पुन्हा काम सुरू करतात तेव्हा त्यांना बाळाला बाटलीत दूध देण्यास भाग पाडले जाते. मात्र, बाटलीतून दूध देण्याएवजी दुसरा पर्याय काय आहे?

डॉक्टर. देसाई यांच्या म्हणण्यानुसार, यांच्या म्हणण्यानुसार, स्तनपानामुळे आईच्या स्तनांतूनही दूध निघण्यास मदत मिळते. बाळाच्या तोंडात विविध प्रकारचे स्नायू आहेत की, जे या क्रियाकलापांना मदत करतात. बाटलीतून आहार देताना हे स्नायू सक्रिय होत नाहीत आणि बाळ दूध गिळताना ते फक्त चोखत असल्यासारखं दिसतं. त्यामुळे मातांना बाटलीऐवजी चमचा वापरण्याचा सल्ला दिला जातो. कपदेखील वापरले जाऊ शकतात. सहा महिन्यांपासून पूरक अन्नदेखील सुरू करतो हे लक्षात घेता, मातांनी वाटी आणि चमच्यानं दूध कसं पाहायचं ते शिकावं आणि नंतर खुल्या कपमधून दूध द्यावं.

मातांनी दूध काढताना काय खबरदारी घ्यावी

बाळाला बाटलीमधून दूध पाजण्यासाठी जी बाटली तुम्ही खरेदी करीत आहात, ती चांगल्या गुणवत्तेची असेल यावर भर द्या. सध्या बाजारात अनेक प्रकारच्या विविध बाटल्या उपलब्ध आहेत. ज्या टिकाऊ आणि सुरक्षित सुद्धा आहेत. अनेकदा बाळ खेळता खेळता बाटली दूर फेकून देण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळासाठी नेहमी चांगल्या गुणवत्तेची बाटली घेणे हा उत्तम पर्याय ठरतो. जेवढी बाटली चांगल्या गुणवत्तेची असेल तेवढी ती बाळासाठीही सुरक्षित असेल. बाटली योग्य प्रकारे धुऊनच बाळाला द्यावी; अन्यथा त्यावरील जीवजंतू बाळाला आजारी पाडू शकतात.

डॉक्टर वैद्य सांगतात की, आईने दूध काढण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आपले हात चांगले धुवावेत. पंप वापरण्यापूर्वी साबणाने हात स्वच्छ धुवा किंवा अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरने निर्जंतुक करून घ्या. तुमचे स्तन, तुम्ही जिथे पंप करणार आहात ती जागा स्वच्छ आणि पंपिंगसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू, उदा. पंप, दूध साठवण्याच्या बाटल्या निर्जंतुक केलेल्या आहेत ना याची खात्री करून घ्या. “कामाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करणे कठीण होऊ शकते. अशा वेळी स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. पंप वापरल्यानं स्तनातील संपूर्ण दूध काढून घेता येतं; जेणेकरून जास्त दूध तयार होतं. आईला कामावर किती वेळा पंप करावा लागेल यावर आधारित कोणता ब्रेस्ट पंप वापरायचा हे ठरवावं लागतं. जर आई आठ तास काम करीत असेल आणि तिच्याकडे ये-जा करण्यासाठी दोन तासांचा वेळ असेल, त्या वेळी आईला तिचा दुधाचा पुरवठा चालू ठेवण्यासाठी चार तासांच्या अंतरानं कामाच्या ठिकाणी किमान दोन-तीन वेळा पंप करावा लागेल. हे विचारात घेऊन, ती एक इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंप खरेदी करू शकते; ज्यामध्ये बॅटरीचा पर्यायही असतो. त्याच्या मदतीनं ती एकाच सत्रात दोन्ही स्तन एकाच वेळी पंप करू शकते.

आईचं दूध बाळासाठी काढून ठेवता येतं? ते टिकतं का?

डिलिव्हरीनंतर काही आठवड्यांनंतर आई ज्यावेळी पुन्हा कामाला बाहेर जाण्याचा किंवा बाळाला काही काळासाठी घरी ठेवून बाहेर जाण्याचा विचार करते, तेव्हा तिच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न हा उभा राहतो की, त्या वेळात बाळाच्या स्तनपानाचं काय? अंगावर पिण्याच्या वयातलं मूल घरी ठेवून बाहेर जाताना आईला फार त्रास होतो, तिचा जीव तुटतो. वाटतं, आपलं बाळ भुकेलं होईल आणि आपण त्याला दूध पाजू शकत नाही. त्यावर उपाय म्हणजे शक्य असेल तेव्हा आईनं आपलं दूध काढून ठेवणं आणि पुरेशी काळजी घेऊन बाळ सांभाळणाऱ्या कुणी ते बाळाला देणं. मात्र, हे आईचे दूध नेहमी हवाबंद, निर्जंतुकीकरण केलेल्या कंटेनरमध्ये साठवलं पाहिजे. खोलीच्या तापमानात, आईचं दूध चार ते सहा तास सुरक्षित राहू शकतं. साठवलेलं हे दूध २४ तासांपर्यंत ठेवता येतं.

आईचं दूध साठवण्यासाठी पिशव्या मिळतात. किंवा घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीतही आईचं दूध साठवता येतं. साध्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये दूध साठवू नका. त्यासाठी ‘बीपीए फ्री कंटेनर’ वापरा. आईचं दूध फ्रिजच्या दारात साठवू नका. कारण- फ्रिज उघडबंद केल्यानं तिथलं तापमान सतत वर-खाली होत असतं.

डीप फ्रीझरमध्ये ठेवलेले आईचे दूध वितळले आहे आणि ते पुन्हा गोठले आहे हे आईला कसे समजेल?

प्रत्येक पाकिटावर ते दूध कधी काढलेलं आहे हे स्पष्ट समजेल अशी चिठ्ठी लावा. त्यामुळे तिला समजेल की दूध वितळलं आहे आणि पुन्हा गोठलं आहे

हेही वाचा – ‘शिळी’ चपाती सुद्धा तुम्हाला बनवू शकते ‘निरोगी’ ? जाणून घ्या कसे

महिलांना आजही कामाच्या ठिकाणी स्तनपानाबाबत अडथळे येतात. केईएम रुग्णालयातील स्तनपान सल्लागार डॉ जान्हवी शाह यांच्या मते, ज्या महिला डिलिव्हरीच्या सुट्टीनंतर कामावर परत येतात त्यांच्यासाठी खाजगी जागा उपल्बध करुन दिली पाहिजे, जेणेकरुन या माता आरामात पंप करू शकतात.